LIVE UPDATE | बीडमध्ये ट्रकची कारला धडक, सात जणांचा मृत्यू
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
প্রেক্ষাপট
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
1. सत्तास्थापनेसाठी भाजपने असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यपालांचं शिवसेनेला निमंत्रण, निर्णयासाठी आज संध्याकाळी साडेसातपर्यंत अवधी, सेनेकडून आजच दावा केला जाणार
2. शिवसेना एनडीएतून बाहेर, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत राजीनामा देणार, सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद, ट्वीट करुन भाजपवर टीकास्त्र
3. शिवसेनेच्या पाठिंब्याबद्दल काँग्रेसचा 10 वाजता निर्णय, राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीचीही आज बैठक, शिवसेनेसोबत सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग
4. शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला, सत्तास्थापनेचा दावा करु न शकलेल्या भाजपचा हल्लाबोल, आघाडीसोबत सरकार स्थापन करण्यासाठी सेनेला खोचक शुभेच्छा
5. आचारसंहितेला बळकटी देणारे देशाचे माजी निवडणूक आयुक्त टी एन शेषन यांचं निधन, वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास
6. बांगलादेशला नमवून भारताचा मोठा विजय, तिसऱ्या आणि अखरेच्या टी20 सामन्यात बांगलादेशवर 30 धावांनी विजय, दीपक चहरची हॅटट्रिक
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -