LIVE UPDATES | काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 26 Nov 2019 12:43 PM
काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांची आमदारांच्या बैठकीत घोषणा
जे डब्लू मॅरिएट हॉटेलमध्ये काँग्रेस आमदारांची बैठक, काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड होण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर पुढील प्रक्रियेसाठी थोड्याच वेळात होणार राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि विधीमंडळ सचिव या बैठकीला उपस्थित राहणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी ही बैठक होण्याची शक्यता आहे.

आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णायाचा आदर करतो. उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीसाठी आम्ही तयार आहोत. विधानसभेत आम्ही बहुमत सिद्ध करुन दाखवणारच : चंद्रकांत पाटील
जयंत पाटील राष्ट्रवादीचे अधिकृत गटनेते, विधीमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांची माहिती, लोकमतच्या हवाल्याने वृत्त
अजित पवार मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये दाखल, अजित पवार नेमक कोणाला भेटले याबाबत अद्याप माहिती नाही
आज संविधान दिनानिमित्त संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये विशेष कार्यक्रम होणार असून, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन्ही सभागृहातील सदस्यांना संबोधित करणार आहेत. संविधानाचा स्वीकार करुन 70 वर्ष पूर्ण झाली आहेत. जगभरातील संविधान बारकाईने वाचल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला होता. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी तो भारतीय संविधान सभेसमोर मांडला. याच दिवशी संविधानाने तो स्वीकारला. त्यामुळे देशात 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो.

প্রেক্ষাপট

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...

1. महाराष्ट्रातल्या सत्तापेचावर सकाळी साडेदहा वाजता सुप्रीम कोर्टात अंतिम फैसला, बहुमताच्या चाचणीचा दिवस ठरण्याची शक्यता

2. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून एकजुटीचं दर्शन, ओळख परेडसह 162 आमदारांना शपथ, तर शक्तिप्रदर्शनावेळी फक्त 130 आमदार हजर, नारायण राणेंचा दावा

3. व्हिपचा अधिकार निलंबित नेत्याला नसतो, शरद पवारांचा अजित पवारांवर निशाणा, तर अजित पवारांशी संबंध नाही, धनंजय मुंडेंची स्पष्टोक्ती

4. सत्तेचं फोटोफीनिश' फडणवीस-अजित पवारच करणार असल्याचा आशिष शेलारांचा विश्वास, तर आदित्यने सोनियांच्या नावाची शपथ घेणं हा मोठा अपमान असल्याचा टोला

5. अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या बाजूची खुर्ची रिकामी, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवारांसाठी जागा रिकामी ठेवल्याची चर्चा

6. मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला आज 11 वर्ष पूर्ण, राज्यात ठिकठिकाणी शहीद पोलिसांना आदरांजली, तर मुख्यमंत्री मुंबई पोलिस जिमखान्यात शहीदांना श्रद्धांजली वाहणार

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.