LIVE UPDATES | विरारमध्ये रेती माफियांची दहशत, पोलीस अधीक्षकांवर हल्ला

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 19 Nov 2019 06:04 PM
विरारमध्ये रेती माफियांची दहशत, पोलीस अधीक्षकांवर हल्ला :- विरारमध्ये रेती माफियांची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे. विरार पूर्वेकडील खार्डी समुद्र किनारी रात्री रेती उत्खनन आणि वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंह हे विरार पोलिसांना कल्पना न देता स्वतः बॉडीगार्ड आणि चालकासह रेती बंदरावर पोहचले. त्यांनी रेती व्यावसायिकांवर धाडी घातल्या. मात्र यातील एका रेतीच्या ट्रक चालकाने चक्क पोलीस अधिक्षकांच्या अंगावरच ट्रक घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.
पीएमसी खातेदारकांच्या प्रश्नासाठी काँग्रेसचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला, एकनाथ गायकवाड, भाई जगताप आणि जिशान सिद्दीकी राजभवनात दाखल. खातेदारकांना न्याय देण्यासाठी राज्यपालांनी लक्ष घालण्याची मागणी करणार
टिकटॉक अॅपविरोधातील याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार. नियमित तारखेनुसार सुनावणी घेण्याचे हायकोर्टाकडून निर्देश. टिकटॉकमुळे तरूणाईवर विपरीत परिणाम होत असल्यानं त्यावर बंदीची मागणी करत एका आईची मुंबई उच्च न्यायालयात याचिका
शुक्रवारी मातोश्रीवर शिवसेनेची महत्त्वाची बैठक, उद्धव ठाकरे आमदारांशी चर्चा करणार :- महाराष्ट्रात सत्ताकारणामुळे जी राजकिय संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. विविध आमदारांच्या मतदारसंघात कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहेत. सर्वांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर शिवसेनेचे सर्व आमदार आणि उद्धव ठाकरे यांच्यात आता थेट संवाद होणार आहे. मातोश्रीवर होणाऱ्या या बैठकीत शिवसेना कोणता निर्णय घेणार? यावरच महाराष्ट्रात कोणाचं सरकार येणार? हे ठरणार आहे.
काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली, महाराष्ट्रातील सत्तापेचावर चर्चा झाल्याची माहिती
महाशिवआघाडीचा फॉर्म्युला ठरला, पाच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री, तर काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाला पाच वर्षांसाठी उपमुख्यमंत्रीपद, तर मंत्रीमंडळात शिवसेनेला 15, राष्ट्रवादीला 14 आणि काँग्रेसला 13 मंत्रीपदं मिळण्याची शक्यता, असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसमे दिलं आहे
पुण्यातील दिवे घाटात वारकरी दिंडीला मोठा अपघात, दोन वारकऱ्यांचा मृत्यू तर 17 जण जखमी, जखमींना हडपसर येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, ब्रेक फेल झाल्याने जेसीबी दिंडीत घुसल्याने अपघात झाल्याने अपघात, नामदेव महाराज पालखी सोहळा पंढरपूरवरुन आळंदीला जात असताना अपघात, तर संत नामदेव महाराजांचे 17 वे वंशज सोपान महाराज नामदास यांचा मृत्यू
पुण्यातील दिवे घाटात वारकरी दिंडीला मोठा अपघात, दोन वारकऱ्यांचा मृत्यू तर 17 जण जखमी, जखमींना हडपसर येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, ब्रेक फेल झाल्याने जेसीबी दिंडीत घुसल्याने अपघात झाल्याने अपघात, नामदेव महाराज पालखी सोहळा पंढरपूरवरुन आळंदीला जात असताना अपघात, तर संत नामदेव महाराजांचे 17 वे वंशज सोपान महाराज नामदास यांचा मृत्यू
मुंबईतील वाहनतळांची टंचाई दूर करण्यासाठी शहरातील 13 मॉलमधील वाहनतळ यापुढे बाहेरील वाहनांसाठी खुले करण्याचा निर्णय मुंबई वाहनतळ प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सोमवार ते शुक्रवार मॉलमधील वाहनतळ अशा वाहनांना पार्किंगसाठी वापरता येतील. त्याच वेळी मॉलच्या परिसरात वाहने उभी करण्यास मनाई करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
धुक्यामुळे शिर्डी विमानसेवा मागील पाच दिवस ठप्प आहे. मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरु, कोलकाता, इंदूर या शहरांमधून रोज 28 विमानांद्वारे साईंच्या दर्शनासाठी येणाऱ्या दोन हजार प्रवाशांना त्याचा फटका बसत आहे.

প্রেক্ষাপট

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...

1. महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेसंदर्भात सोनिया गांधींशी चर्चा नाही, शरद पवारांच्या गुगलीने शिवसेनेचं भवितव्य अधांतरी, संजय राऊतांची तातडीने पवारांशी चर्चा

2. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये एकसूत्रीवर चर्चाच नाही, संभाव्य महाशिवआघाडीला धक्का देणारं शरद पवारांचं विधान, आज दिल्लीत आघाडीच्या नेत्यांची पुन्हा खलबतं

3. विरोधी बाकावर बसताना शिवसेनेकडून शेतकरी प्रश्नावरुन सरकारवर हल्लाबोल, तर कधीच व्हेलमध्ये न उतरणाऱ्या राष्ट्रवादीचं मोदींकडून कौतुक, चर्चांना उधाण

4. मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकरांची वर्णी निश्चित, नागपुरात महापौरपद वाटून देण्याचा भाजपचा निर्णय, तर कोल्हापुरात महाशिवआघाडी

5. मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, SEBC कायद्याबाबात मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान, सरन्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सुनावणी

6. सियाचीनमध्ये झालेल्या हिमस्खलनात गस्ती पथकातले चार जवान शहीद, तर दोन जवान अत्यवस्थ, दोन सिव्हिलीयन पोर्टरचाही मृत्यू

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.