CAA Protests | पुण्यात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आज राज्यभरात एल्गार पुकारला जाणार आहे. या आंदोलनात त्यात अभिनेता फरहान अख्तर, अभिनेत्री स्वरा भास्कर असे सेलिब्रिटीसुद्धा या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे.
প্রেক্ষাপট
मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात डाव्या संघटनांनी एल्गार पुकारला आहे. राज्यासह संपूर्ण देशभरात आज सीएए कायद्याविरोधात आंदोलन होणार आहे. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात मोठा विरोध होणार आहे. तर उत्तर प्रदेशात समाजावादी पक्षाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कलम 144 लागू करण्यात आलं आहे. याशिवाय राजधानी दिल्लीमधील अनेक परिसरातही जमावबंदी लागू केली आहे. दुसरीकडे या कायद्यामुळे भारतात कोणाच्याही नागरिकत्वाला धोका नाही, असं आश्वासन केंद्र सरकारने दिलं आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. जामियासारखी घटना घडू नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.
राज्याभरात एल्गार
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आज राज्यभरात एल्गार पुकारला जाणार आहे. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात एनएसयूआय, छात्रभारती, एसएफआय, मसाला, एआयएसएफसारख्या 18 पेक्षा जास्त विद्यार्थी संघटना, टीस, आयआयटी मुंबई, मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी एकत्र येत नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA), एनआरसी, जामिया, एएमयू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचा निषेध व्यक्त करणार आहेत.
या आंदोलनात त्यात अभिनेता फरहान अख्तर, अभिनेत्री स्वरा भास्कर असे सेलिब्रिटीसुद्धा या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. दुपारी चार वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात होईल. याशिवाय मालेगाव, उस्मानाबाद, नाशिक, जळगाव, मनमाड, अमरावतीसह इतर ठिकाणी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात निदर्शनं आहेत.
विरोधकांचं भाजप सत्ता छोडे आंदोलन
केंद्र सरकारने संमत केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात (CAB) सर्व विरोधी पक्षातर्फे ऑगस्ट क्रांती मैदानावर भाजप 'सत्ता छोडो आंदोलन' करण्यात येणार आहे. या आंदोलनाला एकनाथ गायकवाड, आमदार मधू चव्हाण, चरणसिंग सप्रा, नवाब मलिक, नसीम सिद्दीकी, संजय तटकरे, अबू असीम आझमी, मिराज सिद्दीकी, कम्युनिस्ट पार्टीचे कॉम्रेड महेंद्र सिंग आणि कम्युनिस्ट पार्टी, मुंबईचे सरचिटणीस कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांच्यासह अन्य नेते उपस्थित राहणार आहेत.
दिल्लीमध्ये आंदोलन
दिल्लीमध्ये आज डाव्या संघटनांचं आंदोलन होणार आहे. दुपारी 12 वाजता मंडी हाऊसमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानंतर मंडी हाऊसपासून फिरोजशाह कोटलापर्यंत मोर्चा काढला जणार आहे. त्याआधी सकाळी 11.45 वाजता राजघाटावर हिंदू संघटना या कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार आहेत.
लखनौमध्येही मोर्चा
उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये दुपारी 2 वाजता डाव्या संघटनांचं आंदोलन होणार आहे. परिवर्तन चौकातून हजरतगंजपर्यंत मोर्चा काढला जाणार आहे. तर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ धरणं आंदोलन केलं जाईल.
याशिवाय भोपाळ, बंगळुरु, हैदराबाद, चेन्नई, आणि जम्मूमध्येही डाव्यांचं आंदोलन होणार आहे. सकाळी 10 वाजता आंदोलनाला सुरुवात होईल.
संबंधित बातम्या
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचा मशाल मोर्चा, सुप्रिया सुळेही सहभागी
CAA Protest : नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात मुंबईत आंदोलन, फरहान अख्तर-जावेद जाफरी समवेत अनेक सेलिब्रिटींचा समावेश
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -