महाविकासआघाडीच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे दोन तास महापौर बंगल्यावर
काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील किमान समान कार्यक्रम तयार झाला असून आज तो शिवसेनेसमोर मांडला जाईल. यानंतर आज कोणत्याही क्षणी सत्ता स्थापनेची घोषणा होऊ शकते. सोबकत सरकार बनवल्यानंतर खातेवाटप कसं करायचं हे देखील ठरलं आहे. त्यामुळे आता केवळ घोषणेची प्रतीक्षा आहे.
ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ
Last Updated:
22 Nov 2019 10:05 PM
महाविकासआघाडीच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे दोन तास महापौर बंगल्यावर
महाविकासआघाडीची चर्चा सकारात्मक, उद्याही चर्चा - पृथ्वीराज चव्हाण
महाविकासआघाडीची चर्चा सकारात्मक, उद्याही चर्चा - पृथ्वीराज चव्हाण
महाविकासआघाडीची चर्चा सकारात्मक, उद्याही चर्चा - पृथ्वीराज चव्हाण
मुख्यमंत्रीपदाचा आग्रह उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला, संजय राऊत यांची एबीपी माझाला फोनवरुन माहिती
महाविकासआघाडीची संयुक्त बैठक सुरु, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित...
मुंबई : उद्धव ठाकरे वरळीतल्या नेहरु सायन्स सेंटरमध्ये पोहोचले, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेची महत्त्वाची बैठक
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत वरळी येथील नेहरु सायन्स सेंटरमध्ये दाखल,
नेहरु सेंटरमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत वरळी येथील नेहरु सायन्स सेंटरमध्ये दाखल,
नेहरु सेंटरमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे.
वांद्र्यातील एमसीएमध्ये मल्लिकार्जुन खर्गे, वेणुगोपाल, अहमद पटेल उपस्थित; शरद पवार आणि उद्धव ठाकरेही पोहोचण्याची शक्यता
बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदावर चर्चा होणार, सूत्रांची माहिती
हॉटेल द ललितमध्ये सर्व शिवसेना आमदारांचा मुक्काम असणार आहे. प्रताप सरनाईक आणि अरविंद सावंत आमदारांसोबत उपस्थित आहेत.
नेहरु सेंटरमध्ये होणार महाविकासआघाडीची बैठक, शरद पवार, संजय राऊत पोहोचले, थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसचे नेतेही पोहोचणार
नेहरु सेंटरमध्ये होणार महाविकासआघाडीची बैठक, शरद पवार, संजय राऊत पोहोचले, थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसचे नेतेही पोहोचणार
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी ही संधीवादी आघाडी असून त्यांनी राज्यात सरकार स्थापन केलं तरी ते सहा ते आठ महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची टीका

सत्ता स्थापनेबाबत शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी लागणारं पत्र तयार झालं असून त्यावर काँग्रेस नेत्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
सत्ता स्थापनेबाबत शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी लागणारं पत्र तयार झालं असून त्यावर काँग्रेस नेत्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादीची मित्रपक्षांसोबतची बैठक संपली, सत्तेच्या फॉर्म्युल्यावर चर्चा, शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास मित्रपक्षांचा दोन्ही पक्षांना पाठिंबा
कोणाच्याही मनात शंका नाही, शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार : माणिकराव ठाकरे
शरद पवार यांची मला आणि सगळयांना भीती वाटते कारण शपथविधी होईपर्यत ते कुठे जातील सांगता येत नाही, माझी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जायची मानसिकता नव्हती पण परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागला, मुख्यमंत्री कोणीही होवो पण शिवसेनेचा होवो हीच इच्छा : आमदार बच्चू कडू
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं, मातोश्रीवरील बैठकीत शिवसेना आमदारांची मागणी, उद्धव ठाकरेंनंतर एकनाथ शिंदे यांना पसंती, सूत्रांची माहिती
शिवसेना आमदारांची मातोश्रीवर बैठक सुरु झाली आहे. त्यासाठी राज्यातील सर्व आमदार मातोश्रीवर पोहोचले आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल, नियमित तपासणीसाठी राऊत रुग्णालयात
शिवसेना खासदार संजय राऊत पुन्हा लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. अॅन्जिओप्लास्टी झाल्यानंतर आठवडाभराने संजय राऊत नियमित तपासणीसाठी रुग्णालयात पोहोचले आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत पुन्हा लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. अॅन्जिओप्लास्टी झाल्यानंतर आठवडाभराने संजय राऊत नियमित तपासणीसाठी रुग्णालयात पोहोचले आहेत.
मोठ्या शत्रूला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी छोट्या शत्रूला जवळ करणं गरजेचं होतं, असं वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांनी केलं आहे. महाविकासआघाडीचं सरकारच मुस्लिमांना आरक्षण देऊ शकतं, असंही अबू आझमी म्हणाले.

महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच असेल आणि मुख्यमंत्रीपदाचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिलं आहे.
मुख्यमंत्रीपदी शिवसैनिक विराजमान होणार, पुढील पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीच्या चर्चेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांचं स्पष्टीकरण

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. याआधी शिवसेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांची नावं चर्चेत होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची संजय राऊत यांच्या नावाला पसंती असल्याचं कळतं.
शिवसेनेची बैठक होत असतानाच काँग्रेसच्या नेत्यांची मुंबईत महत्वाची बैठक होणार आहे. दुपारी 1 वाजता होणाऱ्या या बैठकीत काँग्रेसच्या विधीमंडळ नेत्याची निवड केली जाईल. काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदासाठी बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाणांच्या नावांमध्ये चुरस असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे विधीमंडळ नेतेपद कुणाला मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. तरी, या बैठकीआधी दुपारी 12 वाजता काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आघाडीतल्या मित्रपक्षांशी बैठक घेणार आहेत.
প্রেক্ষাপট
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाच्या 29 दिवसांनी सरकार स्थापनेची प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह मित्रपक्षांची महाविकासआघाडी आजच सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज (22 नोव्हेंबर) दुपारी संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीनंतर संध्याकाळी महाविकासआघाडी सरकार बनवण्याचा दावा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सत्तापेच लवकर सुटेल, अशी अपेक्षा आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील किमान समान कार्यक्रम तयार झाला असून आज तो शिवसेनेसमोर मांडला जाईल. यानंतर आज कोणत्याही क्षणी सत्ता स्थापनेची घोषणा होऊ शकते. सोबकत सरकार बनवल्यानंतर खातेवाटप कसं करायचं हे देखील ठरलं आहे. त्यामुळे आता केवळ घोषणेची प्रतीक्षा आहे.
सिल्वर ओकवर राष्ट्रवादी-शिवसेनेची खलबतं
शरद पवार दिल्लीहून मुंबईत दाखल होऊन तासही लोटत नाही तोच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत सिल्वर ओकमध्ये दाखल झाले. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये काल (21 नोव्हेंबर) रात्री जवळपास सव्वा तास महत्त्वाच्या विषयावर खलबतं सुरु होती. रात्री 11 वाजता सुरु झालेली चर्चा सव्वाबारा वाजती संपली. राष्ट्रवादीकडून स्वतः शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हजर होते. मुख्यमंत्रिपद, विधानसभाअध्यक्ष, खातेवाटप, एकसूत्री कार्यक्रम यासह अनेक महत्वाच्या मुद्यांवर पवार आणि ठाकरेंमध्ये सविस्तर चर्चा झाल्याचं कळतं. बैठक संपल्यानंतर शरद पवारांच्या निवासस्थानातून बाहेर पडताना संजय राऊतांनी सकारात्मक चर्चा झाल्याचे संकेत दिले.
पवार-ठाकरे भेटीनंतर नवा फॉर्म्युला समोर
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर आता महाविकासआघाडीचा नवा फॉर्म्युला समोर येत आहे. या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला 11 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्रीपदं, राष्ट्रवादी काँग्रेसला 11 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रीपदं तर काँग्रेसला 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदं मिळणार आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या नव्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला 27 महामंडळे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 25 महामंडळे मिळणार आहेत. तर सिद्धिविनायक ट्रस्टचा कारभार शिवसेनेकडे आणि शिर्डी संस्थानचा कारभार काँग्रेस आणि राष्ट्रवादी पाहणार आहेत.
मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपचा मार्ग वेगळा
24 ऑक्टोबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर सरकार स्थापनेचा पेच वाढला होता. निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळालं होतं. परंतु मुख्यमंत्रीपदाचा 50-50 म्हणजेच अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला होता, तो भाजपने मान्य करावा अशी मागणी शिवसेनेने सातत्याने केली. परंतु असा कोणताही फॉर्म्युला ठरला नव्हता, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसल्याने दोन्ही पक्षाचे मार्ग वेगळे झाले. शिवाय भाजपने शिवसेनेला एनडीएमधून बाहेर काढत असल्याचं जाहीर केलं.
मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावाचा आग्रह
शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे असावेत, असा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आग्रह असल्याची माहिती समोर येत आहे. महाविकासआघाडीचा मुख्यमंत्री हा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांतील नेत्यांचा प्रमुख असणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची धुरा स्वतः उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या खांद्यावर घ्यावी, अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
संबंधित बातम्या