LIVE UPDATES | पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये 1 जानेवारीपासून मोबाईल बंदी, मंदिर बैठक समितीमध्ये निर्णय
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ
Last Updated:
09 Dec 2019 10:48 PM
अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचं 20 डिसेंबर पासून पासून मौन व्रत आंदोलन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले पत्र, दिल्ली येथील निर्भया प्रकरणातील आरोपींना 6 वर्षे होऊनही फाशी नाही, न्याय मिळावा यासाठी करणार करणार मौन व्रत धारण
नाराज एकनाथ खडसेंची समजूत काढण्यासाठी भाजपमध्ये हालचाली सुरू,
दिल्लीतील नेते भुपेंद्र यादव आणि राज्यातून विनोद तावडे यांच्यावर सोपवली जबाबदारी
दिल्लीतील नेते भुपेंद्र यादव आणि राज्यातून विनोद तावडे यांच्यावर सोपवली जबाबदारी
भिवंडी महानगरपालिकेत चार नगरसेवक असलेले कोणार्क विकास आघाडीच्या नवनियुक्त महापौर प्रतिभा विलास पाटील व काँग्रेस पक्षातून बंडखोरी करत महानगरपालिकेत उपमहापौर पदी नियुक्त झालेले इम्रान खान यांनी आज रोजी आपला पदभार स्वीकारला
कुर्ला नेहरूनगर येथील पोलीस वसाहतीत राहाणारे पोलीस शिपाई सुनील भगत यांचा नाग चावून मृत्यू, सुनील भगत हे पुणे पोलिसात कार्यरत होते, तर त्यांची पत्नी देवनार पोलीस ठाण्यात कार्यरत
साताऱ्यातील वाई महाबळेश्वर रोडवरील पसरणी घाटातील घटना
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये 1 जानेवारीपासून मोबाईल बंदी, मंदिर बैठक समितीमध्ये निर्णय
दोन एसटीची समोरा समोर धडक, खाजगी एसटी पलटी,
एक एसटी दरीत जाता जाता वाचली,
50 च्या वर प्रवाशी गंभीर जखमी
,
जखमी प्रवाशांमध्ये अनेक प्रवाशी पर्यटक
एक एसटी दरीत जाता जाता वाचली,
50 च्या वर प्रवाशी गंभीर जखमी
,
जखमी प्रवाशांमध्ये अनेक प्रवाशी पर्यटक
दोन एसटीची समोरा समोर धडक, खाजगी एसटी पलटी,
एक एसटी दरीत जाता जाता वाचली,
50 च्या वर प्रवाशी गंभीर जखमी
,
जखमी प्रवाशांमध्ये अनेक प्रवाशी पर्यटक
एक एसटी दरीत जाता जाता वाचली,
50 च्या वर प्रवाशी गंभीर जखमी
,
जखमी प्रवाशांमध्ये अनेक प्रवाशी पर्यटक
पसरणी घाटात दोन एसटीची धडक, एसटी दरीत जाता जाता वाचली
मुंबईतल्या 120 डबल डेकर बसेसपैकी 72 बसेस 2020 मध्ये स्क्रॅप होणार, मुंबईतल्या निम्म्यापेक्षा जास्त डबलडेकर बसचं आयुर्मान संपलं
बारामतीच्या एमआयडीसी मध्ये बिबट्याचा वावर, बाहुली कंपनीच्या सीसीटीव्ही मध्ये आढळून आला बिबट्या वनविभागाची माहिती, कटफळ परिसरातील नागरिकांनी सतर्क रहाण्याचे वनविभागाच्या वतीने आवाहन, बिबट्याचा शोध घेण्यासाठी पेट्रोलिंग सुरू
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव म्हणून विकास खारगे यांची नियुक्ती, कार्यभार स्वीकारला, खारगे 1994 च्या बॅचचे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी, ते वन विभागाचे प्रधान सचिव होते. भारतीय प्रशासन सेवेत त्यांनी त्यांच्या बॅचमध्ये देशात 34 वा आणि महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळविला होता. 2014 मध्ये त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यांचे सचिव म्हणून देखील काम पाहिले होते.
बृहन्मुंबईसह विविध महानगरपालिकांमधील सात रिक्तपदांसाठी 9 जानेवारीला मतदान, बृहन्मुंबई, नाशिक, मालेगाव, नागपूर, लातूर व पनवेल या सहा महानगरपालिकांमधील सात रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 9 जानेवारीला मतदान; तर 10 जानेवारी रोजी मतमोजणी, राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांची माहिती
एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला
अमरावतीत दोन पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा, अमरावती जिल्ह्यात तीन पंचायत समितीचे निकाल आज लागले. ज्यामध्ये तीन पैकी दोन पंचायत समितीवर काँग्रेसचा तर एक वर भाजपने काबीज केली आहे. तिवसा पंचायत समितीवर आमदार यशोमती ठाकूर यांनी मुसंडी मारत आपले सहाही उमेदवारांना निवडून आणले. तर धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर सहा पैकी चार उमेदवार काँग्रेसचे माजी आमदार विरेंद्र जगताप यांनी निवडून आणून पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकवला. तर चांदुर बाजार पंचायत समितीवर भाजपने पुन्हा सत्ता कायम राखली याठिकाणी सहा पैकी चार उमेदवार हे भाजपचे निवडून आले तर काँग्रेसचे दोन उमेदवार निवडून आले. महाविकास आघाडी झाल्याने याठिकाणी त्याचा काही प्रमाणात फायदा झाल्याचं पाहायला मिळालं.
