LIVE UPDATES | पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी आणखी तिघांना अटक, मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई
देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा एका क्लिकवर
ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ
Last Updated:
03 Dec 2019 09:23 PM
मुंबई : पीएमसी बँक घोटाळा प्रकरण, आणखी 3 संचालकांना अटक, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई, मुक्ती बावीसी, तृप्ती बने आणि जगदीश मोखे यांना अटक, सर्वांना उद्या कोर्टात हजर करण्यात येणार
मंत्रिमंडळाची आढावा बैठक संपली, कुठल्याही विकासकामांना स्थगिती दिलेली नाही : उद्धव ठाकरे
माझ्या फेसबुक पोस्टचा विपर्यास केला, मी भाजपची सच्ची कार्यकर्ता असल्याचं पंकजा मुंडेंचं वक्तव्य
भाजपचे नेते विनोद तावडे पंकजा मुंडे यांच्या भेटीसाठी 'रॉयलस्टोन' या शासकीय निवासस्थानी पोहोचले आहेत. एकीकडे पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे भाजपच्या बंडखोरांचा विनोद तावडे यांच्यावर वेगळा विचार करण्याबाबत दबाव आहे.
औरंगाबाद : अखेर सहा तासानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश
औरंगाबाद शहरात बिबट्या आढळलाय. शहरातल्या एन-१ भागात बिबट्याचा वावर दिसून आलाय. काळा गणपती मंदिरामागील वॉकिंग ट्रॅक भागात हा बिबट्या आढळलाय. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी इथं दाखल झालेत.
महापोर्टलकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा पुण्यात सलग दुसऱ्या दिवशीही फज्जा उडाला. कालप्रमाणेच आजही वीज गेल्याने परीक्षेचा खेळखंडोबा झाला. एसएससी बोर्डमध्ये क्लार्कची पदं भरायची आहेत आणि त्याचीच ऑनलाईन परीक्षा हिंजवडीच्या अलार्ड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड मॅनेजमेंटमध्ये सुरु आहेत. कालही वीज गेल्याने सकाळी 10 वाजताच्या बॅचमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. काल झालेल्या प्रकारातून महापोर्टलने धडा घेत, इन्व्हर्टर अथवा जनरेटरची पर्यायी व्यवस्था करणं अपेक्षित होतं. मात्र महापोर्टल अनास्था दिसून आली. आज ही दहा वाजताची बॅच सुरु झाली, तेव्हा वीज गेली. गोंधळ सुरु होऊ नये, म्हणून परीक्षार्थींना वेळ वाढवून देऊ, असं सांगण्यात आलं. मात्र नंतर महापोर्टलची टीम या सर्वांना परीक्षा हॉलमध्ये वाऱ्यावर सोडून निघून गेली. त्यानंतर महापोर्टलकडून आजची परीक्षा रद्द करण्यात आल्याची नोटीस लावण्यात आली.
नागपुरात चार वर्षाच्या मुलीबरोबर दुष्कृत्य करण्याचा प्रयत्न, घटनेनंतर संतप्त जमावाकडून आरोपीची नग्न धिंड, नागपुरातील पारडी परिसरातील घटना, आरोपी पोलिसांच्या ताब्यात, अधिक तपास सुरु
सातारा महाबळेश्वर रोडवरील केळघर घाटात सिमेंटचा ट्रक सुमारे 500 फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात चालक आणि सहाय्यक ट्रकखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घाट चढत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचं कळतं.
ठाण्यातील कळवा इथे ट्रॅफिक कॉन्स्टेबलच्या प्रसंगावधानाचं सर्वत्र कौतुक होत आहे. जयवंत पवार यांनी आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीला वाचवलं. भगवान कांबळे (वय 50 वर्षे) असं आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीचं नाव आहे. कौटुंबिक त्रासाला कंटाळून भगवान कांबळे नवीन कळवा पुलावरुन दोरखंडाला लटकून आत्महत्या करणार होते. मात्र सतर्क जयवंत पवार यांनी बाजूला असलेल्या हायड्राच्या मदतीने त्यांना वाचवलं. तिथून जाणाऱ्या एकाने या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. भगवान कांबळे सध्या रुग्णालयात असून उपचार सुरु आहेत. तर कॉन्स्टेबल जयवंत पवार यांना ठाणे पोलिस आयुक्तांनी 5 हजार रुपयांचे तात्काळ बक्षीस जाहीर केलं आहे.
