LIVE UPDATES | देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
প্রেক্ষাপট
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर....
1. मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा उद्धव ठाकरेंचा अद्याप अंतिम निर्णय नाही, निकटवर्तीयांची माहिती, योग्य वेळी निर्णय जाहीर करणार
2. खातेवाटपावरुन महाविकासआघाडीच्या बैठकांचा सिलसिला सुरुच, विधानसभाध्यक्षपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत तर गृहमंत्रालयावरुन शिवसेना-राष्ट्रवादीत रस्सीखेच
3. महाविकास आघाडी आज सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा दिल्ली दौरा रद्द
4. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचा केंद्रीय पथकाकडून आढावा, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये अधिकाऱ्यांचा दौरा
5. मुंबईच्या काळबादेवी भागात कापडाच्या गोदामाला लागलेली आग आटोक्यात, कोट्यवधींचा माल जळून खाक, जीवितहानी नाही
6. ऐतिहासिक डे नाईट कसोटीचा पहिला दिवस टीम इंडियाचा, बांगलादेशला 106 धावांत खुर्दा, विराट-पुजाराच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताच्या 3 बाद 174 धावा
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -