माझ्या मते आज जाहीर झालेले खातेवाटप हे तात्पुरत्या स्वरूपाचे : जयंत पाटील

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 12 Dec 2019 11:48 PM
पत्नी जीन्स आणि टी शर्ट घालून कामावर जाते, म्हणून पतीने तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली आहे. सुजाता जाधव असं या महिलेचं नाव असून ती तिचा पती सुधीर जाधव याच्यासोबत डोंबिवलीच्या कोपर परिसरात वास्तव्याला आहे. सुजाता कामावर जाताना जीन्स आणि टी शर्ट घालते या कारणावरून तिचे आणि पती सुधीरचे नेहमी वाद व्हायचे. सुजाताने तिच्या मित्रांशी चॅटिंग करण्यालाही सुधीरचा विरोध होता. याच कारणावरून मंगळवारी रात्री त्यांच्यात वाद झाल्यानंतर सुधीर याने सुजाताला बेदम मारहाण करत तिचा गळा दाबला. यावेळी सुजाता बेशुद्ध पडल्यानं तिचा मृत्यू झाल्याचं समजून सुधीर हा स्वतःच रामनगर पोलीस ठाण्यात हजर झाला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता सुजाता जिवंत असल्याचं आढळल्यानं तिला आधी डोंबिवलीत आणि तिथून मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. याप्रकरणी सुधीर याला हत्येच्या प्रयत्नात पोलिसांनी अटक केली आहे.
माझ्या मते आज जाहीर झालेले खातेवाटप हे तात्पुरत्या स्वरूपाचे असून, मंत्रिमंडळ विस्ताराच्या नंतर सर्व खात्यांचे यथोचित खातेवाटप होईल.' 'माझ्या मते आज जाहीर झालेले खातेवाटप हे तात्पुरत्या स्वरूपाचे असून, मंत्रिमंडळ विस्ताराच्या नंतर सर्व खात्यांचे यथोचित खातेवाटप होईल.', जयंत पाटील यांचं ट्वीट

माझ्या मते आज जाहीर झालेले खातेवाटप हे तात्पुरत्या स्वरूपाचे असून, मंत्रिमंडळ विस्ताराच्या नंतर सर्व खात्यांचे यथोचित खातेवाटप होईल.' 'माझ्या मते आज जाहीर झालेले खातेवाटप हे तात्पुरत्या स्वरूपाचे असून, मंत्रिमंडळ विस्ताराच्या नंतर सर्व खात्यांचे यथोचित खातेवाटप होईल.', जयंत पाटील यांचं ट्वीट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेऊन वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा. यावेळी रश्मी ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार अजित पवार आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह सदानंद सुळे, रेवती सुळे देखील उपस्थित होते.
पंचायत समिती सभापती पद आरक्षण जाहीर,

बुलडाणा जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली आज काढण्यात आले.

खामगांव व लोणार पंचायत समिती अनुसूचित जाती (महिला), चिखली अनुसूचित जाती, देऊळगांव राजा अनुसूचित जमाती, मलकापूर व संग्रामपूर नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), जळगांव जामोद व नांदुरा नागरिकांचा मागास प्रवर्ग, बुलडाणा, शेगांव आणि सिंदखेड राजा सर्वसाधारण महिलांसाठी तर मेहकर व मोताळा सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले आहे.
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील चर्मरोग विभागाच्या बाह्यरुग्ण विभागात सज्जा कोसळल्याने दोघांचा मृत्यू, देवनाथ बागडे आणि वनिता वाघमारे अशी मृतांची नावं
रत्नागिरी नगराध्यक्ष निवडणूक अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, भाजपचे दिपक पटवर्धन, राष्ट्रवादीचे उमेदवार मिलिंद किर, मनसेकडून रुपेश सावंत तर शिवसेनेच्या प्रदीप साळवी यांनी शक्ती प्रदर्शन करुन उमेदवारी अर्ज दाखल केले चौरंगी होणार लढत
दिव्यात शेतकऱ्यांनी बुलेट ट्रेनचा सर्व्हे उधळला, भूसंपदनात सावकारांना हाताशी धरत भ्रष्टाचार - शेतकऱ्यांचा आरोप

, 'आमचे पैसे आम्हाला मिळाले नाहीत, तर काम होऊ देणार नाही!', शेतकरी संतप्त
नागपूर : शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या ( GMC ) त्वचा रोग विभागात एक स्लॅब कोसळला, दोन ते तीन जण जखमी असल्याची माहिती
मंत्रिमंडळ विस्तार 23 डिसेंबर रोजी होणार
मंत्रिमंडळ विस्तार 23 डिसेंबर रोजी होणार
मंत्रिमंडळ विस्तार 23 डिसेंबर रोजी होणार
अखेर खातेवाटप जाहीर, सहा मंत्र्यांमध्ये खात्यांचे वाटप
लहान मुलांची लग्न होतात माझं का नाही, असं म्हणत एकाने इसमाने स्वत:च्या आईच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन खून केला. साताऱ्यातील मोराळे गावात ही घटना घडली आहे. खून करणारा मुलगा किरण शिंदेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मुंबई मेट्रो 3, कुलाबा ते सीप्झ या भूमीगत मेट्रोचे भुयारीकरण पूर्ण, मुंबई मेट्रोरेल कॉर्पोरेशनची माहिती, मरोळनाका, एमआयडीसी, सीप्झ दरम्यानचा 24 वा 1.67 किमीचा बोगदा पूर्ण
बीड : गोपीनाथगडावर आज पंकजा मुंडेंचा मेळावा, जे पी नड्डा पंकजा मुंडेंच्या मेळाव्याला येणार नाहीत
बीड : गोपीनाथगडावर आज पंकजा मुंडेंचा मेळावा, जे पी नड्डा पंकजा मुंडेंच्या मेळाव्याला येणार नाहीत
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा गोपीनाथ गडावर उपस्थित राहणार, लातूरला चार्टर प्लेनने येणार, तेथून गोपीनाथ गडावर पोहोचणार
भाजपचे माजी आमदार अनिल गोटे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शरद पवार यांच्या जन्मदिनी म्हणजेच आज (12 डिसेंबर) त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होईल. आज दुपारी साडे बारा वाजता अनिल गोटी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे.

প্রেক্ষাপট

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा

1. वादळी चर्चेनंतर नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर, मतदानावेळी शिवसेनेचा सभात्याग, चर्चेदरम्यान अमित शाहांचा काँग्रेस, शिवसेनेला टोला

2. पद मिळू नये म्हणून भाजप सोडणार असल्याच्या वावड्या, पंकजा मुंडेंची माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत, आज गोपीनाथ गडावरच्या मेळाव्याकडे राज्याचं लक्ष

3. खातेवाटपावरुन महाविकास आघाडीत गोंधळ, सूत्रांची माहिती, काँग्रेसचा सरकारला बाहेरुन पाठिंबा देण्याचा इशारा, बांधकाम, नगरविकास आणि जलसंधारणावरुन घोडं अडलं

4. अटल बिहारी वाजपेयींऐवजी समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचं नाव देणार, मंत्रिमंडळ बैठकीत सहमती, 3 हजार 500 कोटींची निधी मंजूर

5. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस, मुंबईत वाय. बी सेंटरवर पवार शुभेच्छांचा स्वीकार करणार

6. टीम इंडियाने वानखेडेवरच्या शेवटच्या टी ट्वेन्टीसह मालिकाही घातली खिशात, भारताकडून विंडीजचा 67 धावांनी धुव्वा, कर्णधार विराट कोहली मालिकावीर

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.