LIVE UPDATE : धुळ्याचे विद्यमान आमदार तथा अपक्ष उमेदवार अनिल गोटे यांचा स्ट्रॉंगरूमसमोर मुक्काम

राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 23 Oct 2019 11:55 PM
शिर्डी : नेवासा शहरातील मध्यवर्ती ठिकाणच्या जुना वाड्यातील काही भाग कोसळून चार ठार, एक जखमी,
रम्हूशेठ पठाण यांच्या मालकीचा जुना वाडा ( घर )
घरातील खोलीचा छताचा भाग कोसळून घडली घटना
अहमदनगर : कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांच्या विजयाचे होर्डिंग्स, कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार-राम शिंदे यांच्यात लढत
साताऱ्यातील निवडणुकीच्या निकालाला वेळ लागणार. लोकसभेच्या मतमोजनीमुळे सर्वच निकालांना उशीर होणार, किमान 12 तासांपेक्षा जास्त कालावधी लागणार असल्याची जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांची माहिती
सांगली : कृष्णा नदीच्या पात्रातील मगरीच्या हल्ल्यात एक वृद्ध गंभीर जखमी, नूरमहंमद मुल्ला असं वृद्ध व्यक्तीचं नाव, पलूसमधील आमणापूर येथील घटना

सांगली : कृष्णा नदीच्या पात्रातील मगरीच्या हल्ल्यात एक वृद्ध गंभीर जखमी, नूरमहंमद मुल्ला असं वृद्ध व्यक्तीचं नाव, पलूसमधील आमणापूर येथील घटना

दिवाळीसाठी एसटी प्रशासनाच्या 359 विशेष जादा बस धावणार, 24 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत सुविधा उपलब्ध, मुंबईतून 12, ठाणे 19, पालघर 22, रत्नागिरी 14, सिंधुदुर्ग 8, पुणे 64, कोल्हापूर 7, सातारा 3, सांगली 4, अमरावती 2, यवतमाळ 5, नाशिक 23, जळगाव 8, धुळे 35, अहमदनगर 9, औरंगाबाद 14, बीड 9, जालना 5, लातूर 10, नांदेड 13, उस्मानाबाद 11, परभणी 23 अशा विभागवार जादा विशेष बस सोडण्याचे नियोजन एसटीने केले आहे.
शिवसेना आणि भाजपला एकमेकांशिवाय पर्याय नाही. भाजपने दोन-पाच जागा जिंकल्या तरी ते शिवसेनेशिवाय राज्य करु शकणार नाही, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. 2014 मध्ये युती तुटली, परत युतीत आलो. सध्या आघाडी किंवा युतीची अवस्था 'तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना' अशी आहे.
शिवसेना आणि भाजपला एकमेकांशिवाय पर्याय नाही. भाजपने दोन-पाच जागा जिंकल्या तरी ते शिवसेनेशिवाय राज्य करु शकणार नाही, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. 2014 मध्ये युती तुटली, परत युतीत आलो. सध्या आघाडी किंवा युतीची अवस्था 'तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना' अशी आहे.
सिंधुदुर्ग : कोकण रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिवाळी गिफ्ट मिळालं आहे. कोकण रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या तुतारी एक्स्प्रेसच्या स्लीपर तसंच जनरल डब्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. 23 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान स्लीपरचा एक डबा तर 3 जनरल डब्यामध्ये वाढ करण्यात आले आहेत. अप, डाऊन अशा दोन्ही मार्गावर डब्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.
नागपुरात ड्रग पेडलरकडून अमली पदार्थ जप्त न करता, त्याच्या संशयास्पदरित्या पळून जाण्यात जबाबदार ठरलेल्या पाच पोलिसांचं अखेर निलंबन झालं आहे. सचिन एनप्रेड्डीवार, राजेंद्र शिरभाते, दिलीप अवगण, रोशन निंबार्ते आणि अभय मारोडे अशी निलंबन झालेल्या पोलिसांची नावं आहेत.

नंदुरबार : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान, ज्वारी, भात मिरची, कापूस ,सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान, ज्वारी काळी पडण्याची शेतकऱ्यांना भीती
मुंबई,पुणे,उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात ढगाळ हवामान राहणार, पावसाचीही शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
कोल्हापूर : कोल्हापूरच्या माले मूडशिंगी गावात आढळले 69 गावठी बॉम्ब, दोघांना अटक, उजळाईवाडी उड्डाणपुलाखालील स्फोटाचा तपास करत असताना पोलिसांना मिळाला बॉम्बसाठा, शिकारीसाठी बॉम्ब वापरत असल्याची आरोपींची माहिती, पोलिसांकडून अधिक तपास सुरु
मुंबईतल्या जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मिलिंदनगरजवळ डंपर मेट्रोच्या बॅरिकेटिंगमध्ये घुसल्याने मध्यरात्री अपघात झाला आहे. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही, मात्र विक्रोळीहून जोगेश्वरीला जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. त्यामुळे विक्रोळीहून जोगेश्वरीला जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी प्रवासासाठी तूर्तासतरी जेव्हीएलआर टाळावा, असं आवाहन केलं जातं आहे.

প্রেক্ষাপট

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in


राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा

1. यंदाच्या दिवाळीवर पावसाचं सावट, २२ ते २८ ऑक्टोबर दरम्यान पावसाचा अंदाज, पुणे, मुंबई, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता

2. घड्याळासमोरील बटण दाबलं तरी मत कमळालाच जात असल्याचा मतदारांचा आरोप, साताऱ्यातल्या नवलेवाडीतील प्रकार, ईव्हीएममध्ये गडबड असल्याचा विरोधकांचा आरोप

3. कुर्ल्यात पूर्व द्रुतगती मार्गावर संतप्त नागरिकांची पोलिसांवर दगडफेक, बेपत्ता मुलीचा शोध न लागल्यानं वडिलांची आत्महत्या, लोकांचा संताप अनावर

4. हुबळी स्फोटाचं कोल्हापूर कनेक्शन उघड, स्फोटकांच्या पार्सलवर शिवसेना आमदार प्रकाश आबिटकरांचं नाव, प्रकरणाचं गूढ उकलण्यांच पोलिसांसमोर आव्हान

5. मतदानावरुन परतताना तराफा उलटला, शहापूरच्या बोराळा गावातील घटना, ९५ नागरिकांचा जीव थोडक्यात बचावला

6. राज्यात कुणाची सत्ता येणार आणि कोण बसणार विरोधी बाकांवर, राजकीय नेत्यांचा एक्झिट पोल आणि स्थानिक पत्रकारांचा अंदाज एबीपी माझावर

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.