LIVE UPDATES | पुण्यात भाजपला धक्का, तळेगाव नगरपरिषद पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीचा विजय

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 10 Jan 2020 04:17 PM
बारामतीमध्ये अजित पवारांचं जल्लोषात स्वागत, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित दादा पहिल्यांदाच बारामतीत, मोठ्या जल्लोषात मिरवणुकीला सुरुवात
बारामतीमध्ये अजित पवारांचं जल्लोषात स्वागत, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित दादा पहिल्यांदाच बारामतीत, मोठ्या जल्लोषात मिरवणुकीला सुरुवात
पुणे जिल्ह्यात भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. तळेगाव नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीने विजय मिळवला आहे. भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या आमदार सुनील शेळकेंनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. त्याच पदासाठी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत, आमदारांच्या काकी संगीता शेळके नशीब अजमावत होत्या. अपक्ष उभं करुन महाविकासआघाडीने त्यांना पाठिंबा दर्शवला होता. संगीता यांनी भाजपच्या कृष्णा म्हाळसकर यांचा 795 मतांनी पराभव केला. म्हाळसकर हे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंचे समर्थक आहेत. विधानसभा निवडणुकीत बाळा भेगडेंचा पराभव करुन सुनील शेळकेंनी भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. याची पुनरावृत्ती तळेगाव नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीतही झाली.
नाशिक महापालिका पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळालं आहे. सातपूर प्रभाग 26 अ मधून महाविकास आघडीचे मधुकर जाधव (शिवसेना) विजयी झाले आहेत. तर मनसेचे दिलीप दातीर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर नाशिकरोड प्रभाग 22 मधून महाविकास आघडीचे जगदीश पवार (राष्ट्रवादी) विजयी झाले आहेत.

ओबीसी नेत्यांचं शिष्टमंडळ आजा विधासनभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेणार आहे. आज सकाळी 11.30 वाजता पटोले यांच्या 'चित्रकूट' या शासकीय निवासस्थानी ही भेट होणार आहे. जातीनिहाय जनगणना करण्याची केंद्राला शिफारस केल्याबद्दल ओबीसी नेत्यांचं शिष्टमंडळ विधानसभा अध्यक्षांचं अभिनंदन
करणार आहे. तसेच मराठा आरक्षणाची अमंलबजावणी करताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये याबाबतच्या कायद्यावर फेरविचार करण्याची मागणीही करणार आहे.

Live Update | 93 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडीला सुरुवात, शहरी आणि ग्रामीण भागातील जवळपास दीड हजार विद्यार्थी, 30 ढोल ताशा पथक आणि विविध मान्यवर, साहित्यिक या ग्रंथ दिंडीत सहभागी
Live Update | 93 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडीला सुरुवात, शहरी आणि ग्रामीण भागातील जवळपास दीड हजार विद्यार्थी, 30 ढोल ताशा पथक आणि विविध मान्यवर, साहित्यिक या ग्रंथ दिंडीत सहभागी
स्वातंत्र्याचे मारेकरी अनेक असतात, प्रत्येकानं आपलं स्वातंत्र्य हाती घ्यायला हवं : फादर फ्रान्सिस दिब्रेटो
लोकशाहीत सर्वांना जगण्याचा अधिकार, स्वातंत्र्य हवं असेल तर जागरुक राहणं गरजेचं : फादर फ्रान्सिस दिब्रेटो
सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी गडावरील कळूबाईची यात्रा आज संपन्न होत असून या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहतात. शाकंभरी पौर्णिमेला भरणा-या या यात्रेचा हा आजचा महत्त्वाचा दिवस मानला जातो. 2005 मध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर या गडावरील संपूर्ण यात्रा ही शासकीय यंत्रणेकडून पार पाडली जाते. गडावर चौका चौकात पोलिस यंत्रणा तैनात करण्यात आली असून प्रत्येक वाहनाची तपासनी केली जात आहे. गडावर कोंबडे बकरे आणि वाद्य नेण्यास परवानगी नसल्यामुळे असे साहित्य सापडल्यावर ते जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर 10 आणि 11 जानेवारी रोजी दोन दिवस रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. माहिम ते वांद्रे स्थानकादरम्यान असलेल्या उड्डाणपुलावर गर्डर बसवण्यासाठी 10 जानेवारीच्या मध्यरात्री आणि 11 जानेवारीच्या मध्यरात्री धीम्या व जलद मार्गावर ब्लॉक घेतला जाईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.
मुंबईतील गोरेगावमध्ये नामांकित कंपन्यांच्या दुधामध्ये भेसळ करणाऱ्या टोळीला अटक, मुंबई पोलीस गुन्हे शाखा युनिट नंबर 12 पथकाच्या कारवाईला यश

প্রেক্ষাপট

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...

1. नव्या पुराव्यांसह चौकशीची मागणी केली तर जस्टिस लोयाप्रकरणी पुन्हा तपास, गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती तर तपासाच्या संकेतावरुन राजकारण तापलं

2. वैचारिक भूमिका बदलल्यास मनसेला सोबत घेण्याचा विचार करु, गुप्त बैठकीवर बोलताना देवेंद्र  फडणवीस यांचं मोठं विधान

3. 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर विनयभंगप्रकरणी डीआयजी निशिकांत मोरे निलंबित, अटकपूर्व जामीन फेटाळला, मुख्यमंत्र्यांच्या ड्रायव्हरचीही हकालपट्टी, तरुणी यूपीत असल्याची माहिती

4. उस्मानाबादेत आजपासून मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात, उद्घाटक ना. धों. महानोर यांना धमकीचे पत्र, सुरक्षेमध्ये वाढ

5. आज फिल्मी फ्रायडेला दोन बिग बजेट चित्रपटांमध्ये लढाई, अजय देवगणच्या 'तानाजी'ची दीपिका पदूकोणच्या 'छपाक'शी टक्कर

6. इराणच्या क्षेपणास्त्रांच्या माऱ्यामुळे युक्रेनच्या विमानाचा अपघात, अमेरिकेचा धक्कादायक दावा, विमान दुर्घटनेत तब्बल 176 प्रवाशांचा मृत्यू

एबीपी माझा वेब टीम

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.