चंद्रकांत खैरे आणि अब्दुल सत्तार एकत्र मातोश्रीवर, मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेणार
आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ
Last Updated:
06 Jan 2020 05:15 PM
चंद्रकांत खैरे आणि अब्दुल सत्तार एकत्र मातोश्रीवर, मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेणार, सत्तार यांच्या नाराजी नाट्यानंतर खैरे यांनी सत्तार हे गद्दार आहेत, अशी टीका केली होती.
कोल्हापूरमधील मटण विक्री बेमुदत बंद, मटण विक्रेत्यांची भूमिका, बकरी महाग मिळतात तर कृती समिती दर कमी करण्याचा आग्रह करत असल्यामुळे बेमुदत बंदचा निर्णय, मटणाचा दर आमचा अधिकार अशा घोषणा देत मटण मार्केटमध्ये ठिय्या
वर्धा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या सरिता गाखरे विजयी, उपाध्यक्षपदी भाजपच्या वैशाली येरावार विजयी, शिवसेनेचीही दोन मत भाजपला मिळाली
अब्दुल सत्तार-चंद्रकांत खैरे यांच्यातील वाद पूर्णपणे मिटवण्याचा प्रयत्न केला जाईल, अब्दुल सत्तार यांची समजूत काढली आहे, चंद्रकांत खैरे मला भेटणार आहेत, मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्यासमोर आज या वादाला पूर्णविराम मिळेल, एकनाथ शिंदेंची माहिती
अमरावतीत एका तरुणाने 17 वर्षीय तरुणीला भरदिवसा चाकूने भोकसल्याची धक्कादायक घटना, तरुणीवर हल्ल्यानंतर तरुणाने स्वतःच्या पोटातही चाकू मारुन घेतला, यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु, धामणगाव रेल्वे शहरातील दादाराव अडसड क्रीडांगण जवळ ही घटना घडली
दिल्लीतील विधानसभा निवडणुकांची आज घोषणा; निवडणूक आयोगाची दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद...
जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील भाजप कार्यलयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन...
जवाहारलाल नेहरू विद्यापीठात काल जे झालं ते लाजिरवाणं, जितेंद्र आव्हाड यांचा सरकारवर टीका...
मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी, अमित शाह मुर्दाबादच्या घोषणा, भाजप कार्यालयासमोर आंदोलन करणारे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल, सदिच्छा भेट घेण्यासाठी गेहलोत मातोश्रीवर
पीजी मेडिकल संदर्भात मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळली, मागच्या सुनावणी वेळी वरिष्ठ वकील न दिल्यामुळे वाद उपस्थित करण्याचा प्रयत्न झाला होता, आज ही याचिका फेटाळल्यामुळे मूळ प्रकरणावर कुठलाही परिणाम नाही
जेएनयूतील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
दिव्यात अनाधिकृत बांधकाम कामाविरुद्ध कारवाईला नागरिकांचा विरोध; मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेची कारवाई, पालिकेच्या कारवाईला नागरिकांचा विरोध..
ज्यांना मंत्रीपदापासून डावलण्यात आले ते गुहागर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांची नाराजी दूर करण्यासाठी नवनिर्वाचित आमदार उदय सामंत हे आज चिपळूण पाग येथील भास्कर जाधव यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भास्कर जाधव हे माझे सीनिअर आहेत आणि आमचे मैत्रीचेही नाते आहे, असं उदय सामंत म्हणाले.
ज्यांना मंत्रीपदापासून डावलण्यात आले ते गुहागर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांची नाराजी दूर करण्यासाठी नवनिर्वाचित आमदार उदय सामंत हे आज चिपळूण पाग येथील भास्कर जाधव यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भास्कर जाधव हे माझे सीनिअर आहेत आणि आमचे मैत्रीचेही नाते आहे, असं उदय सामंत म्हणाले.
दक्षिण मुंबईतील नागपाडा परिसरातील चिनोय इमारतीत आग, लेव्हल दोन नंबरचा कॉल, अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि दोन पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल
जेएनयू हल्ल्याच्या विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद, दुपारी एक वाजता मातोश्रीवर पत्रकार परिषद
मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावर विद्यार्थ्यांकडून जेएनयूतील हल्ल्याचा निषेध
नागपूर : ट्रकने बाईकला दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू तर एक जखमी, कळमना परिसरात चिखली फ्लायओव्हरवरील घटना, काल मध्यरात्रीची घटना
नागपूर : ट्रकने बाईकला दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू तर एक जखमी, कळमना परिसरात चिखली फ्लायओव्हरवरील घटना, काल मध्यरात्रीची घटना
केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि बॉलिवूड आणि टीव्ही सिरीयलमधील अभिनेते डायरेक्टर आणि प्रोड्यूसर यांची ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये पियुष गोयल आणि कलाकारांमध्ये एनआरसी आणि सीएएवर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र यावर बोलण्यास कलावंतांनी नकार दिला. या बैठकीला कुणाल कोहली, अभिषेक कपूर, प्रसून जोशी, अनु मलिक, उर्वशी रोटेला, विपुल शहा, कैलास खेर, भूषण कुमार, शान, शैलेश लोढा हे कलाकार उपस्थित होते.
প্রেক্ষাপট
आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
1. दिल्लीत जेएनयूच्या हॉस्टेलमध्ये अज्ञातांकडून जोरदार राडा, छात्र संघ अध्यक्षा आइशी घोषवर जीवघेणा हल्ला, अनेक विद्यार्थी जखमी
2. जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबई पुण्यात विद्यार्थ्यांचं मध्यरात्री आंदोलन, शरद पवार, आदित्य ठाकरेंकडून ट्विट करुन हल्ल्याचा निषेध
3. राज ठाकरे मराठीवरुन हिंदुत्वाकडे वाटचाल करणार, मनसेचा झेंडा भगव्य़ा रंगात रंगणार असल्य़ाची माहिती, शिवमुद्रेचाही होणार समावेश
4. सुधारीत नागरिकत्व कायदा महाराष्ट्रात लागू होणार नाही, मंत्री वर्षा गायकवाड यांचा दावा, छात्र भारतीच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी, अमित शाहांवर हल्लाबोल
5. आताच शपथ घेतलीय, अजून खिसे गरम व्हायचेत, नवनिर्वाचित मंत्री यशोमती ठाकुरांचं वादग्रस्त वक्तव्य, वाशिममधील लक्ष्मीदर्शनाच्या वक्तव्यावरुनही ठाकुर वादात
6. महाराष्ट्र केसरीच्या तिसऱ्या दिवशी अभिजीत कटके, बाला रफिक शेख, सागर बिराजदारचा दबदबा, माती विभागातल्या तानाजी झुंजुरके आणि सिकंदर शेखनं जिंकली कुस्तीप्रेमींची मनं