परभणी रेल्वेस्थानकावर भीषण आग, दोन्ही वेटिंगरूमसह हेल्थ इन्स्पेक्टर कार्यालय जळून खाक
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ
Last Updated:
05 Dec 2019 06:45 PM
परभणी रेल्वेस्थानकावर भीषण आग, दोन्ही वेटिंगरूमसह हेल्थ इन्स्पेक्टर कार्यालय जळून खाक :-
परभणी रेल्वे स्थानकावरील हेल्थ इन्स्पेक्टर कार्यालयात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन वेटिंग रुम जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान आग लागल्याचे समजताच अनेक प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली होती. सर्वत्र एकच पळापळ सुरु झाली काही क्षणात प्लॅटफॉर्म 1 पूर्णपणे रिकामे झाले. रेल्वे स्थानकावरील अनेकांनी आगीची घटना अग्निशमन दलाला कळवल्यानंतर अग्निशमन दलाने तात्काळ स्थानकावर येत आग विझवली. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र या आगीमुले मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
नेवाळीच्या हिंसक आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, मनसे आमदार राजू पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, नौदलाच्या भूसंपादनाविरोधात 2017 सालचं आंदोलन
पीएमसी बँक खातेधारकांना कोणताही दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार,
खातेधारकांच्या आरबीआय विरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळल्या,
भारतीय बँकांशी संबंधित सर्व निर्णय घेण्याचे अधिकार केवळ आरबीआयलाच, तेच सार्वभौम आहेत - हायकोर्ट
,
आरबीआयनं बँकेवर लावलेले आर्थिक निर्बंध हटवण्यास नकार
अंबरनाथमध्ये एमएमआरडीएचा नियोजनशून्य कारभार,
पाईपलाईन, केबल्सच्या वरच तयार केला सिमेंटचा रस्ता
,
दुरुस्तीची वेळ आल्यास 55 कोटींचा खर्च वाया जाणार!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली. यावेळी महापौर किशोरी पेडणेकरदेखील त्यांच्यासोबत उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली. यावेळी महापौर किशोरी पेडणेकरदेखील त्यांच्यासोबत उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली. यावेळी महापौर किशोरी पेडणेकरदेखील त्यांच्यासोबत उपस्थित होत्या.
सिंधुदुर्ग येथील मालवण तालुक्यातील देवबाग सुनामी बेटावरील घटना, पर्यटक बोट बुडाली, ९ पर्यटक बोटीवर असल्याची माहिती, एक महिलेचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी
संसदेच्य़ा कॅन्टिनची सबसिडी मागे घेण्यावर खासदारांचं एकमत, सूत्रांच्या हवाल्याने पीटीआयची बातमी
लोकलमधील भांडणातून सहप्रवाशाला फेकले बाहेर; टिळकनगर स्थानकाजवळील घटना, विजय गुप्ता, असं गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाचं नाव
पीएमसी बँक राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पीएमसी बँकेतील खातेदारांचे नुकसान होऊ नये म्हणून राज्य सरकारने राज्य सहकारी बँकेकडे विलिनीकरणासाठी विचारणा केली आहे. पीएमसी बँकेचं राज्य सहकारी बँकेत विलिनीकरणासाठी वेळ पडल्यास आरबीआयसोबत चर्चा करण्याची तयारी राज्य सरकारने दर्शवली आहे.
जेवढी भरती मोठी तेवढी ओहटी पण मोठी असते,हा निसर्गाचा नियम आहे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचे मेगाभारती बाबत सूचक वक्तव्य
गेल्या 106 दिवसांत अतिशय कणखर झालो, पुरावे नसतानाही तुरूगांत डांबून ठेवलं : पी. चिदंबरम
मोदी सरकारच्या धोरणांवर चिदंबरम यांचं टिकास्त्र; अर्थव्यवस्थेवर सरकारची भूमिका दिशाहीन : पी. चिदंबरम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा एक आठवडा पूर्ण होत असताना डझनभर आमदार; तसेच राज्यसभेचे एक विद्यमान खासदार भाजपला 'धक्का' देण्याच्या तयारीत आहेत : सूत्र
पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आला आहे. अंमलबजावणी संचलनालयाने मुंबईच्या विशेष PMLA कोर्टात दाखल केलेला अर्ज स्वीकारला आहे. FEO कायद्यानुसार नीरव मोदीच्या आर्थिक नाड्या आवळण्याचा तपास यंत्रणेचा मार्ग मोकळा झाला आहे.
आरबीआय क्रेडिट पॉलिसी : रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही, रेपो रेट (5.15%) आणि रिव्हर्स रेपो रेट (4.90%) कायम, याशिवाय बँक रेटही जैसे थे (5.40%)
सोलापूर : बाजार समितीचा गोंधळ आणखीन वाढला, व्यापारी, अडते आणि हमलांच्या भूमीकेनंतर शेतकरी आक्रमक, लिलाव बंद झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
अंबरनाथमध्ये ट्रकच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास रिलायन्स पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला.
अपघातात सूरज सोनावणे (वय 28 वर्षे) याचा जागीच मृत्यू, तर चेतन वाघे (वय 36 वर्षे) याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला असून पोलिसांकडून शोध सुरु आहे.
