प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, जैश-ए-मोहम्मदचे पाच दहशतवादी अटक
दिवसभरातील घडामोडींचा वेगवान आढावा...
ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ
Last Updated:
16 Jan 2020 11:36 PM
इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्या भेटीबाबत केलेल्या वक्तव्यावरुन काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी संजय राऊतांना निर्वाणीचा इशारा दिलाय. इंदिरा गांधी या आमच्या आदर्श आहेत. आणि त्यांच्याबाबत अशी कुठलीही विधानं आम्ही सहन करणार नाही, आम्ही ईंट का जवाब पत्थर से देंगे अशा शब्दात उर्जामंत्री नितीन राऊत यांनी संजय राऊतांना खडे बोल सुनावलेत. मात्र संजय राऊतांनी वक्तव्य मागे घेतल्यावर हा विषय आता संपल्याचंही नितीन राऊतांनी म्हटलंय.
प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, जैश-ए-मोहम्मदचे पाच दहशतवादी अटक
संजय राऊतांच्या विधानांवर नारायण राणेंची सडकून टीका. आमच्या दैवतांबद्दल बोलाल तर जीभ जागेवर राहणार नाही..
संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलंय, करीमलाला संदर्भात आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया...
ठाण्यातल्या काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाणांनी हात उगारल्याचा महिला पत्रकाराचा आरोप...
स्मारकाची उंची वाढवण्यासाठी पैसे, रुग्णालयासाठी का नाही? वाडिया रुग्णालयावरुन हायकोर्टाने राज्य सरकारला झापलं...
टीम इंडियाचा कॅप्टन कूल अशी ओळख मिळालेला महेंद्रसिंग धोनी आता बीसीसीआयच्या करार यादीतून बाहेर पडला आहे. कुठल्य़ाही श्रेणीत धोनीचं नाव नाही.
दोन लाखाहून अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी समिती गठीत केली आहे.
संजय राऊत यांचे वक्तव्य चुकीचे होते, त्यावर आमची नाराजी होती. आम्ही ती उद्धव ठाकरे यांना कळवली आहे. आता संजय राऊत यांनी वक्तव्य मागे घेतलं आहे. भविष्यात अशा गोष्टी खपवून घेणार नाही. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या लोकांना आता बोलण्याचा अधिकार नाही : बाळासाहेब थोरात
शिवाजी महाराज यांचे तुकाराम महाराज आणि राजमाता जिजाऊ या गुरु होते. रामदास स्वामी हे गुरु नव्हते : खासदार संभीजीराजे
संजय राऊत हे जबाबदार नेते आहेत, ते अशा प्रकारचे वक्तव्य करतील असे मला वाटत नाही. इंदिरा गांधी यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याबाबत सुशीलकुमार शिंदे यांची प्रतिक्रिया..
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि करिम लालाच्या भेटीची कहाणी ज्येष्ठ पत्रकार बलजित परमार यांच्या तोंडून..
भारताच्या नकारामुळे आशिया कप पाकिस्तानात होणार नाही. पाकिस्तानकडून आशिया कपचं आयोजन हिसकावलं...
काँग्रेसला अंडरवर्ल फायनान्स करत होतं का? संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा सवाल...
आमदार राम कदम यांचे घाटकोपर पोलीस ठाण्यामोर सुरू असलेले आंदोलन स्थगित केले आहे. घाटकोपर पोलिसांनी राऊत यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे आश्वासन दिले असल्याने इथले आंदोलन थांबवित असलो तरी ही आंदोलनाची सुरुवात असल्याचे या वेळी आमदार कदम यांनी सांगितले.
पवार साहेबांनी माळरानावर नंदनवन फुलवलं : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बारामतीतील कृषि प्रदर्शनाचं कौतुक, पवार साहेबांनी लावलेल्या रोपट्याचं वटवृक्ष झालायं...
पुण्याजवळील वढूमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्याला सुरुवात, खासदार संभाजीराजे, सत्यजित तांबे, मनोज आखरे, रविकांत तुपकर उपस्थिती
कृषि विज्ञान केंद्रातर्फे आयोजित प्रदर्शनाच्या उदघाटनाला - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, कृषि मंत्री दादा भुसे, कृषी राज्य मंत्री विश्वजीत कदम, सुनील केदार आमदार धिरज देशमुख, आमदार रोहित पवार आणि सिने अभिनेता आमीर खान उपस्थित आहे.
