LIVE UPDATES | कर्णबधिरांसाठी मंत्रालयात स्वतंत्र माहिती कक्ष स्थापन होणार

आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 04 Feb 2020 12:01 AM
भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी आज संसदेत बोलताना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा उल्लेख राजीव फिरोज खान असा केला.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आज लोकसभेत चर्चेला सुरुवात झाली.. त्यावेळी ते बोलत होते. नागरिकत्व कायदा मागे घ्यायला हे काही राजीव फिरोज खान सरकार नाही-प्रवेश वर्मा
तीन महिन्यापूर्वी आरोपीने बसमध्ये विष पिऊन गोंधळ केला होता. त्यानंतर पिडीत मुलीने फोन करून घरी याविषयी कल्पना केली. आरोपीला आणि तिच्या वडिलांना समज दिल्यानंतर पुन्हा असे होणार नाही अशी कबुली दिली होती. त्यानंतर तो तीन महिन्यानंतर हा प्रकार घडला. पिडीत मुलगी आयसीयुमध्ये असून तिच्या आई-वडिलांना देखील भेटून दिले नाही.
कर्णबधिरांसाठी मंत्रालयात, स्वतंत्र माहिती कक्ष स्थापन होणार, सामाजिक न्याय विभागाचा निर्णय. राज्यातील कर्णबधिरांसाठी त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तसेच शासनाने त्यांच्यासाठी घेतलेल्या निर्णयाची माहिती देण्यासाठी सांकेतिक भाषा तज्ज्ञांसह मंत्रालयात स्वतंत्र माहिती कक्ष स्थापन करणार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजधानी दिल्लीत प्रचार सभेतील लाईव्ह भाषण ...
रोहित शर्मा न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरित एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतून बाहेर, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची माहिती
नाशिक : पाण्यावरुन नाशिक-मराठवाडा संघर्ष पुन्हा पेटणार, नाशिक जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या एका थेंबालाही हात लावू देणार नाही, देवयानी फरांदे यांचा मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींना इशारा, नाशिकच्या मुकणे धरणातील पिण्याच्या पाण्याचं आरक्षण रद्द करण्याच्या राजेश टोपे यांच्या वक्तव्यवर फरांदे यांचा आक्षेप
सिंधुदुर्ग : वेंगुर्ले शिरोडा येथे दुचाकीस्वाराची विजेच्या खांबाला धडक, अपघातात रशियन पर्यटकाचा मृत्यू, शिरोडा राऊतवाडी येथील घडली
शिर्डी : महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात महसूल विभागाचा निषेध, संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे कडकडीत बंद, अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित, तळेगाव येथील तलाठ्याने जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
पालघर : दोन बाईकमध्ये समोरासमोर जोरदार धडक, दोघांचा मृत्यू, विक्रमगड-पाली मार्गावरील सजन फाटा येथील घटना, प्रमोद पाटील आणि अनिल बोचन अशी मृतांची नावं
मनसेच्या अपेक्षित मार्गासाठी पोलिसांची परवानगी नाही, मरिन ड्राईव्ह ते आझाद मैदान या मार्गाचा वापर कऱण्याची मुंबई पोलिसांची सूचना, कायदा सुव्यवस्थेच्या कारणावरुन परवानगी नाकारली
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदासाठी आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये जोरदार रस्सीखेच, विद्यमान पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या निवृत्तीनंतर सेवाज्येष्ठतेनुसार हेमंत नगराळे, के. व्यंकेटशम शर्यतीत
वर्धा : हिंगणघाट येथे युवतीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, युवकाचा पेट्रोल टाकून युवतीवर हल्ला, हिंगणघाटच्या नंदोरी चौकातील घटना, युवतीची प्रकृती गंभीर, पोलिसांचा तपास सुरू
जळगाव : डंपर आणि क्रूझरच्या अपघातात दहा जणांचा मृत्यू, यावल तालुक्यातील यावल फैजपूर रस्त्यावरील हिंगोणे गावाजवळची घटना
मुंबई : भाईंदर पूर्व नवघर रोडच्या अमर इस्टेटमधील स्टील कारखान्याला आग, शॉर्ट सक्रिटमुळे आग लागल्याचा अंदाज, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश
सांगली : आटपाडी तालुक्यातील झरे-पारेकरवाडी रस्त्यावर वॅगनार गाडी विहिरीत पडली, पाच जणांचा जागीच मृत्यू, गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याकडील विहिरीत कोसळली

প্রেক্ষাপট

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in


महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...


1. नागरिकत्त्व सुधारणा कायद्याला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा की विरोध? सामनाला दिलेल्या मुलाखतीनंतर चर्चांना उधाण, तर एनआरसीवरुन राज्य आणि केंद्रात संघर्षाची चिन्ह


2. बबनराव लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपचा माफीनामा, मोर्च्यातल्या गर्दीसाठी हिरोईन आणण्याची भाषा, तसेच महिला तहसीलदारांवर आक्षेपार्ह टिप्पणी


3. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतलं विद्यापीठ कर्मचाऱ्यांचं शिबीर रद्द केल्यानंतर आशिष शेलारांचा हल्लाबोल, बारमध्ये प्रशिक्षण वर्ग भरवा, मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र


4. मुंबईतल्या एलजीबीटी समुदायाच्या रॅलीत शर्जिलच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याचा किरीट सोमय्यांचा दावा, व्हिडीओ व्हायरल, पोलिसांकडून सखोल चौकशीची सोमय्यांची मागणी


5. जामिया विद्यापीठात रात्री पुन्हा एकदा गोळीबार, विद्यापीठाच्या गेट क्रमांक पाचवर गोळीबार, घटनेमध्ये कोणीही जखमी नाही


6. टीम इंडियाची न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक कामगिरी; अखेरच्या ट्वेन्टी ट्वेन्टीतही टीम इंडियाची यजमानांवर सरशी, मालिकेत 5-0 असं निर्विवाद वर्चस्व

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.