LIVE UPDATES | हिंगणघाट जळीतकांड खटल्यासाठी अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 10 Feb 2020 10:10 PM

भंडारा : पोलिस सांगून अल्पवयीन तरुणीचा अपहणाचा प्रयत्न, भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील गडेगाव येथील धक्कादायक प्रकार, तरुणीने प्रतिकार केल्याने तिला गाडीतून खाली फेकून आरोपींनी पळ काढला, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
नागरीकत्व सुधारणा कायद्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शाहीन बाग आंदोलनाची तीव्रता संपूर्ण देशभर पसरत ठिकठिकाणी या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी भिवंडी शहरात सुरू झालेले शाहीनबाग आंदोलन सोमवार रोजी अकराव्या दिवशी ही तेवढ्याच जोशपूर्ण वातावरणात सुरू असून , चोवीस तास सुरू असलेल्या या आंदोलनात दररोज सायंकाळी 07 ते 09 या दरम्यान सत्रात हजारो महिला उपस्थित होत असतात .

या महिलांना आंदोलनस्थळी शौचालय पिण्याचे पाणी या प्राथमिक सुविधां सह चहा चोवीस तास उपलब्ध करून देण्यासाठी शेकडो स्वयंसेवक तैनात असतात .

नाशिक : नाशिकच्या पंचवटी पोलीस स्टेशनबाहेर एका महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, कौटुंबिक कारणातून पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती, महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल
आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल. असं कृत्य करण्याचं धाडस होणार नाही, असा कायदा करु. हैदराबादपेक्षा कडक कायदा करु. नागरिकांनी संयम बाळगा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
बोईसर तारापूर रोडवर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात. दुचाकीस्वार कमलाकर लक्ष्मण वावरे यांचा जागीच मृत्यू. आज पहाटे हा भीषण अपघात घडला.
हिंगणघाट जळीत हत्याप्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज याची मुंबईत घोषणा केली. या प्रकरणाचा तपास वेगाने आणि खटला जलद गतीने चालेल यावर कटाक्ष असेल, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
हिंगणघाट जळीतकांड | दरोडा गावातील संतप्त नागरिकांचा रास्तारोको, नागपूर-हैदराबाद जुना महामार्ग रोखला, आरोपीला फासावर चढवण्याची मागणी

हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेच्या मृत्यूनंतर रोष व्यक्त केला जात आहे. शहरात तणावपूर्ण शांतता आहे. हिंगणघाटमध्ये काही सामाजिक संघटनाच्या कार्यकर्त्यांनी दुकान बंद करण्याचं आवाहन केलं आहे. काही प्रमाणात दुकान बंद केली जात आहे. शहरात वेगवेगळ्या भागात फिरुन कार्यकर्त्यांनी बंदच आवाहन केलं. शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
SC-ST कायद्यातील दुरुस्तीला सुप्रीम कोर्टाची मंजुरी
पुणे : अॅसिड टाकण्याची धमकी देऊन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून 25 वर्षीय तरुणावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जोकरने पटकावला ऑस्कर, जोक्विन फिनिक्सला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा बहुमान

शेतकऱ्यांना एकाच अर्जावर कृषीच्या सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे. येत्या खरीप हंगामापासून याची कार्यवाही होणार आहे. कृषी खात्याने याबाबत निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी प्रत्येकवेळी स्वतंत्र अर्ज द्यावा लागणार नाही. अर्जावरील कार्यवाहीचे एसएमएस देखील लाभार्थ्याला पाठवले जातील. महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ही प्रक्रिया आता ऑनलाईन राबवली जाणार आहे. महाडीबीटी पोर्टल आणि महाभूलेख संकेतस्थळाची जोडणी करण्याचे काम सुरु आहे, ते पूर्ण होताच शेतकऱ्यांना अर्जासोबत सातबारा आणि 8अ ही कागदपत्रे द्यावी लागणार नाही. तसंच योजनेसाठी मोबाईल ॲपही तयार करण्यात आलं आहे.
यंदाच्या ऑस्करमध्ये सर्वाधिक नामांकनं मिळवणारा जोकर हा चित्रपट होता. अखेर या चित्रपटाचं खातं उघडलं असून हिल्डर गुनाडोटिआर (Hildur Guðnadóttir) हिने ओरिजनल स्कोअर विभागात ऑस्कर पटकावला.

पॅरासाईट या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. याव्यतिरिक्त पॅरासाईट या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट स्क्रीनप्लेसाठी ऑस्कर मिळाला. ऑस्कर मिळवणारा हा पहिला दक्षिण कोरियन चित्रपट आहे.

स्टिव्हन बोगनर दिग्दर्शित 'अमेरिकन फॅक्टरी' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म हा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

अभिनेत्री लॉरा डर्न हिने 'मॅरेज स्टोरी' या चित्रपटातील अभिनयासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

डोनाल्ड सिल्वेस्टर याने बेस्ट साऊंड एडिटिंग विभागातील ऑस्कर पटकावला आहे.

मार्क टेलर आणि स्टुअर्ट विल्सन यांनी बेस्ट साऊंड मिक्सिंग विभागातील ऑस्कर पटकावला आहे. त्यांच्या कारकिर्दितील हे पहिलेच नामांकन होतं

रॉजर डिकेंस यांना '1917' या चित्रपटासाठी बेस्ट सिनेमॅटोग्राफी या विभागात ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या कारकिर्दीतील हे 15 नामांकन असून दुसरा ऑस्कर पुरस्कार होता.

