Live Updates | आठ सागवान चोर वनविभागाच्या ताब्यात, सालेकसा वनविभागाची कारवाई

आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 31 Dec 2019 10:50 PM

প্রেক্ষাপট

आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट...More


आठ सागवान चोर वनविभागाच्या ताब्यात, सालेकसा वनविभागाची कारवाईल : -
गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा वनपरिक्षेत्रातंर्गत येत असलेल्या टेंभूटोला गावाजवळ सागवानाची लाकडे अवैधरित्या वाहून नेणार्‍या आठ आरोपींना सालेकसा वनविभागाने ताब्यात घेतले आहे. टेंभूटोला गावाजवळून सागवानाची लाकडे अवैधरित्या वाहून नेत असल्याची माहिती सालेकसा वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सालेकसाचे वनपरिक्षेत्र अधिकारी पिंजारी यांनी टेंभूटोला गावाजवळ नाकाबंदी केली. यावेळी नऊ आरोपी डोक्यावरु सागवानाची लाकडे नेत असल्याचे आढळून आले. मात्र, वन अधिकारी व कर्मचार्‍यांना पाहताच त्यांनी लाकडे फेकून पळ काढला. तर पाठलागादरम्यान एकाला ताब्यात घेतले तर इतर आरोपी फरार झाले होते म्हणून वनाधिकारी यांनी पकडलेल्या आरोपीकडून विचार पूस करत एकूण आठ लोकांना अटक केली आहे. अजूनही एक आरोपी फरार आहे.