28 तारखेला सायंकाळी 5.30 वाजता शपथविधी, उद्धव ठाकरे शिवतीर्थावर शपथ घेणार
विश्वासदर्शक ठराव केव्हा मंजूर करून घ्यायचा याबाबत आज सर्वोच्च न्यायालय आदेश देणार असून त्यानंतर महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेसंदर्भातील पेचाला कोणतं वळणं मिळणार, याकडे सर्वांचं लक्षं लागलं आहे.
ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 26 Nov 2019 10:51 PM
প্রেক্ষাপট
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात 23 नोव्हेंबरला एक अनपेक्षित घटना घडली असून त्यावरून राजकीय समीकरणांमध्ये बदल घडून आल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तास्थापनेचा दावा करण्याआधीच 23 नोव्हेंबरला सकाळी देवेंद्र फडणवीस...More
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात 23 नोव्हेंबरला एक अनपेक्षित घटना घडली असून त्यावरून राजकीय समीकरणांमध्ये बदल घडून आल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तास्थापनेचा दावा करण्याआधीच 23 नोव्हेंबरला सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपालांच्या आदेशानुसारच हे सरकार स्थापन करण्यात आले असल्याचा दावा भाजपने केला. तर अजित पवार यांनी घेतलेला निर्णय त्यांचा वैयक्तिक आहे, राष्ट्रवादीचा त्यांना कोणत्याही स्वरूपात पाठिंबा नसल्याचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी स्पष्ट केलं.भाजपच्या सत्तास्थापनेविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रात स्थापन केलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारने ताबडतोब विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश द्यावा, ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांनी केलेली विनंती मान्य करायची की नाही व मान्य केली तर विश्वासदर्शक ठराव केव्हा मंजूर करून घ्यायचा, याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय मंगळवारी सकाळी ११ वाजता देणार आहे.हा महाराष्ट्र आहे, फोडाफोडी करायला हे गोवा-कर्नाटक नाही; शरद पवारांचा भाजपला इशाराफडणवीस आणि पवार यांच्याकडे बहुमत नसूनही त्यांना सरकार स्थापन करण्याची परवानगी कशी दिली? राज्यपालांचा हा निर्णय रद्द करावा आणि आम्हाला राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी परवानगी द्यावी, अशा दोन प्रमुख मागण्या करत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी केलेल्या याचिकेवर न्या. एन. व्ही. रमणा, न्या. अशोक भूषण व न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठापुढे लागोपाठ दुसऱ्या दिवशी, सोमवारी साधारणतः 80 मिनिटं सुनावणी करण्यात आली. सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी मंगळवारी आदेश देण्यात येईल असं जाहीर केलं.पाहा व्हिडीओ : व्हिपचा अधिकार कुणाचा? माझा विशेषशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं शक्ती प्रदर्शनराज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष मिळून सरकार स्थापन करणार होते. परंतु राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करुन भाजपला पाठिंबा दिला. त्या जोरावर भाजपने महाराष्ट्रात सत्तास्थापन केली. परंतु भाजपकडे सत्तास्थापन करण्यासाठीचे आमदारांचे पुरेसे संख्याबळ नसल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. कारण आज मुंबईतील हॉटेल ग्रॅण्ड हयात येथे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, मित्रपक्ष आणि अपक्ष मिळून 162 आमदारांनी शक्तीप्रदर्शन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यानी भाषण करताना उपस्थित आमदार आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे मनोधैर्य वाढवलं.पाहा व्हिडीओ : माझं अजित पवारांवर असलेलं प्रेम वेगळं, मात्र मी शरद पवार साहेबांसोबतच - धनंजय मुंडेसंजय राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये राज्यपालांना केलं टॅगशक्तीप्रदर्शनापूर्वी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी एक ट्वीट केलं. ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की, आम्ही सर्व एक आहोत. तुम्ही आमच्या 162 आमदारांना पहिल्यांदा हॉटेल ग्रॅण्ड हयात येथे पाहू शकाल. असं ट्वीट करत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनाही टॅग केलं होतं.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
'महाराष्ट्र विकास आघाडी' म्हणून आघाडीच्या नावाला राजू शेट्टी, अबू आझमी, बच्चू कडू, कपिल पाटील यांचं अनुमोदन