LIVE UPDATES | पुण्यातील भाऊ रंगारी गणपती मंडळातील दानपेटी चोरीला
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
पुण्यात प्रसिद्ध असलेल्या अशी ख्याती असलेल्या भाऊ रंगारी गणपती मंडळाची दान पेटी चोरीला गेली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या विश्रामबाग आणि फरासखाना अशा दोन मुख्य पोलिस स्टेशनपासून दोन मिनिटांच्या अंतरावर हे गणपती मंदिर आहे. 26 तारखेला पहाटे 3 वाजून 31 मिनिटांनी दोन अज्ञात चोरट्यांनी गणपती मंदिराचे दरवाजा तोडून आत प्रवेश करुन दानपेटी चोरली. याप्रकरणी भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या वतीने फिर्याद विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल केली.

প্রেক্ষাপট
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...
1. 20 वर्षांनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, शिवतीर्थावर संध्याकाळी उद्धव ठाकरेंचा शपथविधी, उद्धव ठाकरेंसोबत तीनही पक्षाचे प्रत्येकी दोन मंत्री आज शपथ घेणार
2. उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींना फोनवरुन आमंत्रण, तर शपथविधीच्या निमंत्रणासाठी आदित्य ठाकरे-मिलिंद नार्वेकरांकडून सोनिया गांधी, मनमोहन सिंह यांची भेट
3. उपमुख्यमंत्रीपदासाठी जयंत पाटलांचं नाव निश्चित, छगन भुजबळही मंत्रीपदाची शपथ घेणार, तर पृथ्वीराज चव्हाणांकडे विधानसभेचं अध्यक्षपद सोपवण्याची शक्यता
4. उद्धव-राज भविष्यात एकत्र येतील, चंदूमामा वैद्य यांना विश्वास, उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना निमंत्रण
5. महाराष्ट्र धर्माचं मर्म तपासा, 'सामना'तून भाजपला खोचक टोला, तर, शिवसैनिकाला पालखीत बसवणार होता ना? 'तरुण भारत'मधून शिवसेनेला सवाल
6. सिंचन घोटाळ्याचे गाडीभर पुरावे रद्दीत, एकनाथ खडसेंचा देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला, सगळ्यांना सोबत न घेतल्यानेच पराभव झाल्याची खंत
एबीपी माझा वेब टीम
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -