LIVE UPDATES | आज दिवसभरात... 07 जानेवारी 2020

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 07 Jan 2020 07:41 AM

প্রেক্ষাপট

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर

1. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात सात नवी खाती बनवण्याचा प्रस्ताव, महाविकास आघाडीतल्या नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारचा उतारा

2. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या पाच जिल्हा परिषदांसाठी आज मतदान, महाविकास आघाडीच्या समीकरणांमुळे फडणवीस-महाजनांची प्रतिष्ठा पणाला

3. चंद्रकांत खैरे आणि अब्दुल सत्तार यांच्यात अखेर दिलजमाई, मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरेंकडून दोघांनाही समज, वाद मिटल्याचं खैरे-सत्तारांकडून स्पष्ट

4. जेएनयूतला हल्ला पूर्वनियोजित कट, कोडवर्डच्या माध्यमातून रणनीती आखली, दिल्ली पोलिसांकडून 50 जणांविरोधात गुन्हा, तर मुंबईत विद्यार्थी संघटनांचं आंदोलन

5. जेएनयू हल्ल्याच्या निषेधासाठी बॉलिवूड कलाकार रस्त्यावर, अनुराग कश्यप, स्वरा भास्कर, तापसी पन्नू यांचा सहभाग, गेट वे ऑफ इंडियावर 32 तासांपासून विद्यार्थ्यांचा ठिय्या

6. महाराष्ट्राला यंदा नवा महाराष्ट्र केसरी मिळणार, लातूरचा शैलेश शेळके आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी लढणार

एबीपी माझा वेब टीम

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.