Uddhav Thackeray Live | भाजपने मला खोटं पाडण्याचा प्रयत्न केला : उद्धव ठाकरे

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 23 Jan 2020 11:17 PM
नागपूर : दोन ट्रकच्या धडकेत 100 शेळ्यांचा मृत्यू, नागपूर जबलपूर महामार्गावरची घटना, मध्यप्रदेशातील सिवनीकडून नागपूरकडे येणाऱ्या ट्रकमध्ये 300 ते 400 शेळ्या लादून आणल्या जात होत्या
राज ठाकरेंनी झेंड्याचा रंग बदलला म्हणजे राज ठाकरे बदलला असं होत नाही. मी तोच आहे जो पूर्वी होतो, माझी मत तीच आहे जी पूर्वीपासून आहे. रंग बदलून सरकारमध्ये जाणारा राज ठाकरे नाही
देशातील बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोर मुस्लिम ह्या देशातून बाहेर हाकलून देण्याचा. आणि ह्यासाठी केंद्र सरकारला माझा पूर्ण पाठिंबा : राज ठाकरे
सीएए एनआरसी वर अचानक हजारोंचे मोर्चे निघायला लागले आणि हे मोर्चे का निघत आहेत तर कलम ३७० असो व राममंदिराचा सुप्रीम कोर्टाचा निकाल असो त्यावरचा राग रस्त्यावर मोर्चे काढून निघत आहे
माझं केंद्र सरकारला सांगणं आहे की समझौता एक्स्प्रेस बंद करा. आज देशात उभे राहिलेले मोहल्ले हे देशाला त्रास देणार. उद्या जर युद्ध झालं तर सैन्याला बाहेरच्या नाही तर आतल्या शत्रूंशीच लढावं लागेल
नरेंद्र मोदी जेंव्हा चुकले तेंव्हा मीच त्यांच्यावर टीका केली पण जेंव्हा त्यांनी चांगली गोष्ट केली तर त्यांचं अभिनंदन करणारा मीच होतो. कलम ३७० असो की राममंदिराचा विषय असो त्यांचं अभिनंदन करणारा मीच
होतो
माझं केंद्र सरकारला सांगणं आहे की समझौता एक्स्प्रेस बंद करा. आज देशात उभे राहिलेले मोहल्ले हे देशाला त्रास देणार. उद्या जर युद्ध झालं तर सैन्याला बाहेरच्या नाही तर आतल्या शत्रूंशीच लढावं लागेल
धर्म तुमच्या घरात आचरणात आणा. मशिदींवरचे भोंगे हवेत कशाला? आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का? तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही. आणि बांग्लादेशी मुस्लिमांना हाकलून द्या हे सांगणारा पण मीच होतो
मी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे... मी धर्मांतर केलेलं नाही. पण एक सांगतो माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून त्याच्या अंगावर जाईन आणि माझ्या धर्माला नख लावायचा प्रयत्न झाला तर हिंदू म्हणून त्याच्या अंगावर जाईन
झेंडा बदलणं ही काही नवीन गोष्ट नाही, ह्या आधी जनसंघाने देखील झेंडा आणि नाव बदललंच आहे. १९८० साली जनसंघाचं नाव भारतीय जनता पक्ष झालंच होतं की.
मशिदींवरचे भोंगे हवेत कशाला? आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का? तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही : राज ठाकरे
हा झेंडा आणावा हे माझ्या मनात गेले एक वर्ष घोळत होतं आणि माझा मूळचा डीएनए हाच आहे जो ह्या झेंड्याचा रंगाचा आहे. मग ठरवलं अधिवेशनाच्या निमित्ताने हा झेंडा समोर आणायचा
पण स्थापनेच्या वेळेस अनेक जणं आले म्हणाले की झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारलं होतं. ह्या पेक्षा काय वेगळं सोशल इंजिनिअरिंग असणार आहे?
पक्षाच्या स्थापनेच्या वेळेस माझ्या मनात जो झेंडा होता तो झेंडा हाच आहे, ज्या झेंड्याचं अनावरण झालं. संयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा पण भगवा होता.
सोशल मीडियावर कुठलीही भावना वाईट पद्धतीने यायला नको, असं आढळलं तर त्या व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन
हिंगोली : कंटेनरला दुचाकीची धडक, अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी, औंढा नागनाथ ते जिंतूर रोडवरील घटना

भाजप सरकारच्या काळात ज्या नेत्यांचे फोन टॅपिंग आणि पाळत ठेवण्यात आली होती त्याची चौकशी ठाकरे सरकारकडून सुरु करण्यात आलीय. महाराष्ट्र सायबर सेल याची चौकशी करणार आहेत. दिग्विजय सिंग यांच्या आरोपानंतर सरकारची कारवाई
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडून अमित ठाकरे यांचं अभिनंदन, ट्वीटद्वारे शुभेच्छा

