साई जन्मस्थानावरून वाद आणखी चिघळण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीचे पाथरीकरांना निमंत्रण नाही
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ
Last Updated:
19 Jan 2020 11:23 PM
परभणी : परभणी- साई जन्मस्थनावरून वाद आणखी चिघळण्याची शक्यता , मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीचे पाथरीकरांना निमंत्रण नाही
,
ना विश्वस्थाना निमंत्रण ना नेत्यांना
,
निमंत्रण आलं तरच पुरावे घेऊन जाणार
,
राष्ट्रवादीचे आमदार तथा विश्वस्थ बाबाजाणी दुराणी यांची माहिती
रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर वडखळजवळ अपघात, एसटी बसची इको कारला धडक, तिघांचा मृत्यू, दोन जखमी
मुंबई गोवा महामार्गावर वडखळ नजीक अपघात, एसटी बसची इको कारला धडक , 3 मृत, 2 गंभीर
शिर्डी : आज रात्री 12 वाजेपासून शिर्डीचा बंद मागे, उद्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली नाही तर आंदोलनाची पुढची भूमिका ठरविली जाईल, ग्रामसभेत निर्णय
वर्धा : टीईटी परीक्षेच्या दुसऱ्या पेपरला प्रवेश नाकारल्याने विद्यार्थांचा संताप, वर्ध्यातील न्यू इंग्लिश केंद्रावर दुपारी दोन वाजताच्या पेपरला विलंब झाल्याचं कारण सांगत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला, विद्यार्थांचा वेळेत पोचल्याचा दावा
मालेगाव : फुग्यात हवा भरणाऱ्या गॅस सिलेंडरच्या स्फोटात जखमी झालेल्या विद्यार्थिनी शुभांगी पवारचा मृत्यू, 16 डिसेंबरला घोडेगावच्या यात्रेत गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन शुभांगी गंभीर जखमी झाली होती, धुळ्यातील शासकीय रुग्णलायत तिच्यावर उपचार सुरू होते
चिपळूणमध्ये खेळताना बंदुकितील सुटलेला छरा बरगडीत लागून सात वर्षीय यश सुधीर धांगडे बालक जखमी, कामथे हरेकर वाडीतील घटना. पोलिस घटनास्थळी दाखल..
राज्यातील भाजप नेते दिल्लीसाठी रवाना, भाजप कोअर कमिटी सदस्य आणि प्रमाख नेत्यांची दिल्लीत आज संध्याकाळी बैठक, राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक आणि दिल्ली निवडणुकीसाठी जबाबदारी यावर होणार चर्चा
मुंबई मॅरेथॉनमध्ये धावत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने गजानन मालजलकर यांचा मृत्यू
नाईट लाईफ 26 जानेवारी रात्रीपासून सुरू होणार नाही? नाईट लाईफचा निर्णय लांबणीवर जाण्याची शक्यता. आताच पोलीस 12 ते 14 तास काम करत आहेत, इतक्या कमी वेळात नाईट लाईफ सुरू करण्यासाठी लागणारी यंत्रणा अजून तयार नसल्याची माहिती. नाईट लाईफ बाबत विस्तृत प्रस्तावावर 22 जानेवारी रोजी कॅबिनेटमध्ये पहिल्यांदा चर्चा होणार. त्यानंतर निर्णय होऊ शकेल. त्यामुळे हा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता.
कोकण कड्यावरुन पडून प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा मृत्यू; शनिवारी सायंकाळपासून ते बेपत्ता झाले होते.
