LIVE BLOG : चांदवड तालुक्यातील भरवीर येथील जवान अर्जुन प्रभाकर वाळुंज शहीद

राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 20 Oct 2019 06:54 PM
सांगली : धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची टीका, धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीची विचारसरणी काय आहे हे दिसून येतं, अशी भाषा करणाऱ्या राष्ट्रवादीला जनता या निवडणुकीतून हद्दपार करेल, पैशाच्या आणि गुंडगिरीच्या जोरावर राजकारण करणाऱ्या धनंजय मुंडेची ही दादागिरी जनता सहन करणार नाही

चांदवड तालुक्यातील भरवीर येथील सैन्यदलातील जवान अर्जुन प्रभाकर वाळुंज हा जवान शहीद, 2 दिवसांपूर्वीच अरुणाचल मधून त्यांची बदली कश्मीरमध्ये झाली होती, आज काश्मीरच्या कुपवाडा येथील तांगधर सेक्टर मध्ये दहशतवाद्यांशी लढताना आले वीरमरण
सातारा : पुणे-बंगळुरु महामार्गावर पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत, साताऱ्याजवळील महामार्गावर अनेक वाहने अडकली

रांची : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरी कसोटी, रोहित-रहाणेच्या साथीने भारत मजबूत स्थितीत, रोहित शर्माचा द्विशतक, तर अजिंक्य रहाणेचंही शतक
जम्मू काश्मीर : भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त, भारतीय लष्कराची पाकव्याप्त काश्मीरमध्ये कारवाई, तंगधार सेक्टरमध्ये भारतीय जवानांची कारवाई, 4 ते 5 पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याची माहिती तर 10 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा
राज्य महिला आयोगाकडून धनंजय मुंडेंच्या वक्तव्याची दखल, धनंजय मुंडेंना नोटीस पाठवणार
जालना : परतूर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या गाडीवर रात्री अज्ञातांची दगडफेक, आष्टी येथे प्रचारासाठी जात असताना दगडफेक, वंचितचे उमेदवार शिवाजी सवने किरकोळ जखमी
मुंबई : शिवडी ते वडाळा स्टेशनदरम्यान तुटलेली ओव्हरहेड वायर दुरुस्त, मात्र हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वडाळा वाहतूक उशिराने
औरंगाबाद जिल्ह्यात रात्रभर संततधार पाऊस, रत्नागिरीत गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी, हिंगोलीतही दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस
मुंबई : शिवडी स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटली, रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचं काम सुरु, सीएसएमटी-वडाळादरम्यानची वाहतूक ठप्प

প্রেক্ষাপট

राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा

1. धनंजय मुंडेंनी पातळी सोडून टीका केल्याने पंकजा मुंडेंना भरसभेत भोवळ, सुरेश धसांचा आरोप, व्हायरल झालेली क्लिप बनावट असल्याचा धनंजय मुंडेंचा दावा

2. चार आठवड्यांच्या धुमशानानंतर राज्यातल्या प्रचारतोफा थंडावल्या, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी छुप्या प्रचाराला वेग, उमेदवारांची धाकधूक वाढली

3. मतदानाला काही तास उरले असताना राज्यात ठिकठिकाणी घबाड जप्त, वरळीत 4 कोटींची रोकड, मुंबईभर 47 लाखांचं मद्य जप्त, राज्यभर 511 शस्त्र हस्तगत

4. दर्शनासाठी 5 ते 25 हजार रुपये उकळणाऱ्या बाबाकडे 409 कोटींची माया, आंध्रातल्या कल्की बाबाच्या घरी आयकर विभागाचे छापे, 5 कोटींचे हिरेही हस्तगत

5. नरेंद्र मोदींच्या दिल्लीतल्या निवासस्थानी बॉलिवूड अवतरलं, महात्मा गांधींच्या 150व्या जयंतीनिमित्त विविध संकल्पनावर पंतप्रधानांशी चर्चा

6. रोहित शर्माचं सलामीवीराच्या भूमिकेत मालिकेत तिसरं शतक साजरं; रोहितची रहाणेच्या साथीने 185 धावांची अभेद्य भागीदारी, भारत 3 बाद 224

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.