LIVE UPDATES | नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला महाराष्ट्र केसरी 2020

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 07 Jan 2020 06:43 PM
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला महाराष्ट्र केसरी 2020
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला महाराष्ट्र केसरी 2020
निर्भया बलात्कार प्रकरणी दोषींची फाशी कायम; डेथ वॉरंट जारी, 22 जानेवारीला सकाळी सात वाजता शिक्षेची अंमलबजावणी
देवरी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग सहावर कार अनियंत्रीत होऊन कोसळली. पुलाखाली दोन महिलांचा जागीच मृत्यू, तर एक पुरुष, एक महिला गंभीर जखमी. रायपूरकडुन नागपूरच्या दिशेने जाताना दुपारी दीडच्या सुमारास घटना घडली.
ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार अनुपस्थित, मनधरणीचे प्रयत्न सुरू
आझाद मैदानातील विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, जेएनयू हल्ल्याविरोधात विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं होतं. गेट वे ऑफ इंडियावरुन आझाद मैदानात रवानगी केल्यानंतर दोन तासांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय
पालघर जिल्ह्यात पालघर जिल्हा परिषद आणि ८ पंचायत समितीसाठी सकाळी साडेसात ते साडेनऊ या पहिल्या टप्प्यात 9.69 टक्के मतदान
पाच वर्षात महाराष्ट्र ओरबाडून काढला, स्वातंत्र्यानंतरच सर्वाधिक भ्रष्ट सरकार, अनिल गोटे यांची देवेंद्र फडणवीसांवर गंभीर टीका
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आजच्या कॅबिनेट बैठकीला हजर राहणार नाहीत, महत्वाचं खातं मिळालं नसल्यानं नाराजी - सुत्र
मुंबईतील मुलुंडमध्ये समाजकंटकांकडून गाड्यांची तोडफोड, नशेखोर लोकांच्या वादातून घटना घडल्याची माहिती
नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेच्या 58 जागांसाठी 270 उमेदवार रिंगणात आहेत. तर पंचायत समितीच्या 116 जागांसाठी 497 उमेदवार मैदानात उतरले आहेत. एकूण 1828 मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रिया पार पडेल. 2012 नंतर इथे पहिल्यांदाच निवडणूक होत आहे.

पालघर जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान. जिल्हा परिषदेच्या 57 तर आठ पंचायत समित्यांच्या 114 जागांसाठी मतदान. राज्य सरकारच्या स्थापनेनंतर लागलेली जिल्हा परिषदची सार्वत्रिक निवडणूक राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची

अकोला : अकोल्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदानाला उत्साहात सुरुवात, ऐन थंडीतही मतदारांचा मतदानासाठी उत्साह
अकोला : अकोल्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदानाला उत्साहात सुरुवात, ऐन थंडीतही मतदारांचा मतदानासाठी उत्साह
नंदुरबार : नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेच्या 56 गटांसाठी 225 उमेदवार रिंगणात असून पंचायत समितीच्या 112 गणांसाठी 359 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र मतदारांचा प्रतिसाद अल्प असून मतदान केंद्रांवर फक्त निवडणूक कर्मचारी दिसून येत आहेत. ग्रामीण भागात थंडीचा जोर कायम असल्याने 10 वाजल्यानंतर मतदार मतदानासाठी बाहेर पडतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

गेट वे ऑफ इंडियावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं नाही, आझाद मैदानात रवानगी केली, मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण
गेट वे ऑफ इंडियावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं नाही, आझाद मैदानात रवानगी केली, मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण
जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच, आंदोलकांना आझाद मैदानात जाण्याची पोलिसांची सूचना, मात्र आंदोलक गेट वे ऑफ इंडियावरच ठाण मांडून, काही आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

প্রেক্ষাপট

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर

1. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात सात नवी खाती बनवण्याचा प्रस्ताव, महाविकास आघाडीतल्या नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारचा उतारा

2. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या पाच जिल्हा परिषदांसाठी आज मतदान, महाविकास आघाडीच्या समीकरणांमुळे फडणवीस-महाजनांची प्रतिष्ठा पणाला

3. चंद्रकांत खैरे आणि अब्दुल सत्तार यांच्यात अखेर दिलजमाई, मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरेंकडून दोघांनाही समज, वाद मिटल्याचं खैरे-सत्तारांकडून स्पष्ट

4. जेएनयूतला हल्ला पूर्वनियोजित कट, कोडवर्डच्या माध्यमातून रणनीती आखली, दिल्ली पोलिसांकडून 50 जणांविरोधात गुन्हा, तर मुंबईत विद्यार्थी संघटनांचं आंदोलन

5. जेएनयू हल्ल्याच्या निषेधासाठी बॉलिवूड कलाकार रस्त्यावर, अनुराग कश्यप, स्वरा भास्कर, तापसी पन्नू यांचा सहभाग, गेट वे ऑफ इंडियावर 32 तासांपासून विद्यार्थ्यांचा ठिय्या

6. महाराष्ट्राला यंदा नवा महाराष्ट्र केसरी मिळणार, लातूरचा शैलेश शेळके आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी लढणार

एबीपी माझा वेब टीम

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.