दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना उद्या फाशी नाही, दिल्लीच्या पटियाला कोर्टाकडून पुढील आदेशापर्यंत फाशीला स्थगिती

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 31 Jan 2020 06:16 PM
चीनमध्ये अडकलेल्या 27 भारतीय विद्यार्थ्यी लवकरच भारतात परतणार, दिल्लीतून एक विशेष विमान चीनला रवाना होणार, चीन सरकार त्यांच्या विमानतळावर विमान उतरवण्याची परवानगी देणार, याबाबतची माहिती पिंपरी चिंचवड मधील देवकाटे कुटुंबीयांनी दिली आहे.
दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना उद्या फाशी नाही, दिल्लीच्या पटियाला कोर्टाकडून पुढील आदेशापर्यंत फाशीला स्थगिती
सांगलीमध्ये व्यापारी आणि हमाल तोलाईदारांचा वाद उफाळला आहे. तोलाई देण्यास व्यापाऱ्यांनी नकार दिल्याने संतप्त हमालांनी मार्केट कमिटीच्या कार्यालयासमोर ठिय्या मारला आहे. काल झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नसल्याने व्यापाऱ्यांनीही बेमुदत बंद पुकारला आहे. यामुळे मार्केट यार्डात सर्व व्यवहार झाले ठप्प झाले आहेत. यामुळे सांगली मार्केट यार्डातील कोट्यवधी रुपयांची उलाढाल थांबली आहे.
हमालांचे तोलाईसाठी गेल्या काही दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. हमालांनी व्यापाऱ्यांचा द्वेष केला आहे. व्यापाऱ्यांची बदनामी केली आहे. तसेच वाट्टेल ते आरोप करण्यात आले असून संकोचित वृत्तीने आरोप करणे चुकीचे आहे असा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे जोपर्यंत हमाल, तोलाईदार आणि हमाल प्रतिनिधी व्यापाऱ्यांची माफी मागत नाहीत तोपर्यंत व्यापाऱ्यांनी आजपासून बेमुदत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापाऱ्यांचे सर्व असोसिएशन बंद मध्ये सहभागी असून व्यापाऱ्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे वातावरण तापले आहे.
पुन्हा सुपरओव्हर, भारत-न्यूझीलंड सामना पुन्हा टाय
मुंबईकरांसाठी लावल्या जाणाऱ्या बेस्टच्या वीज दरवाढीवर मनसेचा आक्षेप, राज ठाकरे यांचे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगास पत्र
जम्मू-काश्मिरच्या नागरिकांनादेखील देशातील इतर
नागरिकांप्रमाणे अधिकार मिळाले - राष्ट्रपती रामनाथ कोविंद
राम जन्मभूमीच्या निर्णयानंतर देशाने परिपक्वता दाखवली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद
#BUDGET2020 राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला सुरुवात; त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सितारमन वर्ष 2019-2020चं आर्थिक सर्वेक्षण सादर करणार
#BUDGET2020 राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला सुरुवात; त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सितारमन वर्ष 2019-2020चं आर्थिक सर्वेक्षण सादर करणार
राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला सुरुवात; त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सितारमन वर्ष 2019-2020चं आर्थिक सर्वेक्षण सादर करणार
राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसद भवनात दाखल; थोड्याच वेळात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला सुरुवात, त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सितारमन वर्ष 2019-2020चं आर्थिक सर्वेक्षण सादर करणार
आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, थोड्याच वेळात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला सुरुवात होणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या सुट्टीवर जाणार आहे. निवडणूक, निकाल आणि सत्तास्थापनेनंतर उद्धव ठाकरे कुटुंबासह महाबळेश्वरला जाणार आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यादांच कुटुंबांसमवेत बाहेर जाणार आहेत.
लवकरच महाविकास आघाडी सरकार 60 ते 70 हजार रिक्त पदांसाठी मेगा भरती करणार आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अजित पवारांच्या उपस्थितीत दिंडोरी तालुक्यातील कादवा इंग्लिश मिडीयम शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय उद्घाटन सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. पोलीस दलातील 8 हजार पद भरणार असल्याचंही यावेळी अजित पवार यांनी सांगितलं आहे.
देशातील सर्व सरकारी बँका आज आणि उद्या संपावर गेल्या आहेत. वेतन सुधारणेच्या प्रलंबित मागणीवर कोणतीही सहमती झाली नाही. त्यामुळे संपाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आज आणि उद्या सरकारी बँका बंद राहणार आहेत. याशिवाय संपाला जोडून रविवारची सुटी असल्यानं सलग तीन दिवस बँकांचे व्यवहार कोलमडण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे उद्या केंद्रीय अर्थसंकल्प असताना सर्व सरकारी बँका संपावर असतील. बँक संघटनांनी 20 टक्के वेतनवाढीची मागणी केली आहे.
उत्तर प्रदेशच्या फारुखाबादमध्ये पार्टीला बोलावून एका व्यक्तीने 23 लहान मुलांना ओलिस ठेवले होते. या माथेफिरूला पोलिसांनी ठार केलं आहे. या माथेफिरुनं या मुलांना एका घरात ठेवलं. घरातून त्याने पोलिसांवर गोळीबार आणि हॅन्ड ग्रेनेडचा मारा केला होता. या हल्ल्यात दोन पोलीस गंभीर जखमी झाले होते. यावेळी झालेल्या चकमकीत माथेफिरुसह त्याची पत्नीही ठार झाली असून मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
जामिया-राजघाट दरम्यान निघालेल्या सीएएविरोधातल्या मोर्चात गोळीबाराच्या घटनेनं राजधानी दिल्ली हादरली. मात्र गोळीबार करणारा अल्पवयीन असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. विशेष म्हणजे, दिल्लीत गोळीबार करण्यापूर्वी हल्लेखोरानं फेसबुक लाईव्ह केलं होतं. हल्लेखोराच्या फेसबुक अकाऊंटवरच्या चिथावणीखोर पोस्ट वाचल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याचं अकाऊंट निष्क्रिय करण्यात आलं आहे. गुरूवारी जामिया पासून राजघाटच्या दिशेनं सीएएविरोधात मोर्चा निघाला होता. मात्र त्यावेळी हल्लेखोर हातात बंदूक नाचवत पुढे आला आणि त्यानं गोळीबार सुरू केला. या गोळीबारात एक जण जखमी झाला असून पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतलं आहे.
कोरोना विषाणूचा विळखा वाढला आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये आतापर्यंत 213 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतल आहे. जगभरात जवळपास 21 देशांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेकडून मिळत आहे.

