LIVE | Bharat Bandh | यंदाचे 100 वे नाट्यसंमेलन सांगलीत

सीएए, एनआरसी आणि ईव्हीएमविरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. आजच्या बंदच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 29 Jan 2020 08:06 PM
यंदाचे 100 वे नाट्यसंमेलन सांगली येथे होणार आहे. 25 मार्चला तंजावरला जाऊन व्यंकोजी राजे ह्यांचं पहिले नमन करणार आणि 26 मार्चला सांगलीत नाट्यदिंडी होणार आहे. 27 मार्चला सांगली येथे नाट्यसंमेलनाचे उदघाटन होणार आहे. तर 14 जूनला मुंबईत समारोप होणार आहे. दरम्यान 27 मार्च पासून 7 जून पर्यंत महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी छोटी छोटी संमेलन होणार आहे.
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील मौजा पेरिमिलीभट्टी जंगल परिसरात पोलीस-नक्षलवादी चकमकीत 5 नक्षलवाद्यांना अटक, कुटूल नक्षल दलममधील दोन तर जनमिलिशियामधील तीन सदस्यांचा समावेश
सरपंचांची निवड थेट जनतेतून निवडणुकीऐवजी आता निवडून आलेल्या सदस्यांमधूनच करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
भारतबंद | औरंगाबाद शहरात एसटी बस अडवणाऱ्या जमावाची पोलिसांना धक्काबुक्की, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबलला धक्काबुक्की, पोलिसांचा कॅमेराही फोडला, दिल्ली गेट जवळील घटना
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 सामना, अटीतटीच्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये भारताचा विजय
प्रणय निर्बाण (अमरावती) : अमरावती शहरात बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजित बंदला कुठलाही परिणाम नाही. मात्र, मुस्लीम समाजाकडून व्यापार बंद आहे. शहरातील इर्विन चौकात लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
उमेश अलोणे (अकोला) : अकोला जिल्ह्यातील पातूर शहरात आजच्या बंदला हिंसक वळण लागलं आहे. संतप्त जमावाने एका खाजगी मालवाहू वाहनाच्या काचा फोडल्या आणि ट्रक जाळण्याचा प्रयत्न केला. तर काही ठिकाणी दगडफेकीच्याही घटना घडल्या आहेत. यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.
अनिल वर्मा (भिवंडी) : एनआरसी आणि सीएएच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चाने भारत बंदची हाक दिली आहे. या भारत बंदला भिवंडीत अनेक ठिकाणी, विशेषत: मुस्लीम मोहल्ल्यांमध्ये प्रतिसाद मिळत आहे. काही भागात व्यवहार सुरळीत आहेत तर तीनबत्ती, वंजारपट्टी नाका, धामणकर नाका, बाला कम्पाऊंड, शांती नगर, खंडू पाडा, गैबीनगर आदी भागातील मुस्लीम मोहल्यात दुकाने बंद ठेऊन या बंदला प्रतिसाद दिला आहे.
सारंग पांडे (चंद्रपूर) : चंद्रपूर शहरात बहुजन क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदचा सध्या कुठलाच परिणाम जाणवत नाही.
रोमित तोंबर्लावार (गडचिरोली) : गडचिरोलीत बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजित भारत बंदचा फारसा परिणाम दिसत नाही. मात्र मुस्लीम समाज गडचिरोलीच्या वतीने सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
विकास दळवी (हिंगोली) : बहुजन क्रांती मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला हिंगोली शहरात कुठलाही परिणाम दिसत नाही. मात्र जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या कळमनुरी आणि वसमत शहरांमध्ये बंदला अल्प प्रतिसाद मिळत आहे. काही व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली आहेत, तर काही दुकाने सुरु आहेत.
कुलदीप माने (सांगली) : बहुजन क्रांती मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सांगली बस स्थानकातील आंदोलक जमण्यास सुरुवात झाली आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून बस वाहतूक रोखण्यात आली आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुसरीकडे मिरजमध्ये बंदला हिंसक वळण लागलं आहे. काही तरुणांनी आंदोलनादरम्यान सांगली-मिरज रस्त्यावर जबरदस्तीने रिक्षा बंद केल्या. तर एका रिक्षाची काचही फोडण्यात आली. महात्मा गांधी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.
मिकी घई (पुणे) : CAA आणि NRC च्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चाकडून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. पुण्यातील कोंढवा भागात दुकान बंद करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात दुचाकीवरुन मोर्चा काढल्याने वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे काही मोर्चेकरांवर पोलिसांनी कारवाई केली. त्याचबरोबर कुठलाही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

প্রেক্ষাপট

मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरकत्व नोंदणी (एनआरसी) आणि ईव्हीएमविरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज (29 जानेवारी) भारत बंदची हाक देण्यात आली आहे. शिवाय, देशात डीएनएच्या आधारावर राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात एनआरसी लागू व्हावा, अशीही मागणी करण्यात येत आहे. व्यापारी, दुकानदार, शैक्षणिक संस्था, नागरिकांनी या भारत बंदमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन बहुजन क्रांती मोर्चातर्फे करण्यात आलं आहे. या भारत बंदला शाहीन बागमधील आंदोलक महिलांनाही पाठिंबा दिला आहे.

आजच्या बंदच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. त्यासाठी सर्व जिल्ह्यांना अलर्टही जारी करण्यात आला आहे. याशिवाय संवेदनशील भागांमध्ये विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. बहुजन क्रांती मोर्चाच्या या भारत बंदला एनआरसी-सीएएचा विरोध करणाऱ्या इतर संघटनांचाही पाठिंबा मिळू शकतो.

आम्ही भारत बंद पाळणार नाही : परळी व्यापारी संघटना
सततच्या बंदचा परिणाम आता थेट व्यापाऱ्यांवर दिसू लागला आहे. 29 जानेवारी रोजी असलेला भारत बंद आम्ही पाळणार नाहीत, असं निवेदन परळी शहर व्यापारी महासंघाने प्रशासनाला दिलं आहे. सरकारविरोधात असलेल्या आंदोलनाचा परिणाम सर्वसामान्य जनता आणि व्यापार्‍याला भोगावा लागतो. यामुळे बाजारपेठेत मोठी आर्थिक हानी होत आहे. 2019 मध्ये जवळजवळ वीस एक वेळा व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद ठेवली आहेत, असं निवेदनात म्हटले आहे.

आम्ही बंदला पाठिंबा देणार नाही,  उदगीरच्या व्यापाऱ्यांची भूमिका
सध्या राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात एनआरसीला पाठिंबा देणारे आणि विरोध करणारे बंद केले जात आहे. दर दोन दिवसांनी कोणता तरी पक्ष किंवा संघटना बंद पुकारत असतो यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. आम्ही बंदमध्ये सहभागी होणार नाही, कोणी आमच्या व्यापारी प्रतिष्ठानवर दगडफेक केल्यास आणि नुकसान झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहिल, असं निवेदन उदगीरच्या व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं.

भारत बंदची पत्रकं वाटणाऱ्या कार्यकर्त्यांना मारहाण
बदलापुरात भारत बंदसाठी पत्रकं वाटताना बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. बदलापूर पूर्वच्या शिवाजी चौकात एका गाडीतून आलेल्या चार ते पाच जणांनी हॉकी स्टिक, रॉडने कार्यकर्त्यांना केली. तसंच पत्रकं फाडून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.