LIVE UPDATE | इकबाल मिरची प्रकरणी राज कुंद्रांना ईडीकडून समन्स

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 28 Oct 2019 11:06 PM
इकबाल मिरची प्रकरणी राज कुंद्रांना ईडीकडून समन्स , चौकशी करण्यासाठी पाठविला समन्स, 4 नोव्हेंबर रोजी राज कुंद्रा होणार हजर
परभणी : घराची भिंत आणि छत कोसळून पिता-पुत्राचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी, सोनपेठच्या कानसूरकर गल्लीतील घटना, सतत पडणाऱ्या पावसाने भिंत भिजून पडली
कोल्हापूर : गोकुळ मल्टिस्टेट करण्याचा निर्णय रद्द, गोकुळच्या सत्ताधारी संचालकांचा निर्णय, गोकुळचे चेअरमन रवींद्र आपटे यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती
'सामना'तून होणारी टीका थांबेपर्यंत शिवसेनेशी चर्चा न करण्याची भाजपची भूमिका, सूत्रांची माहिती, अमित शाह यांचा मुंबई दौरा अनिश्चित असल्याचीही चर्चा
मुंबई : सत्तास्थापनेसाठी राजकीय हलचालींना वेग, शिवसेना नेते दिवाकर रावते 10.30 वाजता तर मुख्यमंत्री 11 वाजता राज्यपालांना भेटणार
परभणी : घराची भिंत आणि छत कोसळून पिता-पुत्राचा मृत्यू, सोनपेठच्या कानसुरकर गल्लीतील घटना, सतत पडणाऱ्या पावसाने भिंत भिजल्याने पडली, अरुण टेकाळे आणि मुलगा मंदार टेकाळेचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नागपूरच्या उदयनगर चौकात एकाची तीक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या, जितेंद्र बढे असं मृतकाचे नाव, जितेंद्र एका रुग्णालयात टेक्निशियन म्हणून काम करायचा, आरोपी फरार
वर्धा : रात्री काही भागात जोरदार पावसाची हजेरी, विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला, सकाळपासून ढगळ वातावरण कायम
अमरावती : युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांचा भाजपला बिनशर्त पाठिंबा, रवी राणा अमरावतीतील बडनेरा येथील आमदार
सांगली : शहरातील मारुती रोडवरील आनंद टॉकीजसमोर मध्यरात्री भीषण आग, बेकरी आणि आसपासची दोन दुकाने आगीत भस्मसात, अग्निशमन पथकाच्याने रात्रीत आगीवर नियंत्रण मिळवलं, आगीचे कारण अस्पष्ट

প্রেক্ষাপট

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
1. शिवसेना महाराष्ट्राच्या सत्तेच्या कॅनव्हासचा रंग बदलणार, माझाला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊतांचा भाजपला इशारा, अमित शाहांच्या मुंबई दौऱ्याकडे लक्ष

2 .कामं करुनही जनतेनं कौल दिला नाही, चंद्रकांत पाटलांकडून भाजपमुक्त कोल्हापूरचं विश्लेषण, मंडलिकांसारख्या प्रवृत्तीचा बंदोबस्त करण्याचं शिवसेनेला आवाहन

3. साताऱ्यात पावसात भिजल्यानंच जास्त मतं मिळाली, बारामतीत चिमुकलीच्या प्रश्नाला शरद पवारांचं दिलखुलास उत्तर, कविता करता येत नसल्याचंही स्पष्ट

4. वृद्धाश्रमात दिवाळी साजरी करण्यावरुन आमदार रवी राणा आणि शिवसेना जिल्हाध्यक्ष दिनेश बुब यांच्यात जोरदार राडा, समर्थकांसह दोन्ही नेते भिडले

5. आयसिस दहशतवादी संघटना जन्माला घालणारा अबू अल बगदादीचा खात्मा, अमेरिकेच्या कारवाईसंदर्भात खुद्द ट्रम्प यांची माहिती

6. दीपावलीनिमित्त रोषणाईनं उजळून निघाला आसमंत, घरोघरी उत्सव दीपवली पाडव्याचा, जवानांना मिठाई भरवून मोदींनी साजरी केली दिवाळी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.