भाजप स्वबळावर सत्तास्थापनेपासून 5 जागा दूर, एबीपी माझा सीवोटरच्या एक्झिट पोलचा अंदाज

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु झालं आहे. अनेक दिग्गज मंडळींनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. शरद पवारांनी मुंबईत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात, अजित पवार यांनी बारामतीत तर राज ठाकरे यांनी मुंबईत मतदान केलं. सुरुवातीच्या दोन तासाच मतदारांचा थंड प्रतिसाद पाहायला मिळाला. मात्र दुपारनंतर मतदानाला काहीसा वेग आला आहे.

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 21 Oct 2019 08:57 PM
विभागनिहाय |
मुंबई: - महायुती-31 , महाआघाडी-04, अन्य-1
कोकण : - महायुती-32 , महाआघाडी-05, अन्य-02
मराठवाडा :- महायुती-28 , महाआघाडी-13, अन्य-6
पश्चिम महाराष्ट्र - महायुती-44, महाआघाडी-23, अन्य-3
उत्तर महाराष्ट्र :- महायुती-26, महाआघाडी-10, अन्य- 0
विदर्भ :- महायुती-49, महाआघाडी-08, अन्य-03
महायुती- 210, महाआघाडी-63, अपक्ष आणि इतर-15 जागा मिळण्याचा अंदाज,
पक्षनिहाय आकडेवारी (जागांचा अंदाज)
भाजप - 140, शिवसेना-70, काँग्रेस-31, राष्ट्रवादी-32, अपक्ष आणि इतर 15
भाजप स्वबळावर सत्तास्थापनेच्या 5 जागा दूर, एबीपी माझा सीवोटरच्या एक्झिट पोलचा अंदाज
राज्यात 60.5 टक्के मतदान, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 60.25 टक्के मतदान, दिल्लीत निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत माहिती
महाराष्ट्रातील एकूण 288 जागांपैकी 204 जागांवर महायुती जिंकेल, 69 जागा महाआघाडीला मिळतील तर इतरांना 15 जागा मिळतील. (दुपारी 3 वाजेपर्यंत झालेल्या मतदानानुसारच्या एक्झिट पोलचा अंदाज )

सांगली विधानसभा निवडणुकीत तब्बल 103 वर्षांच्या आजीबाईने आपला मतदानाचा हक्क बजावला, सांगली शहरातील मतदान केंद्रावर आपल्या कुटुंबासमवेत अंजनाबाई गायकवाड यांनी मतदान केले. देशाला स्वातंत्र्यानंतर प्रत्येक निवडणुकीत गायकवाड आजी मतदान करत आहेत.
कोल्हापूर - कागल तालुक्यात मतदान सुरूच ,

रात्री 10 पर्यंत मतदान प्रक्रिया चालण्याची शक्यता
,
जैन्याळ आणि वडगाव गावात मतदान सुरूच
,
1300 मतदार असताना एकच EVM मशीन
,
जैन्याळ गावात 350 मतदार अजूनही रांगेत
,
प्रशासनाच्या कारभारावर मतदार नाराज
,
वडगाव गावात 100 मतदार अजूनही रांगेत
,
अनेक मतदार मतदान न करता घरी परतले
पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 70 जागांपैकी 42 जागांवर महायुती जिंकेल, 25 जागा महाआघाडीला मिळतील तर इतरांना 3 जागा मिळतील. (दुपारी 3 वाजेपर्यंत झालेल्या मतदानानुसारच्या एक्झिट पोलचा अंदाज )
विदर्भातील एकूण 60 जागांपैकी 50 जागांवर महायुती जिंकेल, 9 जागा महाआघाडीला मिळतील तर इतरांना 3 जागा मिळतील. (दुपारी 3 वाजेपर्यंत झालेल्या मतदानानुसारच्या एक्झिट पोलचा अंदाज )
उत्तर महाराष्ट्र विभागातील एकूण 36 जागांपैकी 23 जागांवर महायुती जिंकेल, 12 जागा महाआघाडीला मिळतील. (दुपारी 3 वाजेपर्यंत झालेल्या मतदानानुसारच्या एक्झिट पोलचा अंदाज )
मराठवाडा विभागातील एकूण 47 जागांपैकी 26 जागांवर महायुती जिंकेल, 14 जागा महाआघाडीला मिळतील तर इतरांना 6 जागा मिळतील. (दुपारी 3 वाजेपर्यंत झालेल्या मतदानानुसारच्या एक्झिट पोलचा अंदाज )
कोकण विभागातील एकूण 39 जागांपैकी 32 जागांवर महायुती जिंकेल, 5 जागा महाआघाडीला मिळतील तर इतरांना दोन जागा मिळतील. (दुपारी 3 वाजेपर्यंत झालेल्या मतदानानुसारच्या एक्झिट पोलचा अंदाज )
मुंबईत एकूण 36 जागांपैकी महायुतीला 31, महाआघाडीला 4 तर जागा मिळतील (दुपारी 3 वाजेपर्यंत झालेल्या मतदानानुसारच्या एक्झिट पोलचा अंदाज )
महायुती 200 पार, महाआघाडीला 70 जागा, 3 वाजेपर्यंतच्या मतदानानुसारच्या एक्झिट पोलचा अंदाज
अकोला: तीन वाजेपर्यंत जिल्ह्यातील पाच मतदारसंघात सरासरी 42.06 टक्के मतदान

28-अकोट- 45.41%
29-बाळापूर- 46.63%
30-अकोला पश्चिम- 37.86%
31-अकोला पूर्व- 40.71%
32-मूर्तिजापूर- 40.69%
रायगड : दुपारी 3 वाजेपर्यंत झालेले मतदान

पनवेल 38.93
कर्जत 50.19
उरण 50.77
पेण 44.4
अलिबाग 54.34
श्रीवर्धन 45.73
महाड 45.50

एकूण: 46.13
सिंधुदुर्ग : 3.30 वाजेपर्यंत सरासरी 52.22℅ मतदानाची नोंद

कणकवली - 54.63%
कुडाळ - 50.42%
सावंतवाडी - 51.48%
लातूर जिल्हा : तीन वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी
लातूर ग्रामीण - 46.78%
लातूर शहर -- 40%
अहमदपूर -- 41.22%
उदगीर --44.25%
निलंगा -- 47.03%
औसा -- 46.60

लातूर जिल्ह्याची एकूण सरसरी 44.12%
दुपारी 3 वाजेपर्यंतची नाशिक जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी

ईव्हीएम संदर्भात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे 221 तक्रारी सकाळपासून केल्या आहेत, तीन वाजेपर्यंतसर्वाधिक 13 तक्रारी औरंगाबाद पश्चिम मतदार संघात
त्या खालोखाल 10 तक्रारी नांदेड उत्तर मतदार संघात, नांदेड दक्षिणमध्ये 9 तक्रारी नोंदवल्यात, तसच अकोला पश्चिम आणि कोल्हापूर उत्तर आणि पुणे छावणी येथे 6 तक्रारीची नोंद
पालघर विधानसभेत तीन वाजेपर्यंत 32.69% मतदान,

डहाणू 49.87
विक्रमगड 52.61
पालघर 32.69
बोईसर 50.12
नालासोपारा 37.06
वसई 47.23
पालघर विधानसभेत तीन वाजेपर्यंत 32.69% मतदान,

डहाणू 49.87
विक्रमगड 52.61
पालघर 32.69
बोईसर 50.12
नालासोपारा 37.06
वसई 47.23
जालना जिल्हा 3 वाजेपर्यंत मतदान टक्केवारी

