Government Formation LIVE | भाजपाच्या असमर्थतेनंतर काँग्रेसमध्ये खलबतं सुरू, थोड्यात वेळात जयपूरमध्ये काँग्रेस नेत्यांची बैठक

काल 9 नोव्हेंबरला राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी भाजपला निमंत्रण दिले. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत सेनेची भूमिका मांडली. यावेळी इतका उशिर का लावला, असा प्रश्न उपस्थित करत भाजपला सत्तास्थापनेसाठी शुभेच्छा देखील दिल्या.

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 10 Nov 2019 08:04 PM
शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी राज्यपालांचं निमंत्रण, उद्या संध्याकाळी 7:30 पर्यंतची वेळ
वेट अॅंड वॉच हीच राष्ट्रवादीची भूमिका - प्रफुल पटेल
वेट अॅंड वॉच हीच राष्ट्रवादीची भूमिका - प्रफुल पटेल
वेट अॅंड वॉच हीच राष्ट्रवादीची भूमिका - प्रफुल पटेल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील राज्यपाल यांच्या भेटीसाठी राजभवनात दाखल
Government Formation LIVE | मुख्यमंत्री फडणवीस, पाटील, तावडे, मुनगंटीवार, मुंडेसह भाजप नेते राजभवनात

शिवसेना सोबत येत नसल्याने भाजप सत्ता स्थापन करणार नाही, भाजप सत्ता स्थापन करण्यासाठी असमर्थ, भाजपकडून शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी शुभेच्छा
“काँग्रेसने शिवसेनेसोबत जाऊ नये” संजय निरुपम यांचा काँग्रेसनेत्यांना सल्ला
भाजप कोअर कमिटी बैठक संपली, भाजपचे सर्व नेते राजभवनाच्या दिशेने रवाना, राज्यातील सत्तास्थापनेबद्दल थोड्याच वेळात निर्णय होण्याची शक्यता
भाजप कोअर कमिटी बैठक संपली, भाजपचे सर्व नेते राजभवनाच्या दिशेने रवाना, राज्यातील सत्तास्थापनेबद्दल थोड्याच वेळात निर्णय होण्याची शक्यता
थोड्याच वेळात भाजप अंतिम निर्णय देणार, 18 दिवसांनी अमित शाह महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अमित शाहांचं मार्गदर्शन


मुंबई : भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी भुपेंद्र यादव भाजप कोअर कमिटी बैठकीला राहणार उपस्थित, थोड्याच वेळात वर्षावर होणार दाखल, केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन भुपेंद्र यादव वर्षावर
आपलं सरकार बनणार, या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या पालखीत शिवसैनिकाला बसवणार : उद्धव ठाकरे
शिवसेना सरकार बनवत असेल तर भाजप विरोधात बसणार - सुत्र
रिट्रीट हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे आणि शिवसेना आमदारांची बैठक तर वर्षा बंगल्यावर भाजप कोअर कमिटीची बैठक
भाजपची बैठक संपली, चार पुन्हा बैठक, त्या बैठकीनंतर सत्तास्थापनेचा निर्णय राज्यपालांना कळवणार, कोअर कमिटीच्या बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मालाडच्या रिट्रीट हॉटेलमध्ये दाखल, शिवसेना आमदारांची भेट घेऊन चर्चा करणार
मुंबई : उद्धव ठाकरे शिवसेना आमदारांच्या भेटीसाठी मातोश्रीवरुन रवाना, हॉटेल रिट्रीटमध्ये जाऊन आमदारांची भेट घेणार
शिवसेनेकडून सत्तास्थापनेबाबत अधिकृत प्रस्ताव आलेला नाही, शरद पवारांची एबीपी माझाला माहिती
कॉंग्रेसनं शिवसेनेसोबत जाऊ नये l: संजय निरुपम
थोडयाच वेळात भाजपची कोअर कमिटीची बैठक,
अशिष शेलार, विनोद तावडे वर्षावर दाखल
भाजपसोबत युती करण्यास शिवसेना आमदार उत्सुक नाहीत, भाजप सरकार स्थापनेत अपयशी झाल्यानंतर, शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस सत्तेच्या वाटाघाटीच्या सूत्रावर चर्चा करणार,
शिवसेनेच्या सूत्रांची माहिती
भाजपला सत्तेतून बाहेर ठेवण्याची संधी राजकीय अपरिहार्यता आहे, मात्र ती आवश्यक आहे, यशोमती ठाकूर यांनी जयपूर बैठकीत मांडली भूमिका
राज्यातल्या सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता; काँग्रेस शिवसेनेला बाहेरुन पाठींबा देणार, अशी सुत्रांची माहिती आहे.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आमदारांचे एकमत, जयपूरमध्ये बैठक - सुत्र
उद्धव ठाकरे साडेबारा वाजता सर्व आमदारांची बैठक घेऊन चर्चा करणार
जयपूर - जयपूरमध्ये काँग्रेसची बैठक सुरू,
बैठकीला पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, अविनाश पांडे, मल्लिकार्जुन खरगे आणि अशोक गेहलोत उपस्थित,
शिवसेनेच्या पाठिंबा देण्याबाबत चर्चा सुरू असल्याची सुत्रांची माहिती, काँग्रेसच्या 40 आमदारांचे बैठकीत एकमत,
भाजपला सत्तेपासून दूर ठेवायला हवं
राज्यातल्या सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता; काँग्रेस शिवसेनेला बाहेरुन पाठींबा देणार, अशी सुत्रांची माहिती आहे.

