LIVE UPDATES | ट्रायच्या नव्या नियमावलीमुळे 135 रूपयांत दिसणार 200 चॅनल

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 22 Jan 2020 08:52 PM
सॅटेलाईट चॅनल्सच्या दरांमध्ये पारदर्शकता आणि समानता आणून ग्राहकांच्या हितासाठीच सुधारित दर लागू करण्यात केले आहेत - ट्राय. नव्या नियमावलीमुळे १३५ रूपयांत दिसणार २०० चॅनल, ट्रायचा मुंबई उच्च न्यायालयात दावा
खाटेच्या साह्याने 15 किमी पायपीट करत रुग्णाला पोहचवले रुग्णालयात. गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या भामरागड तालुक्यातील लाहेरीपासून 15 किमी असलेल्या मोरडपार गावातील ही रुग्ण महिला आहे. आजारी असल्याने तिला तात्काळ उपचाराची होती गरज. मात्र, ह्या भागात नीट रस्ते, पूल नसल्याने रुग्णाला खाटेच्या साह्याने घेऊन 15 किमी पायपीट करत लाहेरी रुग्णालयात पोहचले.
मुंबई नियोजनाबाबत वांद्रे येथील चेतना कॉलेजमध्ये आदित्य ठाकरेंची बैठक, मुंबईबद्दल मोठे निर्णय घेण्याची शक्यता, बैठकीला मुंबईचे सर्व आमदार आणि मंत्री उपस्थित राहणार..
डीआयजी निशिकांत मोरेंना अटकेपासून हायकोर्टाचा दिलासा, अटक झाल्यास 25 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश, निशिकांत मोरेंना 29, 30 आणि 31 जानेवारी रोजी तळोजा पोलीस स्थानकात हजेरी लावून पोलिसांना तपासात सहकार्य करण्याचे निर्देश
LIVE TV | देवेंद्र फडणवीस यांच्या आणखी एका निर्णयाला ब्रेक लागणार, नगराध्यक्षानंतर थेट जनतेतून सरपंच निवड रद्द होणार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

सीएए, एनआरसी आणि एनपीआर संदर्भात आज कुठलीही ऑर्डर पास करण्यास सुप्रिम कोर्टाचा नकार, सर्व याचिकांसंदर्भात केंद्र सरकारला नोटिस पाठवल्या, उत्तर देण्यास 4 आठवड्यांचा कालावधी
व्यापारी आणि उद्योजकांना रात्री अपरात्री आयडी आणि पासवर्ड बदलण्यासाठी ओटीपी येत आहेत. जीएसटी पोर्टलवरुन तुमचा आयडी, पासवर्ड बदलला आहात पुन्हा रिसेट करण्यासाठी दिलेली ओटीपी वापरा असा मेसेज व्यापारी, उद्योजकांना येत असल्याची माहिती मिळत आहे. करदात्यांची गोपनीय माहिती सायबर चोरट्यांच्या हाती लागली असल्याचा दावा काही व्यापाऱ्यांनी केला आहे. दरम्यान अशा प्रकारच्या अनेक तक्रारी जिल्हा कार्यालयाकडे आल्या आहेत.
शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव पाथरी ग्रामस्थांच्या शिष्ठमंडळासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल
शिवभोजनातील दहा रुपयांची थाळी तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला आधारकार्डची प्रत आणि एक फोटो द्यावा लागणार आहे.
राज्यातील शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यासंदर्भातील कायदा येत्या अधिवेशनात मांडण्यात येईल, अशी माहिती मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी दिली. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (21 जानेवारी) मंत्रालयात बैठक झाली. अधिवेशनात मांडावयाच्या अन्य राज्यांच्या कायद्याच्या धर्तीवर तयार केलेल्या मराठी भाषा अधिनियम प्रस्तावावर बैठकीत विस्तृत चर्चा झाली. मराठीचा वापर वाढावा यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्यवाही करण्याची गरज असल्याची भावनाही देसाई यांनी यावेळी व्यक्त केली.

প্রেক্ষাপট

महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...

1. धडाकेबाज निर्णयासाठी प्रसिद्ध तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेचे आयुक्त, तर मुंबई मेट्रो प्राधिकरणातून अश्विनी भिडेंची उचलबांगडी, 16 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

2. भाजपच्या चेहऱ्यावरचे मुखवटे संपता संपत नाहीत, 'सामना'तून टीकास्त्र, 2014 बाबत पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यात तथ्य नसल्याचंही स्पष्टीकरण

3. साई बाबांच्या जन्मस्थळासंदर्भात पाथरीच्या ग्रामसभेत ठराव मंजूर, मुख्यमंत्र्यांनी बाजू ऐकून न घेतल्यास पाथरी बंदचा इशारा

4. तानाजी सिनेमाच्या दृश्यांशी छेडछाड करत पंतप्रधान मोदींची पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना, दिल्लीतल्या व्हिडीओवरुन महाराष्ट्रात रणकंदन, अखेर वादग्रस्त व्हीडिओ मागे

5. आता मोबाईलमध्ये उपलब्ध होणार स्वदेशी जीपीएस यंत्रणा, अमेरिकन जीपीएसला टक्कर देणाऱ्या नाविक यंत्रणेची इस्रोकडून निर्मिती

6. शाळेतील मुलांसाठी खास वॉटर बेल उपक्रम, दिवसातून तीन वेळा पाणी पिण्यासाठी बेल वाजणार, शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

एबीपी माझा वेब टीम

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.