टोल कर्मचाऱ्यांवर चाकूने हल्ला झाल्याची घटना संगमनेर तालुक्यात घडली आहे. हिवरगाव पावसा टोलनाक्यावर काल टोल देण्यावरुन वादावादी झाली. त्यानंतर हा हल्ला झाला. टवाळखोरांनी कर्मचाऱ्यांना मारहाण करुन चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात नवनाथ घुले नावाचा कर्मचारी जखमी झाला आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. संगमनेर पोलिस ठाण्यात काल उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून एकाला पोलिसांन ताब्यात घेतलं आहे. तर चाकू हल्ला करणारा आणि मारहाण करणारे इतर आरोपी अजूनही मोकाटच आहेत.
ठाण्यात मनसेचं टोल मुक्ती आंदोलन सुरु आहे. शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन करुन टोलला विरोध केला जात आहे. ठाणेकरांना टोल मुक्ती द्यावी, अशी मागणी आंदोलकांची आहे. मुंबईत येण्यासाठी आणि पुन्हा ठाण्यात जाण्यासाठी रोज ठाणेकरांना टोल भरावा लागतो. आज आंदोलनाचा दुसरा भाग आहे. याआधी साखळी आंदोलन झालं होतं.
Sharad Pawar EXCLUSIVE | एबीपी माझावर सुरु आहे...सत्तास्थापनेनंतर शरद पवारांची पहिली मुलाखत
महाराष्ट्रातील शेतकऱ्याला संकटातून दूर करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी चांगले निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असताना जर पैसे कमी पडत असतील तर बुलेट ट्रेन रद्द केली तरी चालेल पण बळीराजा जगला पाहिजे, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे.
मुंबई महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये दुपारी चारनंतरही रुग्णांना उपचार मिळावे, या उद्देशाने प्रशासनाने कंत्राटदाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. कंत्राटदाराच्या माध्यमातून 15 दवाखान्यांमध्ये दोन वर्षे दुपारी 4 ते रात्री 11 या वेळेत रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. कंत्राटदाराकडून उपलब्ध करण्यात येणारे वैद्यकीय अधिकारी आणि बहुउद्देशीय कामगारांच्या वेतनापोटी पालिकेला 2.79 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.
येत्या तीन दिवसात कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे. राज्यातील किमान तापमानात घट होत असली तरी अजून कमाल तापमानाचे आकडे चढेच आहेत. त्याचवेळी अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात काही ठिकाणी गडगडाटसह किरकोळ ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
चुकीची औषधं आणि इंजेक्शन दिल्याने 10 ते 12 रुग्ण अत्यवस्थ आहेत. अंबरनाथ महापालिकेच्या डॉ. बी. जी. छाया रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला. सर्व रुग्णांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलवलं आहे. रुग्णांना एक्स्पायरी झालेली औषधं दिल्याचा आरोप अंबरनाथच्या नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी केला आहे. तर छाया रुग्णालयाच्या कारभारावर रुग्णाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.
घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किंमतीत (एलपीजी) सलग चौथ्या महिन्यात वाढ झाली आहे. या सिलेंडरचे दर एक डिसेंबरपासून नवी दिल्लीत 13.5 तर मुंबईत 14 रुपयांनी वाढवण्यात आलं. या दरवाढीमुळे मुंबईतील विनाअनुदानित सिलेंडरची किंमत 665 रुपयांवर पोहोचली आहे. तर नवी दिल्लीत हा सिलेंडर 695 रुपयांना मिळेल. इंडियन ऑईलतर्फे ही माहिती देण्यात आली.
पीएमसी बँकेच्या खात्यांमधून आता पूर्ण रक्कम काढता येणार आहे. बँकेतील 78 टक्के खातेदार आपापल्या 3 खात्यांमधील संपूर्ण जमा रक्कम वाटेल तेव्हा काढू शकतील, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितलं.
প্রেক্ষাপট
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
1. फडणवीसांच्या तोंडी 'मी'पणाचा दर्प, त्यामुळेच महाराष्ट्रानं नाकारलं; शरद पवारांची बोचरी टीका
2. नाणार रिफायनरीविरोधातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
3. अजित पवारांनी 'त्या' अटीवर भाजपशी हातमिळवणी केली होती : शरद पवार
4. सिंहगड किल्ल्यावर जाणारा रस्ता महिनाभर पर्यटकांसाठी बंद
5. डोक्यावरुन पाणी चाललंय, हे थांबवलं पाहिजे, हैदराबाद बलात्कार प्रकरणावर विराट कोहलीचा संताप
6. Hyderabad Rape Case - नराधमांना भरचौकात ठेचून मारा; जया बच्चन यांची राज्यसभेत मागणी