बारामतीतील कृषि प्रदर्शनात बॉलिवूड अभिनेता आमीर खानने उपस्थिती लावली आहे. यावेळी त्याची मुलाखत घेण्यात आली.
औरंगाबाद : उदयनराजे भोसले यांना शिवरायांचे वंशज असल्याचा पुरावा मागणाऱ्या संजय राऊतांच्याच्या विरोधात उदयनराजे भोसले समर्थकांनी आंदोलनाचे हत्यार उपसलंय. आज औरंगाबादमध्ये स्वराज्य युवा क्रांती संघटनेच्या वतीने संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करत निषेध केला. शहरातील क्रांती चौकात उदयनराजे समर्थकांनी एक येऊन संजय राऊतांच्या पुतळ्याला जोडे मारत राऊतांनी तात्काळ माफी मागावी तसेच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कृषिक प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी उद्धव ठाकरे बारामतीत दाखल, शरद पवारांच्या बारामतीत मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं मला अर्बन नक्षलवादी ठरवलं होतं. याच प्रकरणात चळवळीत कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबलं, त्यांना न्याय कधी मिळणार असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केली. यांसदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना टॅग करुन ट्विट केलं आहे.
नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच मुंबईच्या किमान तापमानात घट नोंदविण्यात येत असल्याने मुंबईकरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. त्यामुळे मुंबईकर सध्या थंडीचा सुखद अनुभव घेत आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईचे किमान तापमान 15 अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले होते. आज मुंबईचं तापमान 21 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे. सध्या किमान तापमानात होत असलेल्या घसरणीमुळे सकाळी आणि सायंकाळी मुंबई शहर आणि उपनगरात गार वारे वाहत असून, मुंबईकरांना थंडी अनुभवता येत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आशाप्रकारची थंडी मुंबईकरांना 17 जानेवारी पर्यंत अनुभवता येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाच्या मुद्यावरुन सुरू झालेलं राजकारण चांगलच तापण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. 'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' या पुस्तकासंदर्भात राऊतांनी छत्रपतींच्या वंशजांना भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान दिलं होतं. त्यावर पुण्यात पत्रकार परिषद घेत उदयनराजेंनी प्रत्युत्तर दिलं. मात्र लोकमत वृत्तपत्राच्या कार्यक्रमात राऊतांनी छत्रपतींचे वंशज असल्याचे उदयनराजेंकडे पुरावे आहेत का असा सवाल उपस्थित केला आहे. दरम्यान, आपण दाऊदलाही दम दिलाय असा दावाही संजय राऊतांनी या कार्यक्रमात केला आहे.
প্রেক্ষাপট
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...
1. उदयनराजेंकडे छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे मागणारे जेम्स लेन आणि मुघलांची अवलाद, भाजपचा राऊतांवर हल्लाबोल, राजकारण तापलं
2. संजय राऊतांनी माफी मागावी मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा, अन्यथा राऊतांविरोधात आंदोलन, उदयनराजे प्रेमींकडून आज सातारा बंदची हाक
3.जाणता राजा शब्द प्रचलित करणारे रामदास स्वामी छत्रपतींचे गुरू नव्हते, साताऱ्यात शरद पवारांचं विधान, जाणता राजा विशेषणावरुन टीका करणाऱ्यांना उत्तर
4. पेट्रोलच्या किंमती 90 रूपये प्रति लिटर जाण्याची शक्यता, इराण-अमेरिकेतील तणावाचा इंधरदरावर परिणाम, तर पुढील 5 वर्षांसाठी वीजदरवाढीचा महावितरणाचा प्रस्ताव
5. नोटांवर लक्ष्मीचा फोटो लावल्यास रुपया मजबूत होईल, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींचा अजब सल्ला, इंडोनेशियाच्या नोटांवरील गणपतीच्या फोटोचा दाखला
6. तान्हाजी चित्रपट करमुक्त करण्यावर मंत्रिमंडळ बैठकीत एकमत, मुख्यमंत्र्यांकडून लवकरच घोषणा होण्याची शक्यता