मलबार हिलजवळच्या लास्ट पाम इमारतीला भीषण आग, अग्निशमन विभागाच्या पाच गाड्या घटनास्थळी
आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ
Last Updated:
05 Feb 2020 09:59 PM
राम मंदिराच्या निर्मितीसाठी ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी जाहीर केलाय, या १५ सदस्यीय ट्रस्टमध्ये महाराष्ट्रातल्या एका व्यक्तीचा समावेश, पुण्यातल्या स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांचा ट्रस्टमध्ये समावेश
राम मंदिराच्या निर्मितीसाठी ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी जाहीर केलाय, या १५ सदस्यीय ट्रस्टमध्ये महाराष्ट्रातल्या एका व्यक्तीचा समावेश, पुण्यातल्या स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांचा ट्रस्टमध्ये समावेश
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या आठवडाभरापासून दिल्ली प्रचारासाठी आहेत,आज त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची संसदेतल्या कार्यालयात भेट घेतली.
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने नेमली समिती, अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती, एकनाथ शिंदे,दिलीप वळसे पाटील आणि विजय वड्डेटीवार समितीचे सदस्य
पालघर : वाडा-मनोर रोडवरील टेन पोलीस चौकीजवळ बाईकस्वाराला ट्रकने चिरडलं, काशीनाथ मालकरी असं मृत व्यक्तीचं नाव
मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. येत्या 17 मार्चपासून विस्तृत सुनावणी होणार. मुंबई उच्च न्यायालयाने 16 टक्के मराठा आरक्षणाला मंजुरी दिली होती. मात्र या निर्णयाला आव्हान देण्यात आलं होतं.
राम मंदिराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा, श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट उभारणार, 67 एकर जमीन राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीला हस्तांतरित, 5 एकर जमीन सुन्नी वक्फ बोर्डाला देणार
हॅमिल्टन : भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला एकदिवसीय सामना, श्रेयस अय्यरचं शानदार शतक, एकदिवसीय सामन्यातलं पहिलं शतक
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि उपमहापौर अॅड. सुहास वाडकर यांच्या निषेधार्थ मराठा क्रांती ठोक मोर्चाचे प्रमुख आबासाहेब पाटील आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी 'मातोश्री'वर गेले आहेत. मुंबई महापालिकेच्या शिक्षक भरतीत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मराठीतून झाल्याचे कारण देतं डावलण्यात आलेले विद्यार्थी, आबासाहेब पाटील यांच्यासोबत महापौर किशोरी पेडणेकर यांना भेटायला गेले होते. परंतु दोन तास थांबूनही भेट न दिल्याने विद्यार्थी नाराज झाले होते. यावेळी आबासाहेब पाटलांनी शिक्षक उमेदवारांसह महापौर दालनाबाहेर किशोरी पेडणेकर यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या होत्या.
लातूर कृषी महाविद्यालयातील आंदोलनाचं लोन परभणी कृषी विद्यापीठात, विद्यापीठ प्रशासनाविरोधात विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचं आजपासून बेमुदत धरणे आंदोलन
र्ध्यातील सिंदी (रेल्वे) येथे सर्वपक्षीय बंदच आवाहन, हिंगणघाट येथील प्राध्यापक तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा निषेध, विविध ठिकाणी निवेदन देणार
मिरारोड : बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने महिलेच्या अंगावर ज्वालाग्रही रसायन ओतलं, काशिमीरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना, आरोपीला अटक
औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात घरात घुसून महिलेला पेटवल्याची घटना घडली आहे. या घटनेत 50 वर्षीय महिला 95 टक्के भाजली असून तिच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी आरोपी संतोष मोहितेला अटक करण्यात आली आहे. संतोष मोहितेने महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिलं. तो गावात बिअरबार चालवतो.
প্রেক্ষাপট
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...
1. 2024 मध्ये शरद पवार पंतप्रधान, औरंगाबादमध्ये रोहित पवारांकडून मनातल्या इच्छेला मोकळी वाट, लोकसभेत महाविकास आघाडीला एकत्र राहण्याचं आवाहन
2. बुलेट ट्रेनची गरज काय? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सवाल, पंतप्रधान मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टला ब्रेक लावण्याचे उद्धव ठाकरेंचे संकेत
3.मृत्यूशी झुंजणाऱ्या वर्धाच्या निर्भयासाठी राज्यभर प्रार्थना, माझाच्या बातमीनंतर उपचाराचा खर्च सरकारनं उचलला, आरोपीच्या फाशीसाठी स्थानिकांचा धडक मोर्चा
4.शिवसेनेचा आरेतील वृक्षतोडीला विरोध, मात्र बीएमसी बजेटमध्ये 3 हजार वृक्षतोडीला परवानगी, शेलारांकडून समाचार, बजेटमध्ये मुंबईकरांवर कराचा बोजा नाही
5. 2 लाखांच्या कर्जमाफीसाठी 32 लाख शेतकरी पात्र, 15 फेब्रुवारीला पहिली यादी, कर्जमाफीसाठी आधार कार्डची पडताळणी अनिवार्य
6. अंडर नाईन्टिन विश्वचषकात युवा टीम इंडियाची अंतिम फेरीत धडक, पाकिस्तानचा दहा विकेट्सनी धुव्वा, मुंबईकर यशस्वी जैस्वालचं नाबाद शतक, दिव्यांशची अर्धशतकी खेळी