LIVE UPDATES | मालेगाव- देवळा मार्गावरील एसटी बस आणि रिक्षाच्या अपघातात 20 प्रवाशांचा मृत्यू

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 28 Jan 2020 10:41 PM
औरंगाबाद : शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात कार्यकर्त्यांचा धुडगूस, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमधील आपसातील किरकोळ वादात राजकीय कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांना मारहाण, राजकीय कार्यकर्त्यांनी धुडगूस घालत रॉड, काठीने विद्यार्थ्यांना मारहाण, यात 3 विद्यार्थी जखमी
नाशिकच्या मालेगाव तालुक्यात एसटी बस-अॅपे रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 20 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मालेगाव-देवळा मार्गावर बस आणि रिक्षामध्ये धडक होऊन ही दोन्ही वाहनं थेट विहिरीत कोसळली. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य राबवून जखमींना बाहेर काढलं. दोन्ही वाहनं विहिरीत कोसळल्यानं मदतकार्य राबवताना अडचण येत आहे. पोलिस आणि स्थानिकांच्या मदतीनं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येत आहे.
कोल्हापूर : सहकार विभागाच्या कोल्हापुरात सहा ठिकाणी धाडी, पन्हाळा आणि करवीर तालुक्यातील खासगी सावरकारांवर धाडी, पन्हाळा तालुक्यातील कोतोली  येथील सज्जन पाटील यांच्या जयसिंग मेडिकल, जयसिंग ज्वेलर्स, सुवर्ण बली व्यापारी पतसंस्थेसह त्यांच्या निवासस्थानी धाडी
कोल्हापूर - तंटामुक्त अध्यक्षाची विष पिऊन आत्महत्या, चंदगड तालुक्यातील उमगावमधील धक्कादायक घटना, विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केल्याने शिवाजी गावडे यांची आत्महत्या, मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार
महाविद्यालयातील कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने होणार,
विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जपली जावी यासाठी निर्णय,
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा
लातूर जिल्ह्याचं विभाजन होणार? प्रशासनाकडून हालचाली सुरु, उदगीर नवा जिल्हा निर्माण करण्यासाठी हालचाली सुरु
महाराष्ट्रात इथून पुढे व्यापारी बंद पाळणार नाहीत, कोणत्याही राजकीय पक्षाच्या बंदला पाठिंबा देणार नाहीत; महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचा ठराव
फायरब्रॅन्ड अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे आज नागपूर महापालिकेच्या आयुक्त पदी रुजू झाले. सकाळी नियोजित वेळेच्या आधीच त्यांनी महापालिकेचे मुख्यालय गाठले आणि अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना धक्काच दिला. त्यानंतरच्या मीटिंगमध्ये ही तुकाराम मुंढे यांनी त्यांची कार्यशैली कशी राहील याची चुणूक अधिकाऱ्यांना दाखवून दिली. घड्याळीप्रमाणे तुकाराम मुंढे यांचा नागपूर महापालिकेतील पहिला तास कसा राहिला पाहूया.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी अधिकारी कर्मचारी व्यस्त राहणार असल्यामुळे राज्यातल्या 22 जिल्हा मध्यवर्ती बँका आणि 8 हजार 194 प्राथमिक कृषी सहकारी संस्था यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या जिल्हा बँकांमध्ये पश्चिम महाराज पातळ्या कोल्हापूर सांगली सातारा पुढे अहमदनगर आणि मराठवाड्यातल्या उस्मानाबाद औरंगाबादसारख्या महत्त्वाचे जिल्हा बँका आहेत. सरकारला कृषी सन्मान योजने मधली कार्यवाही व्यवस्थित व्हावी यासाठी जिल्हा बँकांच्या निवडणुका पुरा डोक्यास सांगितलं असलं तरी विविध कार्यकारी सोसायट्या मोठ्या प्रमाणात थकबाकीदार झाले आहेत. कृषी सन्मान योजनेमधून सोसायट्यांना सुद्धा लाभ होऊन संचालक मंडळ थकबाकीतून बाहेर येईल त्यांना मतदानाचा अधिकार मिळेल असाही होरा आहे. कृषी सन्मान योजनेची एकूण व्याप्ती आणि सरकारी कामकाजाची पद्धत पाहता या निवडणुका तीन महिन्यांसाठी पुढे ढकलल्या गेल्या निकालावर आणखी वाढू शकतो याविषयी आता सांगता येत नाही.
NRC आणि CAA च्या विरोधात पुण्यातील घोरपडे पेठेतील नागरिकांनी मुंडन आंदोलन केलं. केंद्र सरकार नागरिकांचं म्हणणं ऐकुन घेत नसल्याने हे मुंडन आंदोलन करावं लागल्याचं आंदोलनकर्त्यांच म्हणन होतं.
कोरेगाव-भीमाप्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करा, अशी मागणी कर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि याचिकाकर्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी चौकशी आयोगाकडे केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर 'मॅन वर्सेस वाईल्ड'च्या एपिसोडमध्ये बेअर ग्रिल्ससोबत आता सुपरस्टार रजनीकांत दिसणार. कर्नाटकमधील बंदीपूरमध्ये पुढील दोन दिवस चित्रीकरण होणार
नागपूर मेट्रोचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
माघी गणेश जयंती निमित्ताने आज नाशिक शहरातील चांदीच्या गणपतीसह सर्वच गणेश मंदिरात लाडक्या गणरायचा जन्मदिन साजरा केला जातोय, मंदिरांना आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं असून विद्यतु रोषणाईत गणेश मंदिर उजळून निघाली आहेत, गेल्या चार पाच दिवसापासून विविध गणेश मंदिरात भजन कीर्तनसह पूजापाठ केले जात होते, आज पहाटे पासूनच महापुजाला प्रारंभ करण्यात आला असून गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केलीय.
पोलीस महासंचालक प्रकरणात लक्ष घालतील, एनआयएला कागदपत्र द्यावेच लागतील, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एनआयएप्रकरणी दिली आहे.
सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ अभाविपची तिरंगा रॅली, एफसी रोडवर 300 फूट लांबीचा तिरंगा घेऊन विद्यार्थ्यांच्या सहभाग
अशोक चव्हाणांच्या वक्तव्यानं उद्धव ठाकरे, शरद पवार नाराज असून लवकरच काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार आहेत. अशी वक्तव्य केल्याने महाविकास आघाडीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी इंदिरा गांधीबद्दल वक्तव्य केलं होतं, पण त्यानंतर माफी मागितली होती, आता अशोक चव्हाणांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत नाराजीचा सूर दिसून येत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आजचा लातूर दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. प्रकृती अस्वस्थामुळे राज ठाकरेंचा दौरा पुढे ढकलल्याचं समजतं.
सीएए आणि एनआरसी विरोधात दिल्लीच्या शाहीन बागप्रमाणे मुंबईच्या नागपड्यात ही महिलांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात काल (27 जानेवारी) रात्री विद्यार्थ्यांचा नेता उमर खालिद ही सहभागी झाला होता. यावेळी त्याने या महिलांचे कौतुक केले. तसेच नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर टीका केली. देशातून सीएए आणि एनआरसी जाईलच परंतु जसे महाराष्ट्रतून भाजप गेली तशी सर्व देशातूनही भाजप जाणार आहे, असे उमर खालिद यावेळी म्हणाला.
पुढच्या आठवड्यात म्हाडाच्या कोकण मंडळासाठी लॉटरी निघणार आहे. त्यात 9 हजार 140 घरांसाठी ही जाहिरात निघणार असून त्यात अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटातील घरांचा समावेश आहे. त्यात ठाणे, नवी मुंबई, कल्याण खोणी, शिरढोण अशा विविध ठिकाणी घरी असतील.

6. नाईटलाईफच्या पहिल्याच दिवशी अनेकांचा हिरमोड, मॉल्स, चौपाट्यांवर पुरेशी तयारी नाही, वरळी सी फेस आणि मरिन लाईन्सवरच मुंबईकरांची नाईटलाईफ सुरू

5. ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव पद्म पुरस्कारापासून अजूनही वंचित, पण मूळचा भारतीय नसलेल्या अदनान सामीला पद्म पुरस्कार का? देशभरातून संतप्त सवाल


4. काँग्रेसची धुरा पुन्हा राहुल गांधींच्या खांद्यावर देण्यासाठी पक्षात हालचाली, तर उत्तर प्रदेश मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून प्रियंकांच्या नावाची चर्चा

3. मुंबईतल्या नागपाड्यात सीएएविरोधात महिलांचा ठिय्या, तर सीएएच्या समर्थनात न भूतो न भविष्य मोर्चा काढण्याच्या राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना

2. एल्गार परिषदेच्या तपासासाठी एनआयएची टीम पुण्यात, तपासाची कागदपत्र देण्यास पुणे पोलिसांचा नकार, तपासावरुन राज्य आणि केंद्राचा संघर्ष पेटण्याची शक्यता
1. पाच महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर आज नागपूरच्या लोकमान्यनगर ते सीताबर्डी मार्गावरच्या मेट्रोचं उद्घाटन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाला राहणार उपस्थित

প্রেক্ষাপট

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in


 




    1. पाच महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर आज नागपूरच्या लोकमान्यनगर ते सीताबर्डी मार्गावरच्या मेट्रोचं उद्घाटन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाला राहणार उपस्थित





    1. एल्गार परिषदेच्या तपासासाठी एनआयएची टीम पुण्यात, तपासाची कागदपत्र देण्यास पुणे पोलिसांचा नकार, तपासावरुन राज्य आणि केंद्राचा संघर्ष पेटण्याची शक्यता





    1. मुंबईतल्या नागपाड्यात सीएएविरोधात महिलांचा ठिय्या, तर सीएएच्या समर्थनात न भूतो न भविष्य मोर्चा काढण्याच्या राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना





    1. काँग्रेसची धुरा पुन्हा राहुल गांधींच्या खांद्यावर देण्यासाठी पक्षात हालचाली, तर उत्तर प्रदेश मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून प्रियंकांच्या नावाची चर्चा





    1. ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव पद्म पुरस्कारापासून अजूनही वंचित, पण मूळचा भारतीय नसलेल्या अदनान सामीला पद्म पुरस्कार का? देशभरातून संतप्त सवाल





    1. नाईटलाईफच्या पहिल्याच दिवशी अनेकांचा हिरमोड, मॉल्स, चौपाट्यांवर पुरेशी तयारी नाही, वरळी सी फेस आणि मरिन लाईन्सवरच मुंबईकरांची नाईटलाईफ सुरू



 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.