LIVE BLOG : वरळी विधानसभा मतदारसंघात चार कोटींची रक्कम जप्त, निवडणूक भरारी पथकाची मोठी कारवाई

दिवसभरात महत्तावाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 19 Oct 2019 08:23 PM
परळीत सभा आटोपल्यानंतर पंकजा मुंडेंना स्टेजवरच भोवळ आली, त्यामुळे त्या खाली कोसळल्या. पंकजा मुंडे यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
वरळी विधानसभा मतदारसंघात चार कोटींची रक्कम जप्त, निवडणूक भरारी पथकाची मोठी कारवाई
आचारसंहितेच्या नियमानुसार विधानसभा निवडणुकीचा प्रचार थंडावला, 21 सप्टेंबरपासून राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. शेवटच्या टप्प्यात आजच्या दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंकडून मोठ्या रॅली आणि सभांचं आयोजन करण्यात आलं होतं.
औरंगाबादच्या कन्नड मतदारसंघातले अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना एमआयएमनं पाठिंबा जाहीर केलाय, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलिल यांनी ही माहिती दिलीय.
भर पावसात सभा घेणाऱ्या शरद पवारांचं आदित्य ठाकरेंनी कौतुक, शरद पवारांकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे असं आदित्य ठाकरे म्हणालेत, मुंबईत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंचा रोड शो सुरु आहे
भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यांकडूनच चंद्रकांत पाटलांचा चंपा असा उल्लेख, अजित पवारांचा पुण्यात खुलासा, निवडणुकीनंतर मंत्र्यांचं नाव सांगण्याची ग्वाही
नागपूर जिल्ह्यातील आजनी गावात कालवा फुटल्याने गावात पाणी शिरलं आहे. फुटलेला कालवा पेंच धरणाचा असल्याची माहिती आहे. गावात सर्वत्र गुडघाभर पाणी शिरल्याने लोकांचं मोठं नुकसान झालं आहे. ग्रामस्थांच्या दैनंदिन वापरातल्या वस्तू आणि आर्थिक हानी झालीय. शिवाय, या दुर्घटनेत एक गाय दगावली आहे.
मुंबई- राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची आज तब्बल 12 तास ईडीकडून चौकशी करण्यात आली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय इकबाल मिर्चीसोबत आर्थिक आणि जमीन व्यवहार केल्याचा पटेल यांच्यावर आरोप आहे.

প্রেক্ষাপট

 




    1. अब की बार 220 पार'ची लक्ष्यपूर्ती कठीण, मात्र राज्यात महायुतीची सत्ता, ओपिनियन पोलचा अंदाज, आघाडीचे आकडे जैसे थेच राहण्याची चिन्ह



 




    1. साताऱ्यात भर पावसात शरद पवार बरसले, लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना तिकीट देऊन चूक केल्याचा कबुलीनामा, आजही चार सभा



 




    1. 25 तारखेला मातोश्रीसमोर येऊन कायमचं तोंड बंद करेल, नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका, शेळ्या-मेंढ्याचा उल्लेख करत शिवसेनेची खिल्ली



 




    1. अटकेत असलेले रमेश कदम ठाण्यातील घरात, 53 लाखांची रोकड हस्तगत, पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह



 




    1. भंडाऱ्यातील साकोली मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये जुंपली, नाना पटोलेंचा पुतण्या गंभीर जखमी, मतदारसंघात तणाव



 




    1. बिग बी अमिताभ बच्चन यांना तीन दिवसानंतर डिस्चार्ज, मेडिकल बुलेटीन प्रकाशित करण्यासाठी कुटुंबियांचा नकार, सुत्रांची माहिती



 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.