LIVE BLOG : आज दिवसभरात... 21 ऑक्टोबर 2019

राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 21 Oct 2019 06:55 AM
बारामती : अजित पवार सहकुटुंब काटेवाडेतील मतदान केंद्रावर पोहचले
राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, उस्मानाबाद जिल्ह्यात मुसळधार पाऊस, तर सोलापूर, पंढरपूर, बीड, सांगलीतील काही भागात पावसाची संततधार
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघातात 2 मृत्यू तर 3 जखमी, कामशेत परिसरातील घटना, मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या बसची ट्रकला मागून धडक, चालकाला डुलकी लागल्याने अपघात झाला असण्याची शक्यता

প্রেক্ষাপট

राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा

1. उद्या होणाऱ्या मतदानावर पावसाचं सावट, मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता, अनेक मतदान केंद्रावर चिखलाचं साम्राज्य

2. उद्या 9 कोटी मतदार ठरवणार सव्वा तीन हजार उमेदवारांचं भवितव्य, लोकशाहीच्या उत्सवासाठी निवडणूक आयोग सज्ज, सुरक्षेसाठी 4 लाख पोलीस कर्मचारी

3. परळीमध्ये मुंडे बहीण भावांच्या अश्रूंचं राजकारण शिगेला, पंकजा मुंडेंच्या आरोपांना उत्तर देताना धनंजय मुंडेही भावूक, भाषणाच्या क्लिपशी छेडछाड केल्याचा आरोप

4. आरोपी आमदार रमेश कदमांची सरबराई करणाऱ्या 5 पोलिसांना घरचा रस्ता, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास पवारांसह 4 कॉन्स्टेबल बडतर्फ

5. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराची मोठी कामगिरी, 22 दहशतवादी आणि 11 पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा, दहशतवाद्यांचे 7 तळ उद्ध्वस्त

6. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा पहिला डाव 497 धावांवर घोषित, दुसऱ्या दिवस अखेर आफ्रिकेच्या 2 बाद 9 धावा, रोहित शर्माचं दमदार द्विशतक

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.