शिवाजीराव गर्जे आणि अदिती नलावडे राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर, राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून उद्या शपथ घेणार
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात.
सांगली जिल्ह्यातील आटपाडीमध्ये घेतला अखेरचा श्वास
,
देशपांडे यांना ABP माझा पुरस्काराने केले होते सन्मानित
,
अंत्यसंस्कार शुक्रवार दिनांक 20 रोजी सकाळी 8.30 वाजता आटपाडी येथे होणार
, शिवाजीराव गर्जे हे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस
, तर अदिती नलावडे मुंबई युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल
विक्रोळी परिसरात अज्ञातांकडून हल्ला, जखमी जाधव यांच्यावर गोदरेज रुग्णालयात उपचार सुरु
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाचा पहिला प्रस्ताव खालच्या संसदेत पास, 230 वि 197 मतांनी पास झाला, सत्तेच्या दुरूपयोगाच्या आरोपाचा महाभियोगाचा पहिला प्रस्ताव मंजूर, काँग्रेसचं कामकाजात अडथळा आणल्याच्या महाभियोगाच्या दुसऱ्या प्रस्तावावर मतदान सुरू, पुढील महिन्यात सिनेटमध्ये मतदान होणार, सिनेटमध्ये मात्र ट्रम्प यांना बहुमत असल्यानं तिथे महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर होणं कठीण
প্রেক্ষাপট
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
दिवसभरातील घडामोडींचा वेगवान आढावा...
1. नागरिकत्व कायद्याविरोधात राज्यभरात एल्गार, ऑगस्ट क्रांती मैदानात डाव्या संघटनांचं केंद्र सरकारविरुद्ध आंदोलन, ठिकठिकाणी विद्यार्थ्यांकडूनही निषेध
2. विधीमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाचा चौथा दिवस, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देणार, शेतकऱ्यांबद्दल घोषणा करणार का? याकडे राज्याचं लक्ष
3. नाराज खडसे तूर्तास भाजप सोडणार नसल्याचं स्पष्ट, नागपुरात पवारांची भेट घेतली नसल्याचाही दावा, तर खडसे-पवार भेट झाल्याची मलिकांची माहिती
4. मुंबई महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही महाविकासआघाडीच्या प्रयोगाचे पवारांकडून संकेत, भाजपला दुसरा धक्का देण्यासाठी रणनिती
5. रेशन दुकानावर मटण, चिकन, आणि मासे विकण्याचा केंद्राचा मानस, गरिबांना स्वस्तात प्रथिनयुक्त पदार्थ मिळावेत म्हणून प्रस्ताव, अद्याप अंतिम निर्णय नाही
6. दुसऱी वन डे जिंकून टीम इंडियाची मालिकेत बरोबरी; रोहित शर्मा आणि लोकेश राहुलची शतकं, कुलदीप यादवची हॅटट्रिक साजरी
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -