LIVE UPDATES | ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ
Last Updated:
23 Dec 2019 10:13 PM
ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर, 27 किंवा 30 डिसेंबरचा नवा मुहूर्त, वेळ खाणाऱ्या काँग्रेसला पवारांचा टोला
जळगाव : एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा गावाजवळील महामार्गावर ट्रक आणि काळीपिवळीचा अपघात, अपघातात एकूण आठ जणांचा मृत्यू, पाच जणांचा जागेवर तर तीन जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू
अॅसिड हल्यासारख्या भयानक घटनेतून बचावलेल्या मुलीची कहाणी सांगणाऱ्या दीपिका पादुकोणच्या आगामी छपाक सिनेमाच्या विरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. लेखक राकेश भारती यांनी आपली नोंदणीकृत कथा चोरून निर्मात्यांनी हा सिनेमा बनवल्याचा आरोप करत कॉपीराईट कायद्याअंतर्गत हायकोर्टात धाव घेतली आहे.
काँग्रेस हायकमांड जो निर्णय घेईल तो मान्य : पृथ्वीराज चव्हाण
शरद पवार सह्याद्री अतिगृहावर दाखल, मंत्रिमंडळ विस्तारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार
मंत्रिंडळ विस्ताराबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील : पृथ्वीराज चव्हाण
मंत्रिमंडळ विस्तार उद्याच दुपारनंतर होणार, सूत्रांची माहिती, शिवसेननेचे 13, राष्ट्रवादीचे 13, काँग्रेस 10 मंत्री मंत्री शपथ घेण्याची शक्यता
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याप्रकरणी शिवसैनिकांनी मुंबईतील वडाळ्यात राहणाऱ्या एकाला मारहाण कील. त्यानंतर सर्वांसमोर त्याचं मुंडन केलं. हीरामणी तिवारी असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी जामियाच्या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. त्याचा विरोध करण्यासाठी हीरामणी तिवारीने काल (22 डिसेंबर) फेसबुकवर पोस्ट केली होती. दरम्यान, वडाला ट्रक टर्मिनस पोलिसांनी परिसरात जमावबंदीची नोटीस जारी केली आहे.
रत्नागिरी :तिवरे धरणफुटीचा अहवाल आठ दिवसात सरकारला सादर होणार, जलसंधारण विभागातील सूत्रांची माहिती, तिवरे धरणफुटीमागचा खेकडा कोण स्षष्ट होणार, तिवरे धरण फुटल्याने भेंदवाडीतल्या 23 जणांचा मृत्यू झाला होता
मुंबईसह राज्यात हवामान विभागाकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्राच्या नैऋत्य भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं हिंदी महासागरात चक्रावाताची स्थिती तयार होतेय. त्यामुळे पुढील 4-5 दिवस राज्यातील मध्य कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात वादळी पावसाची शक्यता आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीच्याविरोधात भिवंडीत आज रिक्षाबंद आंदोलन पुकारण्यात आलं आहे. भिवंडीत रिक्षा चालक-मालक महासंघाच्या वतीने आज सकाळी रिक्षाबंद आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनात 19 रिक्षा युनियनचा सहभाग आहे. बंदमुळे आज संध्याकाळपर्यंत शहरात रिक्षा धावणार नाही.
साताऱ्यातील कोयना परिसर सकाळी भूकंपाच्या धक्क्याने हादरला. कोयना, पाटण परिसर भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 2.8 रिश्टर स्केलचा इतकी होती.
প্রেক্ষাপট
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर....
1. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याने भारतीय मुस्लिमांना धोका नाही, पंतप्रधान मोदींकडून मुस्लीम बांधवांना विश्वास, तर काँग्रेससह ममता आणि कम्युनिस्टांवर हल्लाबोल
2. पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांनी तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं, काँग्रेस नेते राहुल गांधींचं टीकास्त्र, तर द्वेषाला प्रेमानेच उत्तर देण्याचं नागरिकांना ट्विटरवरुन आवाहन
3. झारखंडमध्ये कुणाची सत्ता येणार, 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार, भाजप सत्ता राखणार की काँग्रेस आघाडी विजयी झेंडा रोवणार, याकडे देशाचं लक्ष
4. आधी शॉर्ट सर्किट मग सिलेंडर स्फोट, दिल्लीतील इंदिरा विहारमध्ये घराला भीषण आग, आठ नागरिकांचा होरपळून मृत्यू, पाच जण गंभीर, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
5. कटक वन डे जिंकून टीम इंडियाची मालिकेत 2-1 अशी सरशी, अखेरच्या वन डेत टीम इंडियाची विंडीजवर चार विकेट्सनी मात, विराट कोहली सामनावीर तर रोहित शर्मा मालिकावीर