शिर्डी देवस्थानच्या दप्तरांमधून साईसचरित्राची आठवी प्रत गायब. या प्रतीमध्ये साईबाबांचे जन्मस्थळ पाथरी असल्याचा उल्लेख होता. मंदिर संस्थांनने अतापर्यंत साईसच्चरिताच्या ३६ आवृत्ती शिर्डी मधून प्रकाशित केल्या. त्यापैकी नेमकी आठवी आवृत्ती मंदिर संस्थांच्या दप्तरांमधून गहाळ झाल्याची नोंद
टीईटी परीक्षेसाठी आलेल्या परीक्षार्थींना प्रवेश नाकारल्याने उडाला गोंधळ. हिंगोलीतील आदर्श महाविद्यालय परीक्षा केंद्रावरील प्रकार. शिक्षण विभागातर्फे आज हिंगोली शहरातील एकूण बारा परीक्षा केंद्रावरून सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येते आहे. धक्कादायक म्हणजे उशीर झाल्याचे कारण सांगत सकाळी दहा वाजून दहा मिनिटाला आदर्श महाविद्यालय येथील परीक्षा केंद्रावर गेट बंद करून घेतलय. त्यामुळे परीक्षेसाठी आलेल्या शिक्षकांना केंद्रावर प्रवेश न दिल्याने एकच गोंधळ उडाला.
सरन्यायाधीश शरद बोबडे यांची नागपुरात बॅटींग, नागपूर बार असोसिएशनच्या वतीने क्रिकेट सामना..
कोकण कड्यावरून रँपलींग करताना अरुण सावंत हे काल संध्याकाळपासून बेपत्ता झाले आहेत. हरिश्चंद्र गडावर काल संध्याकाळी 5 वाजता ही घटना घडली आहे. स्थानिकांच्या मदतीने अरुण सावंत यांचा शोध सुरु आहे.
धुळ्यात तापमान तीन अंश सेल्सिअसने वाढले. तापमानाचा पारा आठ अंश सेल्सिअसवर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई मॅरेथोनच्या ड्रिम रनचे उद्घाटन, छगन भुजबळ आणि आदित्य ठाकरे देखील उपस्थित...
मुंबई मॅरेथॉनमधल्या सर्वोत्तम धावपटूंच्या मुख्य शर्यतीला सुरुवात झाली आहे. या शर्यतीत देशविदेशातल्या धावपटूंचा समावेश आहे. या धावपटूंची कामगिरी मुंबई मॅरेथॉनचं मुख्य आकर्षण ठरतं आहे
देशविदेशातल्या पंचावन्न हजारांहूनही अधिक धावपटूंचा सहभाग असलेल्या मुंबई मॅरेथॉनमधल्या विविध शर्यतींना आज भल्या पहाटे सुरुवात झाली. हौशी धावपटूंच्या फुल मॅरेथॉनला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. तसंच एकवीस किलोमीटर्स अंतराच्या अर्धमॅरेथॉन शर्यतीला वरळी डेअरी येथून सुरुवात झाली. मुंबईतल्या गुलाबी थंडीमुळं यंदा मॅरेथॉनच्या वातावरणात मोठा उत्साह दिसून येत आहे.
প্রেক্ষাপট
महत्त्वाच्या हेडलाईन्स एक नजर...
गुलाबी थंडीत मुंबई मॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरूवात, देशविदेशातल्या 55 हजारांहून अधिक धावपटूंचा सहभाग
आजपासून शिर्डीत बेमुदत बंद, पाथरीला साईबाबांचं जन्मस्थळ घोषित करण्यास तीव्र विरोध, तर सोमवारी मुख्यमंत्र्यांची पाथरीवासियांसोबत बैठक
सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध करणाऱ्यांना अंदमान तुरुंगात पाठवा, काँग्रेसला इशारा देणाऱ्या राऊतांची नंतर सारवासारव, भाजप मनसेकडून सेनेवर टीका
औरंगाबादमध्ये टोळक्याकडून गतीमंद मुलीचा विनयभंग आणि मारहाण, व्हीडिओ व्हायरल, सर्व स्तरातून तीव्र संताप, एक आरोपी गजाआड
कारच्या अपघातात ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी जखमी, खालापूर टोलनाक्याजवळ दुर्घटना, आझमींवर रूग्णालयात उपचार सुरू
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान बंगळुरुमध्ये तिसरी निर्णायक लढत, सामना जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी दोन्ही संघांमध्ये काँटे की लढत