परतुर - 48.76 टक्के
घनसावंगी – 53.63
जालना- 42.19
बदनापुर – 53.5
भोकरदन- 53.35
दुपारी 3 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी
उमरगा - 39.04%
तुळजापूर - 42.73%
उस्मानाबाद - 40.68%
परंडा - 49.09%
औरंगाबाद : मंजूरपुरा भागात राष्ट्रवादी आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात, बोगस मतदानावरून एमआयएम आणि राष्ट्रवादीमध्ये तणाव
दुपारी 3 वाजेपर्यंतची पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी
जुन्नर - 49.03
आंबेगाव - 52.54
खेड - 48.53
शिरुर - 44.86
दौंड - 49.2
इंदापूर - 52.27
बारामती - 52.20
पुरंदर - 46.40
भोर - 48.76
मावळ - 53.6
चिंचवड - 35.79
पिंपरी - 31.28
भोसरी - 40.35
वडगावशेरी - 32.07
शिवाजीनगर - 28.76
कोथरुड -35.32
खडकवासला -37.75
पर्वती - 33.06
हडपसर - 41.16
पुणे कॅन्टोन्मेंट - 27.72
कसबा - 26.33
बुलडाणा जिल्हा, तीन वाजेपर्यंत आकडेवारी
21 मलकापूर - ४३.९७
22 बुलडाणा - ४२.०९
23 चिखली - ४६.२७
24 सिंदखेड राजा - ४५.६६
25 मेहकर - ४७.७१
26 खामगांव- ४८.१९
27 जळगांव जामोद - ४५.७७
एकूण - ४५.६५
नाशिक : दोन्ही हात नसल्याने शेतकऱ्याच्या पायाला शाई लावण्यात आली आहे. देवळाली कॅम्पमधील बाजीराव मोजाड या शेतकऱ्याने मतदान केलं. 2008 साली शेतात राबताना एका अपघातात त्यांनी दोन्ही हात गमावले होते.
अमरावती जिल्हा - दुपारी तीनपर्यंत मतदान टक्केवारी
36- धामणगाव रेल्वे - 38.4
37- बडनेरा - 35.92
38- अमरावती - 33.66
39- तिवसा - 37.84
40- दर्यापूर - 42.23
41- मेळघाट - 45.3
42- अचलपूर - 44.43
43- मोर्शी - 40.08
(जिल्हा सरासरी : 39.42 टक्के)
#MaharashtraAssemblyPolls
अमरावती जिल्हा - दुपारी तीनपर्यंत मतदान टक्केवारी
36- धामणगाव रेल्वे - 38.4
37- बडनेरा - 35.92
38- अमरावती - 33.66
39- तिवसा - 37.84
40- दर्यापूर - 42.23
41- मेळघाट - 45.3
42- अचलपूर - 44.43
43- मोर्शी - 40.08
(जिल्हा सरासरी : 39.42 टक्के)
#MaharashtraAssemblyPolls
गडचिरोली : एटापली तालुक्यातील पुरसुलगोंदी येथील मतदान केंद्रावर भोवळ येऊन शिक्षकाचा मृत्यू
गडचिरोली : एटापली तालुक्यातील पुरसुलगोंदी येथील मतदान केंद्रावर भोवळ येऊन शिक्षकाचा मृत्यू
मुंबई : दादरच्या बालमोहन विद्यामंदिरमधून उत्तमोत्तम अभिनेते आणि अभिनेत्रींची फळी घडवणाऱ्या नाट्यदिग्दर्शिका आणि चित्रकलेच्या माजी शिक्षिका विद्या पटवर्धन यांनी त्यांच्या आजाराची पर्वा न करता छबिलदास हायस्कूल येथील केंद्रावर जाऊन मतदान केलं, आजारामुळं अंथरुणालाच खिळून असतानाही मतदान, काही शिष्य आणि शिष्यांनी मिळून आज अॅम्ब्युलन्समधून मतदानकेंद्रावर त्यांना नेलं
राज्यात सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 15 टक्के मतदान

नंदुरबार- 18.77, धुळे- 17.18

जळगाव- 12.30

बुलडाणा 15.92

अकोला- 15.65

वाशिम- 13.18

अमरावती- 15.21

वर्धा-

नागपूर 14.08

भंडारा- 14.78

गोंदिया- 15

गडचिरोली- 20

चंद्रपूर- 17

यवतमाळ- 19

नांदेड- 13

हिंगोली- 19

परभणी- 11

जालना- 17

औरंगाबाद - 14

नाशिक- 14

ठाणे- 12

मुंबई उपनगर- 13

मुंबई शहर- 13

रायगड- 18

पुणे- 14

अहमदनगर- 14

बीड- 14

लातूर- 10

उस्मानाबाद- 12

सोलापूर- 12

सातारा- 15

रत्नागिरी-19

सिंधुदुर्ग- 18

कोल्हापूर- 21

सांगली- 11

पालघर- 16

कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात बिग फाईट म्हणजे कोल्हापूर दक्षिण होय. या ठिकाणी सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील आणि धनंजय महाडिक यांचे बंधू अमल महाडिक रिंगणात आहेत. मुन्ना आणि बंटी यांच्यामधील वाद जगजाहीर आहे. त्यामुळेच तिसऱ्यांदा ही दोन्ही घराणी समोरासमोर आली आहेत. मात्र असं असलं तरी जे दोन उमेदवार कोल्हापूर दक्षिणमध्ये निवडणूक लढवत आहेत, त्या दोघांचंही मतदान या मतदारसंघात नाही. अमल महाडिक यांचं हातकणंगले मतदारसंघात तर ऋतुराज पाटील यांचं कोल्हापूर उत्तर मतदारसंघात मतदान आहे. दोन्ही उमेदवारांनी मतदानाचा अधिकार बजावला, मात्र स्वतःला मत टाकून घेण्याचं भाग्य त्यांना लाभलं नाही.
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबियांसोबत केलं मतदान, धरमपेठ येथील मनपा शाळेत बजावल मतदानाचा हक्क, राज्यातील नागरिकांना मतदान करण्याचं केलं आवाहन
सकाळी आठ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी | मुंबई उपनगर : कांदिवली पूर्व - 8 टक्के
राज्यात सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत केवळ पाच टक्के मतदान
कोल्हापूर - 9.36 टक्के
अकोला - 5.02 टक्के
ठाणे - 5 टक्के
वाशिम - 6 टक्के.
हिंगोली - 5.75 टक्के
जुन्नर - 22 टक्के
सोलापूर - 3.57 टक्के
🔹औरंगाबाद : पैठण तालुक्यातील वाहेगांव येथील बुथ क्रमाक 4 मतदान यंत्र बंद, गेल्या एक ते दीड तास मशिन बंद
🔹वैजापूर : तालुक्यातील बोरसर येथील मतदान केंद्र क्रमांक 93 मधील मशिन बंद
सकाळी आठ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी | ठाणे : ऐरोली - 2 टक्के, बेलापूर - 4 टक्के
मुंबई : महायुती 200 जागांच्या पार जाणार नाही, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा घरचा आहेर
कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील जवाहरनगर हायस्कूलमधील मतदान यंत्र अद्याप बंद, मशीन बदलण्याची प्रक्रिया सुरु, मतदार रांगेत
सकाळी आठ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी | बीड : आष्टी - 9.50 टक्के, केज- 6 टक्के
वर्धा : समुद्रपूर तालुक्यात मोहगाव येथील मतदान केंद्रावर एक तासापासून ईव्हीएम मशिन बंद, मोहगाव येथील बुथ क्रमांक 50 मधील मशीनमध्ये तांत्रिक बिघाड, मतदारांची मतदान केंद्राबाहेर रांग

सकाळी आठ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी | सातारा : कराड उत्तर - 7 टक्के

सकाळी आठ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी | सातारा : कराड उत्तर - 7 टक्के
अहमदनगर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये केलं मतदान
सकाळी आठ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी | गडचिरोली : आरमोरे - 6 टक्के
सकाळी आठ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी | गडचिरोली : आरमोरे - 6 टक्के
सकाळी आठ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी | नांदेड : भोकर - 5 टक्के
मुंबई : अभिनेता अतुल कुलकर्णी आणि सुनील बर्वे यांनी गोरेगावमध्ये मतदानाचा हक्का बजावला
सकाळी आठ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी | जालना : परतूर - 7 टक्के, घनसावंगी - 7.80 टक्के, बदनापूर- 6 टक्के
गडचिरोली : सातगाव येथे ज्येष्ठ समाजसेवक अभय बंग यांनी पत्नी राणी बंग यांच्यासोबत बजावला मतदानाचा हक्क
गडचिरोली : सातगाव येथे ज्येष्ठ समाजसेवक अभय बंग यांनी पत्नी राणी बंग यांच्यासोबत बजावला मतदानाचा हक्क
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
सिंधुदुर्ग : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांचं कणकवली शहरात सपत्नीक मतदान
सिंधुदुर्ग : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांचं कणकवली शहरात सपत्नीक मतदान
सोलापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे कुटुंबासोबत बजावला मतदानाचा हक्क, कन्या आमदार प्रणिती शिंदेही उपस्थित, जागृती विद्या मंदिर नेहरु नगर येथे मतदानाचा हक्क बजावला
सोलापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे कुटुंबासोबत बजावला मतदानाचा हक्क, कन्या आमदार प्रणिती शिंदेही उपस्थित, जागृती विद्या मंदिर नेहरु नगर येथे मतदानाचा हक्क बजावला
नवी मुंबई : माजी मंत्री गणेश नाईक यांनी आपल्या कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला, यावेळी माजी खासदार संजीव नाईक आणि माजी आमदार संदीप नाईक उपस्थित
ठाणे : भाजप उमेदवार संजय केळकर यांनी तीन हात नाका येथील वन विभागाच्या कार्यालयात मतदान
ठाणे : भाजप उमेदवार संजय केळकर यांनी तीन हात नाका येथील वन विभागाच्या कार्यालयात मतदान
जालना : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सहकुटूंब केलं मतदान, मुलगा संतोष दानवे भोकरदन मतदारसंघातील उमेदवार
जालना : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सहकुटूंब केलं मतदान, मुलगा संतोष दानवे भोकरदन मतदारसंघातील उमेदवार
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जयकुमार रावल यांनी सपत्नीक केलं मतदान
मावळ विधानसभा, राज्यमंत्री आणि भाजप उमेदवार बाळा भेगडे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला, भागडेंनी मतदान केंद्रावर सर्वप्रथम पोहचत केलं मतदान
मावळ विधानसभा, राज्यमंत्री आणि भाजप उमेदवार बाळा भेगडे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला, भागडेंनी मतदान केंद्रावर सर्वप्रथम पोहचत केलं मतदान
शिर्डी : राधाकृष्ण विखे पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क, खासदार सुजय विखेंसह शालिनीताई विखे, धनश्री विखे यांनीही केलं मतदान
शिर्डी : राधाकृष्ण विखे पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क, खासदार सुजय विखेंसह शालिनीताई विखे, धनश्री विखे यांनीही केलं मतदान
नागपूर : सरसंघचालक मोहन भागवत यांनी बजावला मतदानाचा हक्क
नागपूर : सरसंघचालक मोहन भागवत यांनी बजावला मतदानाचा हक्क
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आपल्या गावी चितेगावमध्ये बजावला मतदानाचा हक्क
विरारच्या जिल्हा परिषद शाळा मनवेल पाडा येथे सकाळी साडेसहा वाजल्यापासून मतदारांच्या रांगा, मतदान करुनच कामाला जाणार असल्याचा नागरिकांचं म्हणणं
बारामती : अजित पवार सहकुटुंब काटेवाडेतील मतदान केंद्रावर पोहचले
बारामती : अजित पवार सहकुटुंब काटेवाडेतील मतदान केंद्रावर पोहचले
नागपूर : सरसंघचालक मोहन भागवत मतदान केंद्रावर पोहोचले, थोड्याच वेळात मतदान करणार

প্রেক্ষাপট

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज (21 ऑक्टोबर) मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. तरीही आज पावसाचा जोर कायम राहिला तर मतदारांना घराबाहेर कसं काढायचं असं आव्हान उमेदवारांसमोर असणार आहे. तिकडे मतदान सुरळीत पार पडावं यासाठी निवडणूक आयोग, पोलीस कर्मचारी सज्ज झाले आहेत. लोकशाहीचा हा उत्सव सुरुळीत पार पडावा म्हणून 4 लाख पोलीस तर 6 लाख सरकारी कर्मचाऱ्यांची फौज कामाला लागली आहे. तर तिकडे ज्यांचं राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये कैद होणार आहे त्या उमेदवारांची धाकधूक नक्कीच वाढली आहे. आज जवळपास पावणे नऊ कोटी मतदार सव्वा तीन हजार उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद करणार आहेत.


 


विधानसभा निवडणुकीसाठी 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र (बॅलेट युनिट) आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट (कंट्रोल युनिट) तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे 6.50 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.