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने आणखी एक दणका दिला आहे. भाजप सरकारच्या काळात मंजूर झालेल्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. या कामांमध्ये ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवणे, कोकण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गतील कामं, ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्र विकासाची कामं, यात्रा स्थळांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम, या अंतर्गत मंजूर झालेल्या 2019-20 सालातील कामं, तसंच या योजनेअंतर्गत अजूनही कार्यआरंभ मंजुरी न दिलेल्या कामांचा समावेश आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून आज सहा जणांचा शपथविधी होणार आहे. त्यामुळे हायकोर्टातील न्यायमूर्तींची संख्या आता 71 होणार आहे. मुकुलिका जवळकर, मुकुंद सेवलीकर, वीरेंद्रसिंग बिश्त, डी. बी. उग्रसेन, सुरेंद्र तावडे आणि नितीन बोरकर हे सकाळी 10.30 वाजता न्यायमूर्तीपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्याला मुख्य न्यायमूर्तींसह सर्व न्यायमूर्तींची उपस्थिती असेल. सर्वोच्च न्यायालयाच्या कोलेजियमने या सहा जणांच्या नावांची शिफारस केली होती.
आर्थिक मंदीनंतर आता कांदा दरवाढीवरुन मोदी सरकारला घेरण्याची काँग्रेसची तयारी, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार संसद परिसरात आंदोलन करणार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी एक वाजता मुंबई महापालिका मुख्यालयात जाणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उद्या 63वा महापरिनिर्वाण दिन आहे. याच पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री महापालिकेत जाणार आहेत.
आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणात जामीनावर तुरुंगातून सुटल्यानंतर माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांची आज पत्रकार परिषद घेणार, दुपारी 12.30 वाजता काँग्रेस मुख्यालयात संबोधित करणार
गडचिरोली जिल्ह्यातील घातपाताचा कट उधळला, लोहरी-धोडराज रस्त्यावर लावलेली 15 किलो स्फोटकं निकामी, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
कोल्हापुरातील कळंबा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कळंबा कारागृह अधीक्षक शरद शेळके यांना प्रशिक्षणाच्या नावाखाली पुण्याला हलवण्यात आलं आहे. मोक्क्यातील संशयित आरोपींना कळंबा कारागृहात सन्मानाची वागणूक दिल्याप्रकरणी प्रकरणी ही कारवाई केल्याचं म्हटलं जात आहे. तीन अधिकाऱ्यांसह पंधरा जणांची चौकशी सध्या सुरु आहे.
21 हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यापूर्वी 17 हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा निर्णय झाला होता, काल आणखी चार हजार मेट्रिक टन आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय तीन जागतिक टेंडर जारी करण्यात आले आहेत. प्रत्येकी पाच हजार मेट्रिक टन कांदा आयातीचे हे टेंडर तुर्की आणि युरोपियन युनियन आणि एक जागतिक टेंडर असेल. नव्या टेंडरसाठी अनेक अटी शिथील करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकार देशातल्या विविध बाजार समितीमधून स्वतः कांदा खरेदी करणार आहे. होलसेलरसाठी 25 मेट्रिक टन आणि रिटेलरसाठी 5 मेट्रिक टन कांदा साठा करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला आहे. मुंबईत शनिवारी (7 डिसेंबर) होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते उपस्थित राहणार आहेत. समितीच्या नेत्यांनी पत्र पाठवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक घेण्याची मागणी
केली होती. ठाकरे सरकारच्या तत्परतेमुळे सीमा भागातील बांधव समाधानी आहेत.
मुंबईत आज पहाटेपासूनच पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. अरबी समुद्रात पुढील 12 तासात पवन आणि अम्फन ही दोन चक्रीवादळं निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज मुंबई, पुण्यासह उर्वरीत महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्कायमेटने याबाबतची माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेता प्रशासनाकडून संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. याआधी 'क्यार' या चक्रीवादळाने अरबी समुद्रात ज्याप्रमाणे स्थिती निर्माण केली होती, त्याचप्रमाणे सध्या समुद्रात स्थिती निर्माण झाली असल्याचे सांगण्यात आलं आहे. एकाच वेळी दोन चक्रीवादळांची निर्मिती होणं ही परिस्थिती दुर्मिळ मानली जाते.
প্রেক্ষাপট
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर....
1. महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यात बदल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला उपमुख्यमंत्रीपदासह आणखी एक कॅबिनेट मंत्रीपद, राष्ट्रवादीच्या खात्यात आता 12 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रीपदं
2. मराठा, धनगर, भीमा कोरेगाव आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याबाबत मंत्रीमंडळात खलबतं, निर्णयापूर्वी उद्धव ठाकरे आंदोलकांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार
3. सनातन संस्थेच्या बंदीसाठी कायदा करा, विजय वडेट्टीवारांची मागणी, तर भिडे-एकबोटेंना पाठीशी न घालण्याचं हुसेन दलवाईंचं आवाहन, काँग्रेसच्या मागणीने मुख्यमंत्र्यांसमोर पेच
4. भाजपात ओबीसी नेत्यांना डावललं जात असल्याची एकनाथ खडसेंची भावना, वेगळी मोट बांधण्यासंदर्भात सूचक वक्तव्य, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि खडसेंच्या गाठीभेटी वाढल्या
5. तब्बल 106 दिवसांनंतर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम तिहार कारागृहाबाहेर, आयएनएक्स मीडियाप्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून जामीन, आज राज्यसभेत उपस्थित राहणार
6. मुंबईत पावसाच्या हलक्या सरी, येत्या 24 तासात कोकण आणि गोव्यात पावसाची शक्यता, अरबी समुद्रात चक्रीवादळांची निर्मिती, मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा
एबीपी माझा वेब टीम