LIVE UPDATES | मध्य रेल्वेची कल्याणहून मुंबईकडे जाणारी जलद वाहतूक विस्कळीत
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ
Last Updated:
21 Jan 2020 11:35 AM
ठाकुर्ली दरम्यान पाटणा एक्स्प्रेसचं इंजिन बंद पडल्यानं कल्याणकडून ठाण्याकडे येणाऱ्या जलद मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प. जलद वाहतूक धीम्या मार्गावर वळवली. मध्य रेल्वेची जलद वाहतूक 20 ते 25 मिनिटं उशिरानं सुरू होणार आहे.
राज्यात मंत्रिपद न दिलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस हायकमांडकडून पहिली राष्ट्रीय जबाबदारी, काँग्रेसचं सरकार असलेल्या राज्यांमध्ये जाहीरनाम्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी काँग्रेसने विशेष कमिटी स्थापन, पृथ्वीराज चव्हाण मध्यप्रदेशमधील समितीचे अध्यक्ष
पुण्याच्या शेतकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज सकाळपासून आंदोलन सुरू केलं आहे. महाविद्यालयाचं प्रशासन आमच्या मागण्या मान्य करत नसल्याने जोपर्यंत कृषी विद्यापीठाचे कुलगुरू महाविद्यालयात येत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याची भुमिका विद्यार्थ्यांनी घेतली. या आंदोलनात कृषी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थीनी सहभागी झाल्याने महाविद्यालयाच कामकाज ठप्प झालंय. महाविद्यालयच्या प्रशासनाने मात्र आपण चर्चला तयार आहोत परंतु विद्यार्थीच चर्चेला येत नाहीत असा दावा केला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एका बंद कंपनीला आग लागलीये. अग्निशमन दलाची वाहन घटनास्थळी पोहचली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरुयेत. शिवराज शुगर ऍण्ड अलाईज प्रॉडक्ट्स नावाची ही कंपनी आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही कंपनी बंद असल्याने कंपनीत कोणीही नव्हतं. सुरक्षा रक्षक बाहेर असल्याने आग लागल्याचं निदर्शनास आले. पण आग नेमकी कशी लागली हे अस्पष्ट आहे. गेल्या आठवड्यात ही चिंचवड मधील बंद कंपनीला अशीच आग लागली होती.
पाथरीला साईंच जन्मस्थळ नव्हे तर तीर्थस्थळ म्हणून निधी, मुख्यमंत्र्यांची वक्तव्य मागे घेतलं? जन्मस्थळावर पाथरीकरांचा दावा कायम
मुंबई : उद्या उद्धव ठाकरे आणि अजय देवगण प्लाझा थिएटरमध्ये एकत्र तान्हाजी सिनेमा पाहणार, उद्या संध्याकाळी 6 वाजता बीएमसी अधिकारी आणि नगरसेवकांसाठी तान्हाजीचा शो आयोजित करण्यात आलाय
नाशिक : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिकमधील महत्त्वाकांक्षी मेट्रो बस प्रकल्पाला छगन भुजबळांकडून ब्रेक मिळण्याचे संकेत, भाजपच्या काळात महापालिकेतील काही वादग्रस्त ठेक्यांबाबत माझ्याकडे तक्रार जाण्यास मी ताबडतोब चौकशी लावणार- भुजबळ
बेळगाव : मंगलोर विमानतळावर जिवंत बॉम्ब सापडल्याने बेळगावात देखील विमानतळावर हायअलर्ट, बेळगाव विमानतळावर बॉम्ब निष्क्रिय पथकाची कसून तपासणी, स्टार एअरची बेळगाव-इंदूर विमानसेवा सुरू होणार असल्याने विमानतळाची तपासणी, राज्यातील महत्वाची रेल्वे स्थानके,विमानतळं येथे अतिदक्षतेचे आदेश
शिर्डीवासियांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची बैठक संपली, बैठकीत सर्वांचं समाधान झाल्याची राधाकृष्ण विखे पाटील, सदाशिव लोखंडे यांची माहिती, कोणत्याही तीर्थक्षेत्राचा विकास करण्यास विरोध नाही- विखे पाटील
भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा; निवडणूक अधिकारी राधामोहन सिंह यांची घोषणा
गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध करण्याच्या सत्ताधारी गटामार्फत हालचाली सुरु, आमदार पी एन पाटील सतेज पाटीलांकडे बिनविरोधचा प्रस्ताव घेऊन जाणार, दुसरीकडे निवडणूक झालीच तर काँग्रेसचे आमदार पी एन पाटील महाडिक गटाला साथ देणार
पृथ्वीराज चव्हाण यांच्या सारख्या नेत्याने केलंलं विधान गांभिर्याने घ्यावं लागेल. जर 2014 ला सुद्धा शिवसेना काँग्रेससोबत जायला तयार होती, तर ते आमच्यासाठी आश्चर्यकारक आहे, यातून त्यांचा खरा चेहरा उघड होत आहे, विचारसरणी आणि तत्त्व अशा गोष्टीच नाही तर सत्ताच त्यांच्यासाठी सर्वोपरी आहे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या (21 जानेवारी) दादर इथल्या इंदू मिलमध्ये होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या जागेची आणि आराखड्याची पाहणी करणार आहेत. उद्या दुपारी साडेतीन वाजता शरद पवार यांच्यासह नवाब मलिक आणि धनजंय मुंडे इंदू मिलमध्ये पोहोचतील.
औरंगाबादमधील अल्पवयीन गतिमंद मुलीच्या छेडछाडप्रकरणातील दोन अल्पवयीन आरोपींना बालसुधारगृहात पाठवण्यात येणार आहे. या प्रकरणातील आरोपी चालक अविनाश शेजुळला 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सर्व आरोपींनी यापूर्वीही असे व्हिडीओ केले आहेत का याची तपासणी करण्यासाठी त्यांचे मोबाईल फोन जप्त करुन तपासणीसाठी पाठवणार आहे.
24 जानेवारीला सीएएविरोधात राज्यव्यापी बंद, एकूण 35 संघटना बंदमध्ये सहभागी होणार : प्रकाश आंबेडकर
#ParikshaPeCharcha2020 | तुमच्या आई-वडिलांच्या मनात दहावी, बारावीबाबत टेंशन असतं, त्यामुळे त्यांचा तणाव कमी करावा, असं मला वाटतंय. मी देखील तुमच्या कुटुंबाचा सदस्य आहे. म्हणून सामूहिकरित्या ही जबाबदारी पार पाडावी, असा विचार माझ्या मनात आला : पंतप्रधान मोदी
मंत्रीपद न मिळाल्याने शिवसेना आमदार भास्कर जाधव यांची नाराजी अद्यापही कायम असल्याचं चित्र आहे. कारण रत्नागिरी जिल्हा नियोजन बैठकीला भास्कर जाधव गैरहजर राहिले. घरगुती कारणास्तव गैरहजर राहिल्याचं स्पष्टीकरण भास्कर जाधव यांनी दिलं. मात्र त्यांचे पुत्र विक्रांत जाधवही या बैठकीला हजर राहिले नाहीत.
‘परीक्षा पे चर्चा 2020’ या कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार, दिल्लीच्या तालकटोरा स्टेडिअमवर थेट संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार, 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना तणावमुक्तीचे धडे देणार
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचा मुलाने सीएए, एनआरसी विरोधात निदर्शनं करणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार, गौरव बापट यांनी पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात नोंदवली तक्रार, यावेळी त्यांनी जंगली महाराज रोडवर निदर्शन करणाऱ्या निदर्शकांच्या विरोधात तक्रार दिली आहे. आणि त्यांनी भाजपविरोधात घोषणाबाजी केल्याचा आरोप केला आहे.
बार्शीतील जगप्रसिध्द नर्गिस दत्त मेमेरियल कॅन्सर हॉस्पिटलचे संस्थापक चेअरमन डॉ. भगवान उर्फ शरद महादेव नेने यांचे वृध्दापकाळाने पुणे येथे उपचार सुरु असताना निधन झाले. त्यांचे वय 80 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली,जावई असा परिवार आहे. डॉ. नेने यांना फुफ्फुसाचाआजार होता. त्यांना दम लागत असल्याने गेल्या आठ दिवसांपासून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.