शिवसेनेचं नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडण्याच्या बाजूने मतदान, विधेयक मांडण्याच्या बाजूने 293 मतं, तर विधेयक मांडण्याच्या विरोधात 82 मतं
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार नको, अशी भूमिका ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन डी पाटील यांनी घेतली आहे. नामविस्तार झाल्यास विद्यापीठाच्या नावाचा उल्लेख शॉर्ट फॉर्ममध्येच होईल, असंही ते म्हणाले.
हैदराबाद एन्काऊंटर प्रकरण : तेलंगणा हायकोर्टात दुपारी अडीच वाजता सुनावणी होणार. आरोपींच्या एन्काऊंटर प्रकरणी हायकोर्टात आणखी एक याचिका दाखल. आता तीन याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार. हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा तेलंगणा पोलिसांकडून 6 डिसेंबर रोजी एन्काऊंटर
जामसांडेकर हत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून कुख्यात गुंड अरुण गवळीवर मोक्का आणि जन्मठेपेवर शिक्कामोर्तब
भाजप नेते एकनाथ खडसे रात्री रेल्वेने दिल्लीला रवाना, आज पक्षक्षेष्ठींना भेटण्याची शक्यता
मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पावर हायकोर्टाने दिलेल्या स्थगितीबाबत बुधवारी (11 डिसेंबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. कोस्टल रोडमुळे पर्यावरणाला हानी पोहोचेल, असा दावा एका याचिकेत केला होता. त्यानंतर हायकोर्टाने कोस्टल रोडला स्थगिती दिली होती. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावरील कोस्टल रोडसाठी तब्बल 12 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
नागरिकत्व विधेयकाला विरोध नाही मात्र विधेयकामध्ये सुधारणा करण्याची आमची मागणी, आसामच्या लोकांना 25वर्षे मतदानाचा अधिकार देऊ नये : संजय राऊत
दिल्ली-फिल्मिस्तान परिसरातील कारखान्यात पुन्हा आग, काल आगीत 43 जणांचा मृत्यू, 59 जण सुखरुप बचावले, आज दुसऱ्या दिवशी त्याच इमारतीमध्ये आग
हैदराबाद एन्काऊंटरप्रकरणी आज तेलंगणा हायकोर्टात सुनावणी, सकाळी साडेदहा वाजत होणार सुनावणी.
येडियुरप्पा सरकारचं भवितव्य आज ठरणार आहे. कारण कर्नाटक पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सरकार टिकवण्यासाठी येडियुरप्पांना 15 पैकी 6 जागा जिंकण्याची गरज आहे. अनेक एक्झिट पोलमध्ये भाजप 9 जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या 15 पैकी 12 जागा काँग्रेस तर 3 जागा जदसेने जिंकल्या होत्या.
প্রেক্ষাপট
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...
- नागपुरात 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचे प्रयत्न, दगडाने ठेचलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला, तर नाशिकमध्ये 7 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार
- बलात्काराची प्रकरणं 6 महिन्यांत मार्गी लावा, कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांच्या हायकोर्टाला पत्राद्वारे सूचना, तर देशात 89 टक्के निर्भया निधीचा वापरच नाही
- भाजप शिवसेनेशी दोन आघाड्यांवर लढणार, 2022 मध्ये मुंबईत महापौर भाजपचा, चंद्रकांत पाटलांचा दावा तर भाजप फार काळ सत्तेबाहेर राहणार नाही, देवेंद्र फडणवीस यांचा दावा
- ठाकरे सरकार फार काळ टिकणार नाही, भाजप खासदार नारायण राणेंचं भाकित, विकासकामांच्या स्थगितीवरुनही सरकारवर टीकास्त्र
- बाळासाहेबांच्या स्मारकासाठी औरंगाबादेत झाडांची कत्तल होणार नाही, महापौरांचा विश्वास तर वृक्षतोडीच्या मुद्द्यावरुन अमृता फडणवीस, प्रियंका चतुर्वेदी यांच्यात ट्विटरवॉर
- तिरुअनंतपुरममध्ये दुसऱ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजचा टीम इंडियावर आठ विकेट्सनी विजय, सिमन्सच्या नाबाद अर्धशतकामुळे विंडीजची मालिकेत 1-1 अशी बरोबरी
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -