मीरा- भाईंदरमध्ये दोन ठिकाणी अल्पवयीन मुलींवर बलात्कार

आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा https://marathi.abplive.com/

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 08 Feb 2020 11:04 PM
मीरा- भाईंदर मध्ये दोन ठिकाणी अल्पवयीन मुलींवर बलात्कारची घटना घडली आहे. मिरारोड मधील घटनेतील मुलीचं वय 15 वर्ष तर भाईंदर मधील घटनेतील मुलीचं वय 8 वर्ष आहे. मिरारोड आणि भाईंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या दोन्ही घटना आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही घटनेतील आरोपींना अटक ही केली आहे. मिरारोडच्या घटनेमधील आरोपीचं नाव अनिल जेटली आहे त्याच वय 51 वर्ष आहे. तर भाईंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमाशंकर गुप्ता असं आरोपीच नाव आहे. त्याच वय 43 वर्ष आहे.
अंबरनाथ : अंबरनाथच्या मोरीवली एमआयडीसीत कंपनीला मोठी आग, अंबरनाथ आणि बदलापूर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, आग नियंत्रणात आणायचे प्रयत्न सुरू
वरुड-अमरावती महामार्गावर भीषण अपघात, माऊली जहांगीर फाट्याजवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून स्वीप्ट कारची धडक. अपघातात तीन जणांचा मृत्यू. तर एक मुलगा जखमी.
सोशल मीडियावर शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल पुण्याच्या शिवाजी नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय. 
सांगली : प्रसिद्ध उद्योगपती आणि चितळे उद्योग समुहाचे काकासाहेब चितळे यांचे निधन, हृदयविकाराच्या झटक्याने झाले निधन, वयाच्या 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
राजधानी दिल्लीत दुपारी तीनवाजेपर्यंत 30 टक्के मतदानाची नोंद.
नाशिक : विजेचा शॉक लागून 2 शेतकऱ्यांच्या मृत्यू एक जखमी, देवळा तालुक्यातील मेशी येथील घटना
हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची प्रकृती खालावली, सहाव्या दिवशीही तरूणीची मृत्यूशी झुंज सुरूच; डॉक्टरांची माहिती
मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र, बेळगाव सीमा लढ्यात बलिदान दिलेल्या 67 शिवसैनिकांना शहीद दर्जा देण्याची मागणी
मुंबईबाग आंदोलनाच्या ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांत वादावादीला सुरूवात. मुंबई पोलिसांनी नव्यानं येणा-या महिलांची नावं लिहून त्यांना प्रवेश देण्यास सुरूवात करताच आंदोलकांचा विरोध
दिल्ली विधानसभा निवडणूक, दुपारी 1 वाजेपर्यंत 26.36 टक्के मतदान
हिंगणघाट जळीतकांडातील आरोपी विकेश नगराळे याला सुरक्षेच्या कारणास्तव पहाटे 5 ते साडेपाच वाजेदरम्यान हिंगणघाट कोर्टात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. न्यायालयीन कोठडी मागण्याचा आणखी एक आणि अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे आरोपीची ओळख परेड साक्षीदारामार्फत करून घेणे. पोलीस कोठडीत आरोपी असताना ओळख परेड घेता येत नाही. त्यामुळे न्यायालयीन कोठडीत पाठवून ओळख परेड घेतली जाणार आहे.
बेळगाव : खानापूर तालुक्यातील बोगुर गावाजवळ ट्रॅक्टर नाल्यात उलटून आठ जण ठार, ऊस तोडणी कामगारांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात, ट्रॅक्टर चालकाच्या बेजबाबदारपणामुळेअपघात
नवी मुंबई - नेरुळमधील सी होम्स इमारतीला लागलेल्या आगीत 7 जवान किरकोळ जखमी, जखमी जवान वाशीच्या महापालिका रुग्णालयात दाखल, आग आटोक्यात
राहुल गांधी यांनी औरंगजेब रोड येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांनी मतदान केलं.

मुंबई : शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव, प्रकाश महाजन कृष्णकुंजवर दाखल, आज मनसेत करणार अधिकृत प्रवेश, शिवसेनेचे नांदेडचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश कौटगे आणि शिवसेना नेते माजी शहरप्रमुख सुहास दशरथे देखील करणार मनसेत प्रवेश
अरविंद केजरीवाल यांनी बजावला मतदानाचा हक्क, मतदान करण्यासाठी दिल्लीकरांना आवाहन
मागील वर्षी येळ्ळूर येथील यात्रोत्सवानिमित्त आयोजित कुस्ती आखाड्याला शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीत योग्य उमेदवाराला मतदान करा असे आवाहन केले होते. त्यामुळे संभाजी भिडे आणि आयोजकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या द्वितीय न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीला संभाजी भिडे यांच्यासह दुधाप्पा बागेवाडी आणि विलास नंदी हजर राहिले नसल्यामुळे त्यांना वारंट बजावण्यात आले असून पुढील सुनावणी 24 मार्च रोजी होणार आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू, अरविंद केजरीवालांचा गड भेदण्यासाठी भाजपचे सर्वतोपरी प्रयत्न, निवडणूक प्रतिष्ठेची केल्यानं भाजपच्या कामगिरीकडे लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं की, "दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा दिवस आहे. सर्व मतदारांना आवाहन आहे की, अधिक संख्येने मतदान करा आणि नवी विक्रम प्रस्थापित करा."

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना सुरू, भारताचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय, मालिकेत स्थान राखण्यासाठी टीम इंडियाला विजय गरजेचा

पुणे : हडपसर परिसरात असलेल्या नोबेल हॉस्पिटलमध्ये बॉम्ब असल्याचा व्यवस्थापनाला मेल, 10 लाख रुपयांच्या खंडणीचे पैसे न दिल्यास हॉस्पिटल उडवून देण्याची मेलद्वारे धमकी, पोलीस व बीडीडीएसची घटनास्थळी जाऊन पाहणी, नोबेल हॉस्पिटल परिसरात पोलीस पथक आणि बॉम्बस्फोट पथकाकडून शोधमोहिम सुरु
मुंबईत किमान तापमान 14अंशांपर्यंत घसरले, कमाल तापमानातही घट होण्याची शक्यता

প্রেক্ষাপট

आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा https://marathi.abplive.com/

महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...

1. ठाकरे सरकारची शेतकऱ्यांसाठी नव्या उपक्रमाची आखणी, दर 15 दिवसांनी कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार, 15 एप्रिलपर्यंत कर्जमाफीची अंमलबजावणी करण्याचेही आदेश

2. मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटीसा, घुसखोरांना हाकलून देण्याच्या मागणीसाठी उद्या गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा

3. मुंबईकरांना आता घरातल्या कचऱ्यावरही कर द्यावा लागणार, रिअल इस्टेटचा व्यवसाय सुस्तावल्यानं पालिकेच्या तिजोरीला फटका, घटलेलं उत्पन्न भरुन काढण्याचा प्रयत्न

4. 100 युनिटपर्यंतची वीज मोफत देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन, 3 महिन्यात निर्णय अपेक्षित, ऊर्जामंत्र्यांच्या घोषणेकडे लक्ष

5. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान, आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये प्रमुख लढत, अरविंद केजरीवालांसह दिग्गजांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार

6. हिंगणघाट प्रकरणातील आरोपीला आज न्यायालयात हजर करणार, पोलिसांकडून पुन्हा पोलीस कोठडीची मागणी होण्याची शक्यता, विकेश नगराळेला कठोर शिक्षा देण्याची सर्व स्तरातून मागणी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.