প্রেক্ষাপট

मुंबई : महाराष्ट्रात महाशिवआघाडीचं समीकरण होऊन सरकार निर्माण होणार का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. त्याला कारण देखील तसंच आहे. एकीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीचं कौतुक केलं तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही भाजप सत्तास्थापनेत अपयशी ठरल्यास आघाडीही सत्तास्थापनेचा विचार करु शकते असे संकेत दिले होते तर त्यातच आज काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनीही आज अशीच भूमिका मांडल्यानं महाराष्ट्रात महाशिवआघाडीचं सरकार होणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

काँग्रेस राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी नेहमी महाराष्ट्राच्या हिताचा विचार केल्याची स्तुतीसुमनं संजय राऊत यांनी उधळली आहेत. बेळगाव-कारवारप्रश्नी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेचं कौतुकही केलं. त्यामुळे राऊतांच्या मुखी आघाडीबद्दल निर्माण झालेलं ममत्व हे सूचक आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेते आमदार नवाब मलिक यांनी भाजप सत्तास्थापनेत अपयशी ठरल्यास आघाडीही सत्तास्थापनेचा विचार करु शकते असे संकेत दिले होते. त्यातच आज काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनीही अशीच भूमिका मांडल्यानं राज्यात महाशिवआघाडीच्या फॉर्म्युल्याची चर्चा सुरु झाली आहे. जर राज्यपालांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यासाठी बोलवलं आणि त्यावेळी जर सेनेनं पाठिंबा दिला तर काँग्रेस याबाबत विचार करेल, असे मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे.



भाजपला राज्यपालांनी सत्तास्थापनेचं निमंत्रण दिल्यानंतर शिवसेनेकडून देखील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली आहे. दरम्यान, शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असून मुख्यमंत्री आमचाच होईल, असा पुनरुच्चार खासदार संजय राऊत यांनी केला आहे. काल 9 नोव्हेंबरला राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी भाजपला निमंत्रण दिले. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत सेनेची भूमिका मांडली. यावेळी इतका उशिर का लावला, असा प्रश्न उपस्थित करत भाजपला सत्तास्थापनेसाठी शुभेच्छा देखील दिल्या.

राज्यात सत्ता स्थापनेसाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भाजपला निमंत्रण दिलं आहे. भाजपकडून सत्तास्थापनेबद्दल अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. दरम्यान, भाजपला राज्यपालांनी सत्तास्थापनेचं निमंत्रण दिल्यानंतर शिवसेनेकडून देखील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मध्यरात्री मातोश्रीहून शिवसेना आमदारांशी चर्चा करण्यासाठी मालडच्या रीट्रीट हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. चर्चेनंतर आदित्य ठाकरे रीट्रीट हॉटेलमध्येच मुक्कामाला आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.