LIVE UPDATES : अजित पवारांच्या ट्वीटला राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांचे उत्तर..
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ
Last Updated:
25 Nov 2019 12:16 PM
महाविकासआघाडी बहुमत असून महाराष्ट्रात त्यांचाच विजय होणार आहे - रणदीप सुरजेवाला
बहुमत सिद्ध करण्यासाठी कोणतीही मुदत नाही - भाजप
आम्ही 162 आमदारांच्या सह्याचं पत्र राज्यपालांना दिले असून सत्तास्थापनेसाठी दावा केला आहे - महाविकासआघाडी
आम्ही 162 आमदारांच्या सह्याचं पत्र राज्यपालांना दिले असून सत्तास्थापनेसाठी दावा केला आहे - महाविकासआघाडी
पिंपरी चिंचवडच्या रावेत भागात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे फ्लेक्स, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवेनी हे फ्लेक्स लावलेले आहेत. फ्लेक्सवर राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख केलेला नाही. अजित पवारांना पाठिंबा देतानाचा शहरातील हे पहिलेच नगरसेवक आहेत.
उभं आडवं चिरलं तरी शरीरात राष्ट्रवादी राहणार : अजित पवार
अजित पवारांच्या ट्वीटला राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांचे उत्तर..
अजित पवार यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार
हॉटेल रेनेसाँ येथे राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची बैठक सुरु,
तुमची काही अडचण आहे का? तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का? असे सवाल शरद पवार यांनी आमदारांना विचारले.
आम्हाला अजित पवारांचा फोन आल्याचे काही आमदारांनी शरद पवारांना यावेळी सांगितले, परंतु आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास आमदारांनी शरद पवारांना दिला.
हॉटेल रेनेसाँ येथे राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची बैठक सुरु
मी शिवसेनेसोबतच राहणार, आमदार बच्चू कडू
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विधिमंडळ गटाच्या बैठकीसाठी वसंत स्मृतीत दाखल, थोड्याच वेळात भाजप व मित्र पक्षांसह समर्थन देणाऱ्या सर्व अपक्ष आमदार राहणार उपस्थित
महाविकासआघाडीकडे बहुमत असल्याचा दावा, कपिल सिब्बल यांचा दावा, सुप्रीम कोर्टात सुनावणी
राज्यात सरकार स्थापनेबाबत महत्वाचा निर्णय, उद्या 10.30 वाजता कोणत्या आधारावर सरकार स्थापनेची परवानगी दिली ते कागदपत्रं न्यायालयात सादर करण्याचे कोर्टाचे आदेश, तुषार मेहता यांना आदेश
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच : पक्षकारांचे वकील कोर्टात पोहोचले, थोड्याच वेळात सुप्रीम कोर्टात सुनावणी
रोहतगी म्हणाले, या नेत्यांनी आम्हाला सरकार बनवू द्या असा आदेश द्यावा अशी विनंती केली आहे, असा आदेश कोर्ट देऊ शकतं का? यावर जस्टीस रमण हसत म्हणाले, आमच्याकडे लोक काहीही मागणी करतात, त्याला काही मर्यादाच नाही
अजित पवारांनी आमदारांच्या पत्राचा दुरुपयोग केला, अशोक चव्हाण यांचा आरोप, महाविकासआघाडीकडे बहुमत असल्याचे देखील स्पष्टीकरण
घटनेच्या कलम 361 नुसार राज्यपालांच्या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकत नाही, फक्त बहुमत चाचणी एकमेव मार्ग : रोहतगी
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच : थोड्याच वेळात सुप्रीम कोर्टात सुनावणी
राज्यपाल कुणालाही बोलवून शपथ देऊ शकत नाही : सुप्रीम कोर्ट
भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण रेनेसॉ हॉटेलला, काल रात्रीपासून राष्ट्रवादीच्या आमदारांचा मुक्काम याच हॉटेलमध्ये
अभिषेक मनू सिंघवी राष्ट्रवादीचे वकील तर कपिल सिब्बल शिवसेनेचे वकील
जयंत पाटील राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर, आमदारांचं पत्र घेऊन पाटील राजभवनाकडे निघाले
राज्यपाल कुणालाही बोलवून शपथ देऊ शकत नाही : सुप्रीम कोर्ट
आमदार अनिल भाईदास पाटील राष्ट्रवादीसोबतच, ट्वीट करत दिली माहिती, सध्या राष्ट्रवादीकडे 49 आमदार
अजित पवारांच्या 41 आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचा दावा खोटा : सिंघवी
जयंत पाटील सिल्व्हर ओकला पोहचले, संजय काकडे देखील सिल्वर ओक वर
लवकरात लवकर बहुमत चाचणी सिद्द करण्याचे आदेश द्या, संघवींची कोर्टात माहिती
आज राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार परत येण्याची शक्यता- नवाब मलिक यांचं ट्वीट
याचिकेमध्ये चुका आहेत, रविवारी सुनावणी घेण्याची गरज नव्हती, महाधिवक्ता तुषार मेहता यांचा युक्तीवाद
अजित पवार समर्थक माढ्याचे आमदार बबन शिंदे सकाळी सिल्वर ओक वर शरद पवार यांना भेटायला आले
हायकोर्टात आधी याचिका दाखल करायला हवी होती : तुषार मेहता
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली,
सुप्रीम कोर्टातल्या महत्वाच्या घडामोडी आधी दोघांची भेट
,
राज्यपालांच्या निर्णयाविरोधात याचिकेवर आज सुनावणी
फडणवीसांनी बहुमताचं पत्र कधी दिलं, जस्टीस भूषण यांचा सवाल
भाजपकडे बहुमत असेल तर आजच सिद्द करायला सांगा : कपिल सिब्बल
প্রেক্ষাপট
१. पुतण्या अजितदादांवर काका शरद पवारांचा डाव भारी, ५४ पैकी ४९ आमदार पक्षात परतले, तर राजभवनातल्या शपथविधीनंतर दौलत दरोडा-नितीन पवार बेपत्ता
२. राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेतेपदावरुन अजितदादांची हकालपट्टी, व्हिप काढण्याचे अधिकार नाही, जयंत पाटलांची नियुक्ती अवैध असल्याचा शेलारांचा दावा
३. भाजपच्या सत्तास्थापनेविरोधात महाविकासआघाडीची सर्वोच्च न्यायालयात धाव, आज सकाळी साडेअकरा वाजता सुनावणी
४. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीचे आमदारही हॉटेल मुक्कामी, रेनेसान्स हॉटेलमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांना सांभाळण्याची शिवसेना नेत्यांवर जबाबदारी, काँग्रेस आमदार जयपूरला हलवणार
५. अजित पवारांकडून राज्यपालांची फसवणूक झाल्याची शक्यता, पुतण्याच्या बंडखोरीवर पवारांची प्रतिक्रिया, तर फर्जिकल स्ट्राईक म्हणत उद्धव ठाकरेंची टीका
६. पवार परिवारात फूट पडल्यानंतर सुप्रिया सुळे भावूक, कार्यकर्त्यांची अजितदादांविरोधात घोषणाबाजी, तर भाजपचं राज्यभर जोरदार सेलिब्रेशन