LIVE UPDATE | आज दिवसभरात... 20 जानेवारी 2020

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 20 Jan 2020 07:09 AM

প্রেক্ষাপট

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

महत्त्वाच्या हेडलाईन्स एक नजर...

1. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर शिर्डीकरांचा बंद तात्पुरता मागे, आजच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास पुन्हा बंदचा इशारा
2. सेनापती फिरला पण फौज गायब, अर्जुन खोतकरांकडून विधानसभेतील पराभवाचं खापर भाजपवर, दानवे आणि खोतकर वाद पुन्हा रंगण्याची चर्चा
3. भाजपला आज नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार, जे पी नड्डांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार, निवडणूक प्रक्रियेसाठी देशभरातील पदाधिकारी राजधानी दिल्लीत
4. पोलीस यंत्रणेवरील ताणामुळे मुंबईतील नाईट लाईफचा निर्णय लांबणीवर पडणार, गृहमंत्री अनिल देशमुखांचे संकेत, 22 तारखेला मंत्रिमंडळात चर्चा होणार
5. सुखोई 30 स्वाड्रन लढाऊ विमान भारतीय वायुदलात सामिल होणार, आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थित कार्यक्रमाचं आयोजन
6. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत दणदणीत विजय, विराट आणि रोहित शर्माची शानदार फलंदाजी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.