शिवसेनेने 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला रोखण्यासाठी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तास्थापण्याचा प्रस्ताव दिला होता, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
भाजपला आज नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी उपस्थित
बुलडाण्याच्या मलकापूर शहरातून मागील सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 16 वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह रविवारी मध्यप्रदेशातील नेपानगर जंगलात सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृत विद्यार्थिनीच्या नातेवाईकांसह दोन हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी तिचा मृतदेह घेऊन मलकापूर शहर पोलीस स्टेशनवर रात्री मोर्चा काढला. तिच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, अशी घोषणाबाजी नागरिकांनी केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याऐवजी बेपत्ता झाल्याची नोंद का केली असा सवाल करत ठाणेदार कैलास नागरे यांना नातेवाईकांनी घेराव घातला.
साईबाबांच्या जन्मस्थान वादाच्या पार्श्वभूमीवर आज शिर्डी आणि पाथरीच्या ग्रामस्थांची यांची एकत्रित बैठक होणार आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी दोन वाजता बैठक बोलावली आहे. चर्चेतून तोडगा न निघाल्यास पुन्हा बंद पुकारण्याचा इशारा शिर्डीकरांनी दिला आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील झी बाजार या दुकानाला भीषण आग लागली आहे. या आगीत चार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आझाद बगीचाजवळ झी बाजार आहे. झी बाजार हे कपडे, खेळणी आणि गृहपयोगी वस्तूंचे मोठं दुकान आहे. दरम्यान आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
भाजपला आज नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. सकाळी दहा वाजता जे.पी. नड्डा आपला नामांकन अर्ज दाखल करतील आणि त्यानंतर अध्यक्षांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु होणार आहे. यासाठी विविध राज्यातले पदाधिकारी दिल्लीत दाखल झालेत. अध्यक्षांच्या निवडीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी करण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता परीक्षा पे चर्चा 2020 या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. फेब्रुवारी, मार्चमध्ये देशभरातील अनेक राज्यांमध्ये लवकरच दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरु होतील. त्यामुळे अभ्यासाबाबत निराश आणि हताश होणाऱ्या विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदी आज करणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विनंतीनंतर शिर्डीकरांनी पुकारलेला बेमुदत बंद तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. काल संध्याकाळी शिर्डीत पार पडलेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डीकरांना आज चर्चेसाठी बोलावलं आहे. शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे आणि शिर्डीतील प्रतिष्ठित नागरिक आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. या चर्चेत तोडगा निघाला नाही तर पुन्हा बंद पुकारण्याचा इशाराही शिर्डीकरांनी दिला आहे. तसेच आज शिर्डीकर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला जाणार असले, तरी पाथरीकरांना मात्र आजच्या चर्चेचं निमंत्रण नसल्याचं आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी सांगितलं आहे.
প্রেক্ষাপট
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
महत्त्वाच्या हेडलाईन्स एक नजर...
1. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर शिर्डीकरांचा बंद तात्पुरता मागे, आजच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास पुन्हा बंदचा इशारा
2. सेनापती फिरला पण फौज गायब, अर्जुन खोतकरांकडून विधानसभेतील पराभवाचं खापर भाजपवर, दानवे आणि खोतकर वाद पुन्हा रंगण्याची चर्चा
3. भाजपला आज नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार, जे पी नड्डांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार, निवडणूक प्रक्रियेसाठी देशभरातील पदाधिकारी राजधानी दिल्लीत
4. पोलीस यंत्रणेवरील ताणामुळे मुंबईतील नाईट लाईफचा निर्णय लांबणीवर पडणार, गृहमंत्री अनिल देशमुखांचे संकेत, 22 तारखेला मंत्रिमंडळात चर्चा होणार
5. सुखोई 30 स्वाड्रन लढाऊ विमान भारतीय वायुदलात सामिल होणार, आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थित कार्यक्रमाचं आयोजन
6. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत दणदणीत विजय, विराट आणि रोहित शर्माची शानदार फलंदाजी