तानाजी सावंतांच्या रिक्त यवतमाळ विधानपरिषदेच्या जागेवर दुष्यंत चतुर्वेदी शिवसेनेचे उमेदवार
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ
Last Updated:
12 Jan 2020 12:02 AM
तानाजी सावंत यांची रिकामी झालेली यवतमाळ विधानपरिषदेच्या जागेवर शिवसेनेची उमेदवारी दुष्यंत चतुर्वेदी यांना,
दुष्यंत चतुर्वेदी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र
साहित्य संमेलनाच्या मंचावर गोंधळ, परिसंवादात गोंधळ, संत परंपरेमुळे बुवाबाजी वाढली का? या विषयावर सुरू होता परिसंवाद, त्यावर काही लोकांनी आक्षेप घेतल्यानं गोंधळ
काँग्रेसशासित राज्यांमध्ये नागरिकत्व कायद्याविरोधात विधिमंडळात कायदेशीर ठराव मंजूर केले जाणार,
काँग्रेस वर्किंग कमिटीच्या आजच्या बैठकीतला सर्वात मोठा निर्णय,
महाराष्ट्रात शिवसेना सोबत असल्याने इथेही हा ठराव मंजूर होणार?
जेपी नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार, 19 जानेवारीला भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत अध्यक्षांची निवड, सूत्रांची माहिती
उस्मानाबादच्या नाराज शिवसैनिकांची मातोश्रीवरची बैठक संपली, बैठकीत तानाजी सावंत यांच्याबाबत कुठलीही चर्चा झाली नसल्याची खासदार विनायक राऊत यांची माहिती, बैठकीत फक्त संघटनात्मक बाबींवर चर्चा झाल्य़ाची खासदार राऊतांची माहिती
सारथी उपोषण : ओबीसी मंत्रालयाचे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता यांना तात्काळ बाजूला करणार : एकनाथ शिंदे
सरकारचा निर्णय सारथीच्या बाजूचा आहे : एकनाथ शिंदे
सारथी संस्थेसाठी संभाजीराजेचं उपोषण, मंत्री एकनाथ शिंदे आंदोलनस्थळी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची संभाजीराजेंशी फोनवरुन चर्चा
सारथी विरोधात मनमानी कारभार सुरु : संभाजीराजे
पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाका बंद करा, खासदार सुप्रिय़ा सुळे यांची केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे ट्विटरच्या माध्यमातून मागणी
मुंबई : तानाजी सावंत यांच्या विरोधात शिवसैनिकांमध्ये नाराजी, उद्धव ठाकरेंनी बोलवलेल्या बैठीकाला तानाजी सावंतांच्या अनुपस्थितमीळे नाराजी वाढली, पक्षातून हकालपट्टी करण्याची शिवसैनिकांची मागणी, या संदर्भात आज मातोश्रीवर आढावा बैठक
मुंबई : तानाजी सावंत यांच्या विरोधात शिवसैनिकांमध्ये नाराजी, उद्धव ठाकरेंनी बोलवलेल्या बैठीकाला तानाजी सावंतांच्या अनुपस्थितमीळे नाराजी वाढली, पक्षातून हकालपट्टी करण्याची शिवसैनिकांची मागणी, या संदर्भात आज मातोश्रीवर आढावा बैठक
सिंधुदुर्गातील कणकवलीत रुग्णवाहिकेतून अवैध दारु वाहतूक, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, रुग्णवाहिकेत गोवा बनावटीचे 80 दारूचे बॉक्स आणि रुग्णवाहिका जप्त, दोन आरोपींना अटक
सोलापूर शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे- पाटील यांची पदावरून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे कारवाई, आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिपद देण्यासाठी बैठक घेऊन दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता, उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सात सदस्यांच्या संपर्कात राहिलाच्या आरोप, पुरुषोत्तम बरडेची प्रभारी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती
LIVE : प्रकृती अस्वास्थ्यामुळे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो मुंबईला परतले, मुंबईतील होली क्रॉस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु, साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो उपस्थितीबद्दल साशंकता
8 जानेवारीला झालेल्या युक्रेनच्या विमान दुर्घटनेत 176 प्रवाशांचा मृत्यू, युक्रेनचं विमान अनवधानाने पाडल्याची इराणची कबूली
8 जानेवारीला झालेल्या युक्रेनच्या विमान दुर्घटनेत 176 प्रवाशांचा मृत्यू, युक्रेनचं विमान अनवधानाने पाडल्याची इराणची कबूली
बुलडाणा : संग्रामपूर येथे एसटी बसचा अपघात, ट्रक्टरची बसला धडक, अपघातात सात जण जखमी, बस सोनाळाहून बुलडाणा येथे येताना संग्रामपूरच्या स्मशानभूमीजवळ अपघात
जुनी शुक्रवारी परिसरात गणेश चौक जवळ पहाटे दोन वाजता एका घराला लागली, यात नरेंद्र बनोदे यांचा जळून मृत्यू झाला, पहाटे 5 वाजता अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट
जुनी शुक्रवारी परिसरात गणेश चौक जवळ पहाटे दोन वाजता एका घराला लागली, यात नरेंद्र बनोदे यांचा जळून मृत्यू झाला, पहाटे 5 वाजता अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट
मराठवाड्यातील ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. शशिकांत भऱ्हाणपूरकर यांचं प्रदीर्घ आजारामुळे निधन, भऱ्हाणपूरकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी नाट्यशास्त्र विभाग प्रमुख, एमजीएम रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करण्यात आलाय. केंद्र सरकारने तशी अधिसूचना जारी केली आहे. नागरिकत्व कायद्याविरोधात देशभर हिंसक आंदोलने झाल्यानंतरही मोदी सरकारने हा कायदा लागू केला आहे.. नागरिकत्व सुधारणा विधेयकावर संसदेतही वादळी चर्चा झाली होती. सीएए कायद्याची अंमलबजावणी करणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
चर्नी रोड-ग्रँट रोडला जोडणारा उड्डाणपूल बुधवारपासून बंद
पश्चिम रेल्वेचा निर्णय, परिसरात वाहतूक कोंडीची शक्यता
প্রেক্ষাপট
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...
1. देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू, केंद्र सरकारची अधिसूचना लागू, कायद्याविरोधातल्या आंदोलनानंतरही केंद्र सरकार ठाम
2. साहित्य संमेलनाध्यक्ष फादर दिब्रिटोंकडून मोदींची अप्रत्यक्ष हिटलरशी तुलना, जेएनयू हिंसाचार आणि बेरोजगारीवरुन खडेबोल
3. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं बारामतीत जंगी स्वागत... हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी, तर परळीत धनंजय मुंडेंच्या स्वागतासाठी 700 किलोचा हार आणि आतषबाजी
4. जेएनयू हिंसाचारामागे डाव्या विद्यार्थी संघटनेचा हात, दिल्ली पोलीस आणि जावडेकरांचा आरोप, तर आरोप फेटाळून लावताना आयेशी घोषचे पोलिसांना प्रत्युत्तर
5. मराठीद्वेषापोटी कन्नडिंगांचा बेळगावात तान्हाजी चित्रपटाला विरोध, ग्लोब सिनेमागृहातले तान्हाजी चित्रपटाचे पोस्टर्स उतरवले