अमित राज ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड, बाळा नांदगावकर यांची घोषणा
मनसेच्या मंचावर अमित ठाकरेंचं लॉन्चिंग, पक्षात अमित ठाकरेंना मोठी जबाबदारी मिळणार, राज ठाकरेंसोबत अमित ठाकरेही मंचावर दिसणार
मनसेच्या पहिल्या अधिवेशनाचं लाईव्ह कव्हरेज, 'शिवमुद्रा' असलेल्या नव्या ध्वजाचं अनावरण, ढोल ताशांच्या गजरात मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण, मनसेच्या झेंड्यावर 'शिवमुद्रा'
ढोल ताशांच्या गजरात मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण, राज ठाकरेंनी केलं नव्या झेंड्याचं अनावरण
आमच्यासाठी देखील सस्पेन्स कायम, राज ठाकरे यांनी हिंदुत्व कधीच सोडलं नव्हतं : शर्मिला ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे अधिवेशनस्थळी दाखल, मातोश्री, पत्नी शर्मिला, अमित ठाकरे उपस्थित
शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची 94वी जयंती, उपमुख्यमंत्री अजित पवार स्मृतीस्थळावर दाखल, बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करणार
अमित ठाकरे गोरेगावकडे रवाना
राज ठाकरे कुटुंबीयांसोबत गोरेगावला रवाना, गोरेगावच्या नेस्को मैदानावर कार्यकर्ते पोहचण्यास सुरुवात
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 94 वी जयंती आहे. यानिमित्त शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांचं स्मृतिस्थळ फुलांनी सजवण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानं बाळासाहेबांच्या जयंतीला विशेष महत्व आहे. यानिमित्त बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी ठाकरे कुटुंबीय शिवाजी पार्कवर येणार आहे. याशिवाय राज्यभरातून शिवसैनिक आणि पदाधिकारी येणार आहेत. तसेच महाविकास आघाडीतील मंत्रीही हजेरी लावणार आहेत. तर दुसरीकडे बिकेसी इथे शिवसेना जल्लोष सोहळा आयोजित केला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भव्य सत्कार सोहळा शिवसैनिकांकडून करण्यात येणार आहे.
सत्तेच्या समीकरणात फक्त एका आमदारापुरतं अस्तित्व उरलेल्या मनसेनं कात टाकण्याची तयारी पूर्ण केली आहे. मुंबईतील गोरेगावमध्ये नेस्को मैदानावर मनसेचं आज महाअधिवेशन होत आहे. या अधिवेशनात राज ठाकरे काय गर्जना करणार? याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे. राजकीय आखाड्यात पुन्हा जोमानं उतरण्यासाठी राज ठाकरेंचं इंजिन हिंदुत्वाच्या रुळावर पळवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे मनसे भगव्या झेंड्यासह पुढील वाट धरणार आहे. मनसेच्या या नव्या चेहऱ्यानं महाराष्ट्रातलं राजकीय समीकरण बदलणार का यावर राजकीय विश्लेषकांमध्ये खलबतं सुरु आहेत. शिवाय आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंच्या राजकारणातल्या प्रवेशाची अधिकृत घोषणा होणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.

প্রেক্ষাপট

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in



महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...


1. आज मनसेच्या अधिवेशनात होणाऱ्या राजगर्जनेकडे महाराष्ट्राचं लक्ष, नव्या झेंड्यांची पहिली झलक फक्त एबीपी माझावर, अमित ठाकरेंच्या लाँचिंगची उत्सुकता


 


2. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 94वी जयंती, बीकेसीवर शिवसेनेकडून जल्लोष सोहळ्याचं आयोजन


 


3. भाजप प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा चंद्रकांत पाटलांना संधी मिळणार, कोअर कमिटी बैठकीत निर्णय, बैठकीला पंकजा मुंडेंचीही उपस्थिती, नाराज नसल्याचा पंकजांचा दावा


 


4. आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतील नाईट लाईफला मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील, बार, पब रात्रभर सुरु राहणार नसल्याचं स्पष्ट, निर्णयावर भाजपची टीका


 


5. फडणवीस सरकारनं घेतलेले दोन मोठे निर्णय रद्द, एपीएमसी निवडणुकांत शेतकऱऱ्यांचा मतदानाचा हक्क हिरावला, तर थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड पद्धत रद्द


 


6. महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण होताच ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही निमंत्रण देणार, राऊतांची माहिती


 


एबीपी माझा वेब टीम

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.