ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचं निधन

दिवसभरातील घडामोडींचा वेगवान आढावा...

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 27 Dec 2019 11:14 PM

প্রেক্ষাপট

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट...More

बेळगावच्या विमानतळावरून सध्या मुंबई,बंगलोर,हैद्राबाद,अहमदाबाद,मंगलोर आणि अन्य ठिकाणी विमान कंपन्यांनी सेवा सुरू केली आहे.आता त्यात आणखी काही गावांची भर पडणार आहे.त्रुजेटने बेळगावचा आपल्या मार्गात समावेश केला आहे.दहा जानेवारीपासून त्रुजेट कंपनी आपली बेळगावहून सेवा सुरू करणार आहे. बेळगाव ते हैदराबाद, बेळगाव ते म्हैसूर ,बेळगाव ते तिरुपती, बेळगाव ते कोल्हापूर आणि बेळगाव ते कडप्पा अशी विमानसेवा त्रुजेट कंपनी सुरू करणार आहे. सध्या स्टार एअर,एअर इंडिया,स्पाईसजेट,इंडिगो आदी विमान कंपन्यांची सेवा बेळगाव विमानतळावरून सुरू आहे.उडाण ३योजने अंतर्गत अनेक मार्गावर सेवा सुरू करण्यासाठी विमान कंपन्या पुढे येत आहेत. 20 जानेवारी पासून स्टार एअर बेळगाव ते इंदोर सेवा सुरू करणार आहे. सध्या बेळगाव विमानतळावरून दररोज एक हजार प्रवासी ये जा करत आहेत. विमान कंपन्यांच्या सेवेला बेळगावकर जनतेने चांगला प्रतिसाद दिल्यामुळे नव्या मार्गावर सेवा सुरू करण्यासाठी विमान कंपन्या उत्सुक आहेत.