महिनाभर गाजत असलेल्या सत्तासंघर्षानंतर उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच मुंबईत

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर, दिवसभरात महत्तावाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 29 Nov 2019 11:35 PM
विधानसभेचे कामकाज उद्यापासून दोन दिवस चालणार, उद्या बहुमत चाचणी, परवा अध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेता निवड
नाशिक जिल्ह्यातील नांदगावच्या कासारी घाटात उसतोड मजूरांना घेऊन जाणारा ट्रक पलटी , अपघातात एकाचा मृत्यू तर 8 जण जखमी, अपघातात 4 बैलही दगावले
उद्या केंद्रीय गृह मंत्री अमित शाह मुंबईत, महाराष्ट्रात गेले महिनाभर गाजत असलेल्या सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच उद्या मुंबईत
रातोरात झाडांची कत्तल मंजूर नाही. कोणत्याही विकासाच्या कामाला स्थगिती नाही, मेट्रोला नाही तर मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती - उद्धव ठाकरे
जोवर आरेच्या पुनर्विकासाबद्दल काही धोरण ठरत नाही तोवर आरे कारशेडमधील एक पान देखील तोडणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मंत्रालयातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद लाईव्ह :- मी मुख्यमंत्री म्हणून येईन, असं सांगितलं नव्हतं, मी न सांगता मुख्यमंत्री म्हणून आलोय, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांना चिमटा
मंत्रालयातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद लाईव्ह :- मी मुख्यमंत्री म्हणून येईन, असं सांगितलं नव्हतं, मी न सांगता मुख्यमंत्री म्हणून आलोय, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांना चिमटा
मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली, विकासाशी संबंधित कामं तातडीने सुरु करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले, सामान्यांच्या पैशाचा दुरुपयोग न होण्याकरिता त्यांनी सावध राहण्याचे निर्देश दिले.
मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली, विकासाशी संबंधित कामं तातडीने सुरु करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले, सामान्यांच्या पैशाचा दुरुपयोग न होण्याकरिता त्यांनी सावध राहण्याचे निर्देश दिले.
विधानसभेचे हंगामी अध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना सुरुवात; अध्यक्षपदासाठी दिलीप वळसे पाटलांचं नाव आघाडीवर : सूत्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात दाखल, थोड्याच वेळात पदभार स्वीकारणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील विधानसभेचे नवे हंगामी अध्यक्ष बनले आहेत. कालिदास कोळंबकर यांच्या जागी वळसे पाटील यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हंगामी विधानसभा अध्यक्षपदासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर राज्यपालांनी हंगामी अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे दिलीप वळसे पाटीलच उद्या हंगामी अध्यक्ष म्हणून बहुमत चाचणी घेणार आहेत. दरम्यान, महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होण्यासाठीचे अडथळे दूर झाले आहेत. उद्याच विरोधी पक्षनेतेपदी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचं पत्र हंगामी विधानसभा अध्यक्षांना दिलं जाण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे विजय सरदेसाई आता मुंबईत लवकरच गोव्यात भूकंप होणार असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. सत्तेतून बाहेर पडलेले माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई जे आता गोवा फॉरवर्ड ब्लॉक चे अध्यक्ष आता आमच्यासोबत आहे.आम्ही गोव्यात त्यांच्यासोबत एक पक्ष बनवणार आहे.

उपमुख्यमंत्रिपद काँग्रेसला तर विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीला, बाळासाहेब थोरातांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता - सूत्र

शिवसेना पक्षप्रमुख असताना उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव असलेल्या मिलिंद नार्वेकरांवर नवीन जबाबदारी पडण्याची शक्यता, उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे ओएसडी म्हणजे विशेष कार्य अधिकारी म्हणून मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती होऊ शकते
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवरुन मंत्रालयाकडे रवाना, थोड्याच वेळात मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारणार https://marathi.abplive.com/live-tv
शपथविधी सोहळ्यावर राज्यपाल कोश्यारी यांची नाराजी -सूत्र
LIVE UPDATE : महाविकासआघाडीची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे यांची बैठक
महाविकासआघाडी उद्या बहुमत चाचणी करण्याची शक्यता
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात, अपघातात 4 जण ठार तर 2 जण जखमी

প্রেক্ষাপট

महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर.....




    1. महाराष्ट्रात आता ठाकरे सरकार, शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, आज दुपारी एक वाजता मंत्रालयात स्वीकारणार पदभार

    2. शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाई देसाई शपथबद्ध, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, छगन भुजबळ तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊतांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

    3. पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत रायगडाच्या संवर्धनासाठी 20 कोटींचा निधी, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २ दिवसांत मोठा निर्णय, फडणवीसांच्या टीकेलाही प्रत्युत्तर

    4. नरेंद्र मोदी- उद्धव ठाकरे यांच्यातील नातं भावाचं, पंतप्रधान म्हणून मोदींनी लहान भावाला साथ द्यावी, सामनातून आवाहन, तर पंतप्रधान देशाचे असतात, एका पक्षाचे नाही म्हणत सूचक टोला

    5. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला शरद पवार, राज ठाकरे, फडणवीसांसह काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांचीही उपस्थिती, उद्योजक, शेतकरी, वारकऱ्यांचीही हजेरी

    6. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीनंतर राज्यभरात शिवसैनिकांचा जल्लोष, शिवसेना भवनाला आकर्षक रोषणाई, जळगाव, बारामती, यवतमाळ, नाशकात दोन्ही काँग्रेसकडून आनंद साजरा



 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.