LIVE UPDATE | श्रीनगर : लाल चौक इथे दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, एकाचा मृत्यू, 12 जखमी

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 04 Nov 2019 08:18 PM
शहरी नक्षलवाद आणि भीमा कोरेगाव प्रकरणी नवलखांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार, अटकपूर्व जामीनासाठी पुणे सत्र न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश, सर्वोच्च न्यायालयानं अटकेपासून दिलेला दिलासा 12 नोव्हेंबरपर्यंत कायम
‘आरसीईपी’ करारावर भारत सही करणार नाही, शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा, सूत्रांची माहिती
बीड : दोन बाईकच्या धडकेत तिघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी, माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथील बुखारी शाळेजवळील घटना
संजय राऊत आणि रामदास कदम राज्यपालांकडे रवाना
संजय राऊत आणि रामदास कदम राज्यपालांकडे रवाना
श्रीनगर : लाल चौक इथे दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, बाजारात झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर 12 जखमी
श्रीनगर : लाल चौक इथे दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, बाजारात झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर 12 जखमी
सत्तेच्या समीकरणारसंदर्भात कोण काय बोलत आहे, यावर मी किंवा भाजपमधील कोणीही टिप्पणी देणार नाही, महाराष्ट्राला नव्या सरकारची आवश्यकता आणि ते लवकरच बनेल, याबाबत मी आश्वस्त : मुख्यमंत्री
सत्तेच्या समीकरणारसंदर्भात कोण काय बोलत आहे, यावर मी किंवा भाजपमधील कोणीही टिप्पणी देणार नाही, महाराष्ट्राला नव्या सरकारची आवश्यकता आणि ते लवकरच बनेल, याबाबत मी आश्वस्त : मुख्यमंत्री
अर्ध्या तासाच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या घरातून बाहेर पडले, माध्यमांशी बोलणं मुख्यमंत्र्यांनी टाळलं

मनमाड जवळच्या माळेगाव कार्यालयात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, किरण दत्तू उगलेंनी कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खाजगी बसचा अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून 20 ते 25 प्रवासी जखमी झाले आहेत. बसमध्ये 49 प्रवासी असल्याची कळतं. बोरघाटात पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.
नंदुरबार शहरात आज सकाळी धुक्याची चादर पाहण्यास मिळाली सकाळी. दाट धुके नंदुरबार शहरावर दिसले. त्यामुळे वाहनचालकांनाही मोठी कसरत करावी लागत होती. मात्र ही धुके शेती पिकांसाठी नुकसानकारक ठरु शकते, असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
पालघरमध्ये परतीच्या पावसाने कालपासून विश्रांती घेतली असून आज पहाटे पालघरसह परिसरात दाट धुक्याची चादर पाहायला मिळाली. सकाळचे आठ वाजले तरी धुक्यांमुळे सूर्यदर्शन झालं नाही. महामार्गावरील वाहतुकीवरही धुक्याचा परिणाम पाहायला मिळाला.

चंद्रपूर शहरावर आज पहाटे धुक्याची चादर पाहायला मिळाली. दिवसा वाढलेले तापमान आणि सकाळी तापमानात होणारी मोठी घट यामुळे धुके तयार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र धुक्यामुळे चंद्रपूरकरांची पहाट मात्र आल्हाददायक झाली आहे.

প্রেক্ষাপট

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

सकाळच्या हेडलाईन्सवर एक नजर...

1. शिवसेना-भाजपत दबावाचं राजकारण शिगेला, शिवसेना खासदार संजय राऊत आज राज्यपालांना भेटणार, शिवतीर्थावर शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेणार असल्याचा संजय राऊतांचा दावा

2. मुख्यमंत्रिपदावर अडून बसलेल्या शिवसेनेसाठी महसूल आणि अर्थ खातं सोडण्याची भाजपची तयारी, सूत्रांची माहिती, तर चर्चा फक्त मुख्यमंत्रिपदावरच होणार, सेना ठाम

3. सोनिया गांधींसोबतच्या बैठकीसाठी शरद पवार दिल्लीत दाखल, तर शेतकऱ्यांसाठी जादा मदत मागण्याच्या निमित्तानं फडणवीस शाहांना भेटण्याची शक्यता

4. हेक्टरी २५ हजारांची नकसान भरपाई द्या, सरकारवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंची मागणी, तर शेतकऱ्यांसाठी लगेच सरकार स्थापन होणं गरजेचं, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

5. दिल्लीत आजपासून ऑड-इव्हन फॉर्म्युला लागू, नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांना ४ हजारांचा दंड, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्रीही नियम पाळणार

6. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे कोकणासह उत्तर-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता, हवामान खात्याकडून मच्छिमारांनाही सतर्कतेचा इशारा

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.