LIVE UPDATE : पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर रुग्णवाहिकेला अपघात, जीवितहानी नाही

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 27 Oct 2019 12:10 AM
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी जवळील मेंढवण खिंडीत रुग्णवाहिकेचा अपघात. ट्रॅव्हल बसने कट मारल्याने रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला खाली गेली. सुदैवाने कोणीही जखमी नाही. रुग्णवाहिका पुण्यावरून सुरतकडे जात होती.
निवडून आलेल्या उमेदवारांनाच मंत्रिमंडळात प्राधान्य द्या, शिवसेना आमदारांचा आग्रह, तर बुजूर्ग नेत्यांसाठी मार्गदर्शक पद निर्माण होण्याची शक्यता

भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची नेता निवडीची बैठक, 30 ऑक्टोबरला रोजी दुपारी 1 वाजता विधीमंडळ भाजपा कार्यालयात होणार
मुंबई : मातोश्रीवरची शिवसेना आमदारांची बैठक संपली, 1 तास झालेल्या बैठकीत सर्व अधिकार उद्धव ठाकरेंना देण्यात आले, सत्ता स्थापनेसंदर्भात जे काही ठरेल ते भाजपकडून लेखी यावं, शिवसेना आमदारांची मागणी, समसमान सत्तेची आमदारांची मागणी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात बारामतीला शरद पवार यांच्या भेटीला, थोड्याच वेळात शरद पवारांची भेट घेणार
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात बारामतीला शरद पवार यांच्या भेटीला, थोड्याच वेळात शरद पवारांची भेट घेणार
एकनाथ शिंदेना गटनेतेपदी कायम राहणार की आदित्य ठाकरे नवीन विधीमंडळ गटनेते होणार याचा निर्णय
आजच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. आज सर्व आमदारांची मातोश्रीवर महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. सत्तास्थापनेबरोबर गटनेते पदासंदर्भातही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांचा भाजपला पाठिंबा, महायुतीमध्ये दिलीप सोपल यांना तिकीट मिळाल्याने राऊत यांनी केली होती बंडखोरी, अपक्ष निवडून आल्यानंतर विधानसभेत सहयोगी सदस्य म्हणून भाजपाला पाठिंबा
पालघर : डहाणू, तलासरी तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच, पहाटे 4 वाजून 6 मिनिटांनी भूकंपाचा धक्का, गेल्या दीड वर्षापासून परिसरात वारंवार भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
मुंबई : शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची मातोश्रीवर दुपारी 12 वाजता बैठक होणार, बैठकीत शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्यासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती
LIVE UPDATE : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, पारसिक बोगद्याजवळ रेल्वे रुळाला तडे, सीएसएमटीला जाणारी वाहतूक ठप्प
रविवारी मेगाब्लॉक नाही, वेळापत्रकानुसार लोकल सुरु राहणार, सोमवारीही रविवार वेळापत्रकानुसार लोकल फेऱ्या चालवण्यात येणार

প্রেক্ষাপট

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
1. जेजेपीला उपमुख्यमंत्रीपद दिल्यानं भाजपचा हरियाणातला सत्तास्थापनेचा मार्ग सुकर , महाराष्ट्रातही तोच पॅटर्न राबवणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष

2. अतिआत्मविश्वास आणि बंडखोरांमुळे युतीच्या जागा घसरल्या, माझाला दिलेल्या मुलाखतीत पवारांचं विश्लेषण, तर नवख्या आमदारांना मोलाचा सल्ला

3. आरेला कारे करणाऱ्या शिवसेनेशी राणेंची जुळवून घेण्याची भाषा, मनात द्वेषही नसल्याचं स्पष्ट, कणकवलीतल्या निकालानंतर राणेंची माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत

4. वंचितनं खाल्लेल्या मतांमुळं तब्बल 32 मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव, प्रकाश आंबेडकरांनी आघाडीच्या सत्तेची वाट रोखल्याची चर्चा

5. परतीच्या पावसाच्या तडाख्यानंतर आता किनारपट्टीला क्यार वादळाचा धोका, कोकणात हाय अलर्ट, मुंबईतही परिणाम जाणवण्याची शक्यता

6. दीपोत्सवाचा सर्वत्र उत्साह, बाजारपेठा सजल्या, दीपोत्सवानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.