जॉर्ज बटलर आणि डॉमनिक ट्यूई यांना 1917 या चित्रपटासाठी व्हिज्युअल इफेक्ट विभागात ऑस्कर मिळाला आहे.

पॅरासाईट या चित्रपटाने 'इंटरनॅशनल फिचर फिल्म' या विभागात ऑस्कर पटकावला आहे. ऑस्करसाठी नामांकन मिळवणारा हा पहिलाच कोरियन चित्रपट आहे.



हिंगणघाट जळतकांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी, हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून लवकरात निर्णय व्हावा : सुप्रिया सुळे
निर्भयाच्या मारेकऱ्यांसारखं नको, लवकरात लवकर न्याय करा, पीडितेच्या वडिलांची प्रतिक्रिया
ज्या वेदना मुलीला झाल्या, त्याच वेदना आरोपीला व्हाव्यात, पीडितेच्या वडिलांची प्रतिक्रिया
हिंगणघाट जळतकांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी, या घटनेनंतर समाजाने आत्मचिंतन करण्याची गरज, वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार यांची प्रतिक्रिया
LIVE : देशातील अजून एका निर्भयाचा मृत्यू झाला : मनिषा कायंदे
हिंगणघाट जळतकांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी, आमदार विद्या चव्हाणांची प्रतिक्रिया
हिंगणघाट जळतकांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी, नागपूरातील 'ऑरेंज सिटी' रूग्णालयात तरूणीने घेतला अखेरचा श्वास
LIVE : पीडितेचा मृत्यू अतिशय दु: खद घटना : यशोमती ठाकूर
अभिनेता ब्रॅड पिटला 'वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड' या चित्रपटातील कामगिरीसाठी बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर म्हणजे सर्वश्रेष्ठ सहकारी अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

'हेअर लव्ह' या शॉर्ट फिल्मला बेस्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म पुरस्कार देण्यात आला आहे.

हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची प्रकृती खालावली आहे. पीडितेचा रक्तदाब कमी झालेला असून तिला श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती मिळत आहे.
मनोरंजन विश्वातल्या सर्वश्रेष्ठ अशा ऑस्कर पुरस्कारांचा वितरण सोहळा पार पडत आहे. त्यात अभिनेता ब्रॅड पिटला 'वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड' या चित्रपटातील कामगिरीसाठी बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर म्हणजे सर्वश्रेष्ठ सहकारी अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. तर, 'टॉय स्टोरी 4' या चित्रपटाला बेस्ट अॅनिमेटेड फीचर पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. 'हेअर लव्ह' या शॉर्ट फिल्मला बेस्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म पुरस्कार देण्यात आला आहे.
पाकिस्तानातून भारतात 2 हजारांच्या बनावट नोटा येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या नोटांची किंमत तब्बल 23 लाख 86 हजार इतकी आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. या नोटा आधी पाकिस्तानातून दुबईत आणि दुबईतून मुंबईत आणल्याचं उघड झालं आहे. मात्र या बनावट नोटा कोणत्या कामासाठी आल्या आहेत, याचा अद्याप खुलासा झालेला नाही. या बनावट नोटांमागे काही दहशतवादी कनेक्शन आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
भारतीय जनता पक्ष म्हणजे हिंदू समाज नाही आणि भाजपला विरोध करणे म्हणजे हिंदूंना विरोध करणे नाही, असं विधान संघाचे सरचिटणीस भैयाजी जोशी यांनी केलं आहे. राजकीय लढाई सुरुच राहणार आहे, त्याला हिंदूंशी जोडू नका, असंही भैयाजी जोशी म्हणाले आहेत. गोव्यातील एका कार्यक्रमात बोलत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

প্রেক্ষাপট

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in


महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...


1. यापुढे तलवारीला तलवारीनं उत्तर, बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना राज ठाकरेंचा सज्जड दम, हिंदूंना सावध राहण्याचाही सल्ला
2. शिवसेनेला हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून मनसेच्या मोर्चाची खिल्ली, आजीवन हिंदुत्व सोडणार नसल्याचाही निर्धार
3. भाजप म्हणजे हिंदू समाज नाही, संघाचे सरचिटणीस भैयाजी जोशींचं वक्तव्य, भाजपला विरोध म्हणजे हिंदूंना विरोध नसल्याचंही प्रतिपादन
4. पाकिस्तानातून मुंबईत 2 हजारांच्या बनावट नोटा, क्राईम ब्रँचची कारवाई, दुबईमार्गे नोटा मुंबईत आणल्याचं पोलीस तपासात उघड
5. बांगलादेशनं भारताला नमवून अंडर19 विश्वचषकावर पहिल्यांदाच कोरलं नाव, यशस्वी जैस्वालची झुंजार खेळी, रवी बिश्णोईची प्रभावी फिरकी भारतानं दवडली वाया
6. यंदाच्या ऑस्कर सोहळयाला सुरुवात, 8 चित्रपटांमध्ये सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी चुरस, जगाची सोहळ्याकडे नजर

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.