প্রেক্ষাপট

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in


 


महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...



1. जागतिक आरोग्य संघटनेकडून आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित, चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे 213 जणांचा मृत्यू
2. मित्राच्या हत्येचा सूड उगवण्यासाठी दिल्लीतल्या सीएए मोर्चात गोळीबार, राजधानी हादरली, हल्लेखोराची गय करणार नाही, अमित शाहांचं ट्वीट
3. पुण्यात उर्मिला सहभागी झालेल्या सीएए विरोधी जनआंदोलनात हिंदुत्त्ववादी संघटनेचा गोंधळ, घोषणाबाजी करणारे पोलिसांच्या ताब्यात, गोंधळ घालणाऱ्यांना उर्मिलाचा टोला
4. कोरेगाव भीमा हिंसाचारामागे भाजपचा हात, गृहमंत्री अनिल देशमुखांच्या आरोपानंतर भाजपचा संताप, आरोप सिद्ध करण्याचं मुनगंटीवारांचं आव्हान
5. फडणवीसांनी सुरू केलेल्या मराठवाडा वॉटर ग्रीडला ब्रेक लागण्याचे संकेत, तर भाजप सरकारकडून नियुक्त 19 साखर कारखान्यांचे संचालक हटवले
6. कोकणचा हापूस वाशी एपीएमसीत दाखल, व्यापाऱ्यांकडून पेटीची पूजा, तर बदलापुरात शेतकऱ्याकडून स्ट्रॉबेरी पिकवण्याचा यशस्वी प्रयोग


 


 


एबीपी माझा वेब टीम

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.