ऐन हिवाळ्यामध्ये परभणी शहरासह अनेक तालुक्यांमध्ये आज मुसळधार पाऊस

आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 02 Feb 2020 10:54 PM
परभणी : ऐन हिवाळ्यामध्ये परभणी शहरासह अनेक तालुक्यांमध्ये आज मुसळधार पाऊस झालाय. या पावसामुळे हातातोंडाशी आलेला हरभरा गहू आणि ज्वारी हे तीनही पीक शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सायंकाळी सातच्या सुमारास अचानकपणे वातावरणात बदल झाला आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला. यानंतर काही काळ पावसाने विश्रांती घेतली आणि परत दहाच्या सुमारास सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू झाला. यामुळे पावसाळ्या सारखच वातावरण सर्वत्र निर्माण झाले होते. महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी खरीप हंगाम गेल्यानंतर रब्बी हंगामात मोठ्या मेहनतीने पिकवलेला हरभरा गहू ज्वारी हे पीक या पावसामुळे हातून जाण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेच वातावरण आहे
वर्धा : सीएए, एनआरसीच्या विरोधात हिंगणघाट येथे धरणे आंदोलन. शाहीनबागपासून प्रेरणा घेत आंदोलनाची सुरुवात, मागील बारा दिवसांपासून सातत्यानं आंदोलन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन, आंदोलनात शेकडो महिलांचा सहभाग, दररोज सायंकाळी दोन तास केलं जातंय आंदोलन
नांदेड शहरातील अनेक भागात हलक्या पावसाची हजेरी, 10 मिनिटं बरसून बंद
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी गंगाराम हॉस्पीटलमध्ये दाखल, प्रियांका गांधी आणि राहुल गांधी देखील सोबत, सूत्रांची माहिती
NRC आणि CAA च्या विरोधामध्ये भिवंडीतील मिल्लत नगर परिसरातही 'भिवंडी शाहीनबाग' आंदोलन करण्यात येत असून आज तिसरा दिवस आहे. या आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येने मुस्लिम आणि हिंदू समाजातील महिला सहभागी झाल्या आहेत. यामध्ये लहान मुलांचा देखील सहभाग आहे. महिला आपल्या घरातील काम आटोपून महिला या ठिकाणी जमत विरोध करीत आहेत. तर दुसरीकडे या आंदोलनाच्या माध्यमातून NRC नहीं रोजगार दो, कागज नहीं दिखाएंगे अशा घोषणा दिल्या जातात. आम्ही सर्व हिंदू मुस्लिम महिला एकत्र राहतो मात्र आम्हा हिंदू मुस्लिम महिलांना एकत्र राहूद्या अशी मागणी देखील सरकारकडे केली आहे
माजलगाव नगरपालिकेत 4 कोटी 14 लाखाच्या अपहार प्रकरणी तीन मुख्याधिकार्‍यांवर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तीनही मुख्याधिकारी फरार होते. सोलापूर जिल्ह्यातील कामटी येथील घरातून एका मुख्याधिकार्‍यास बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या अर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केली. लक्ष्मण राठोड असे पकडलेल्या फरार आरोपीचे नाव आहे.
बीड जिल्ह्यातील तेलगाव परिसरामध्ये जोरदार पावसाची हजेरी..
भारतीय संघाकडून न्यूझीलंडला होमग्राउंडवर व्हाईटवॉश, 5-0 फरकाने मालिका विजय...
मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करणाऱ्या मराठा समाजातील तरुणांचा आत्मदहनाचा इशारा, मागील सहा दिवसांपासून हे आंदोलन सुरुये, महाराष्ट्राच्या विविध भागातून नोकरीचा हक्क मागण्यासाठी तरुण मुंबईत आलेत, शासन दरबारी कोणतीही दखल न घेतल्याने तरुण आक्रमक
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या मानाच्या गोदा गौरव पुरस्काराची घोषणा : दर्शना जव्हेरी, काका पवार, भगवान रामपूरे, श्रीगौरी सावंत, सई परांजपे, माधव गाड़गीळ यांना पुरस्कार जाहीर. 21 हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप, 10 मार्चला कालिदास नाट्यगृहात रंगणार सोहळा
भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावात बंदुकीचा धाक दाखवत हात पाय दोरीने बांधून 1 कोटी 86 लाखांच्या शसस्त्र दरोडा प्रकरणी दोन दरोडेखोरांना ठाणे क्राईमब्रांचने डोंबिवली व मुंबई परिसरातून ताब्यात घेतला असून त्यांच्याकडून चोरीला गेलेले 1कोटी 26 लाखांचे सोन्याचे सर्व दागिने जवळपास रिकव्हर करण्यात आले असून रोख रक्कम रिकव्हर करण्याचे काम सुरू आहे.

जळगाव : झोका खेळताना गळफास लागून शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील शिरसोली गावातील घटना

जळगाव : झोका खेळताना गळफास लागून शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील शिरसोली गावातील घटना
पुणे : सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड, अज्ञात व्यक्तींकडून 30 ते 35 वाहनांची तोडफोड, मध्यरात्रीची घटना
कोल्हापूर जिल्ह्यात एकाच दिवशी चार मुली पळवून नेल्याच्या तक्रारी, कोल्हापूर शहरातील शाहूपुरी, राजारामपुरी आणि इचलकरंजी येथे गुन्हे दाखल, पळवून नेलेल्या सर्व मुली 15 ते 18 वयोगटातील
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वे मार्गावर भाईंदर ते वसई रोडदरम्यान, मध्य रेल्वेवर भायखळा-विद्याविहार स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक

প্রেক্ষাপট

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in


 


महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...



1. जुन्या आणि नव्या टॅक्स स्लॅबनुसार आयकर भरण्याचा पर्याय, अर्थसंकल्पात करकपातीची घोषणा, मात्र स्टँडर्ड डिडक्शनसारख्या करसवलतींना कात्री

2. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी 16 कलमी कार्यक्रम, शेती, सिंचन आणि ग्रामविकासासाठी 2 लाख 83 हजार कोटी, सौरउर्जा वापरावर विशेष भर

3. रोजगारनिर्मितीसाठी इन्फ्रास्ट्रक्टचरमध्ये 5 वर्षांत 100 लाख कोटी गुंतवणार, एलआयसी आणि आयडीबीआय़मधले समभाग विकून पैसा उभा करणार

4. लग्नाप्रमाणेच मातृत्त्वाच्या वयासंदर्भात कायदा आणण्याचे अर्थमंत्र्यांचे संकेत, टास्क फोर्सची घोषणा, महिलांसाठी 28 हजार कोटींचा निधी

5. गड किल्ल्यावर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांना सहा महिने सश्रम कारावास, राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय, दहा हजार रुपये दंडाचीही तरतूद

6. पश्चिम रेल्वेवर भाईंदर ते वसई रोडदरम्यान आज जंबो मेगाब्लॉक, सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गांवरील वाहतूक राहणार बंद.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.