मुंबई : बहुमताच्या चाचणीत आम्ही भाजपला पराभूत करु - नवाब मलिक
राज्याच्या राजकारणात सगळ्यात मोठा भूकंप, देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदी विराजमान
ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দLast Updated: 23 Nov 2019 08:58 PM
প্রেক্ষাপট
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्ताकारणात नवा ट्विस्ट आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर आश्चर्याची गोष्ट म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ...More
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्ताकारणात नवा ट्विस्ट आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर आश्चर्याची गोष्ट म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवनात आज सकाळी 8 वाजून 5 मिनिटांनी गुपचूप शपथविधी सोहळा पार पडला. दरम्यान अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असली तर भाजपला संपूर्ण राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळाला आहे की, अजित पवारांसोबत आमदारांच्या गटाने भाजपला पाठिंबा दिला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही."विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करता आलं नव्हतं. शेतकऱ्यांसह राज्य अनेक अडचणींचा सामना करत होतं. त्यामुळे स्थिर सरकार बनवण्यासाठी हा निर्णय घेतला," अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी शपथविधीनंतर राजभवनात दिली.
मुंबई : बहुमताच्या चाचणीत आम्ही भाजपला पराभूत करु, पाच आमदार अजूनही संपर्कात नाहीत, उरलेले आमदार बैठकीत उपस्थित, नेता निवडीपर्यंत जयंत पाटलांकडे सर्व अधिकार - नवाब मलिक

राज्यातील सत्तासंघर्षावरुन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सुप्रीम कोर्टात जाणार, आज रात्रीच सुनावणी व्हावी, अशी तयारी चालू असून रजिस्ट्रार ऑफिसमध्ये वकील पोहोचले आहेत.

सत्तास्थापनेच्या नाट्याला कलाटणी, धनंजय मुंडे शरद पवारांकडे परतले? यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सुरु असलेल्या राष्ट्रवादीच्या चर्चेसाठी धनंजय मुंडे पोहोचले, मी इथेच आहे, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी माध्यमांसमोर दिली.
बारामतीत शरद पवार आणि अजित पवार यांच्या समर्थकांत उभी फूट. बारामतीतील नगरसेवक, युवकचे पदाधिकारी अजित पवारांच्या पाठीशी तर जेष्ठ नागरिक आणि सामान्य बारामतीकर शरद पवार यांच्या पाठीशी. बारामती नगर परिषदेच्या जवळ लावण्यात आलेला हा फ्लेक्स बराच काही सांगून जाणारा आहे.

सकाळी 7 वाजता मुंडेंच्या बंगल्यावर या असा निरोप आला. आम्हाला राजभवनात नेलं, पण कशासाठी नेलं हे माहित नव्हती, मी शरद पवारांसोबत, त्यांच्याच नेतृत्त्वात काम करणार : आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांची माहिती
एक दोन जण गेले म्हणजे राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते गेले असं होत नाही. धनंजय मुंडे, कुठे माहित नाही, पण ते गेल्याने काही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी दिली.
संघर्षाचा काळ कधी संपत नाही. प्रसंगानुसार त्याकडे पाहावं लागतं. संघर्षातूनच आज दिसतेय ती शिवसेना उभी राहिली. संघर्षातूनच ती आणखी पुढे जाईल, असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.
अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राला काळिमा फासला, बंडखोर आमदांना रस्त्यावर फिरु देणार नाही : संजय राऊत

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील सरकारच्या निर्मितीच्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सहभागी होते. त्यांनीच अजित पवारांना पाठिंबा दिला असणार. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते आहेत आणि राष्ट्रवादी शरद पवारांच्या संमतीने कोणताही निर्णय घेत नाही: सूत्र
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथ घेतल्या बद्दल अभिनंदन. तुमच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास रथ वेगाने पुढे जाईल हा ठाम विश्वास आहे, नितीन गडकरींचं ट्विट
महाराष्ट्राला खिचडी सरकार नको होतं, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची शिवसेनेवर टीका, पाच वर्षे स्थिर सरकार देणार असल्याचाही विश्वास