आजही ठाकरे सरकारचं खातेवाटप नाही? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कार्यालयातून बाहेर पडले
आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ
Last Updated:
04 Jan 2020 10:21 PM
CAT-2019 परीक्षेचा निकाल IIM- कोझिकोडी इन्स्टिट्यूटकडून आज जाहीर, देशात 10 विद्यार्थी 100 पर्सेंटाइल मिळवून CAT परीक्षेचे टॉपर्स.
राज्यात 4 विद्यार्थ्यांना100 पर्सेंटाइल मार्क्स.
मुंबई आयआयटीत शिकत असलेला मूळ नागपूरचा असलेला सोमांश चोरडियाला 100 पर्सेंटाइल मार्क्स
उल्हासनगरमध्ये बांधकाम व्यावसायिक बाळा श्रीखंडे यांची काही बांधकामं सुरू आहेत. मात्र खटवानी हा वारंवार त्यांच्या बांधकामाची तक्रार करत होता. त्यामुळे श्रीखंडे यांनी त्याच्याशी संपर्क साधत कारण विचारलं असता त्याने आपल्याला महिना १ लाख रुपये खंडणी देण्याची मागणी केली. तडजोडीनंतर ही रक्कम ४० हजार रुपये ठरली. दरम्यानच्या काळात श्रीखंडे यांनी ठाणे खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी श्रीखंडे यांच्या कार्यालयात सापळा रचला आणि खटवानी याला ४० हजार रुपये घेताना रंगेहाथ अटक केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरातही कैद झाला. या प्रकारामुळे उल्हासनगरमध्ये चालणारा ब्लॅकमेलिंगचा धंदा पुन्हा एकदा समोर आलाय.
माझी भूमिका मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडेन, आत्ता काहीही बोलणार नाही, माझा संपूर्ण कंट्रोल केवळ मातोश्रीवर आहे : अब्दुल सत्तार
सोन्याच्या दरात विक्रमी वाढ, सोन्याचा दर तब्बल साडे चाळीस हजारांवर : - अमेरिका आणि इराणमधील संघर्षाचा परिणाम भारतावर होऊ लागला आहे. दोन देशांमधील संघर्षामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला आहे. त्यामुळे सोन्याच्या दरांतही मोठी वाढ होऊ लागली आहे. आज जळगावच्या सुवर्ण नगरीत सोन्याचे दर 40 हजार 500 रुपये इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. सोन्याचे दर येत्या काही दिवसात आणखी वाढण्याची शक्यता आहे
औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदी महाविकास आघाडीचा झेंडा, काँग्रेसच्या मीना शेळके यांची अध्यक्षपदी निवड...
थोड्याच वेळात खातेवाटप होणार, कॅबीनेट मंत्री एकनाथ शिंदे यांची 'माझा'ला माहिती...
थोड्याच वेळात खातेवाटप होणार, कॅबीनेट मंत्री एकनाथ शिंदे यांची 'माझा'ला माहिती...
मुंबईत उद्या होणाऱ्या छात्र परिषदेची नवीन आणि अंतिम कार्यक्रम पत्रिका समोर आली आहे. या पत्रिकेतून युवासेना अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना वगळण्यात आलं आहे. आदित्य ठाकरे आणि विद्यार्थी नेता उमर खालिद एकत्र मंचावर दिसणार असं वृत्त होतं. परंतु त्यानंतर शिवसेने ट्वीट करुन या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत आदित्य ठाकरे यांनी पुष्टी केलेली नाही, असं सांगितलं. त्यानंतर कार्यक्रमाची नवीन पत्रिका बनवण्यात आली. त्यात आदित्य ठाकरे यांना वगळण्यात आलं.
पंकजा मुंडे यांनी बीड जिल्हा परिषदेचं मैदान सोडलं, फक्त प्रक्रिया म्हणून निवडणूक लढवणार
अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर झाली आहे. सत्तार यांचं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं झालं आहे, उद्या ते मातोश्रीवर जाणार आहेत. अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या केवळ अफवा आहेत : अर्जुन खोतकर
अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर झाली आहे. सत्तार यांचं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं झालं आहे, उद्या ते मातोश्रीवर जाणार आहेत. अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या केवळ अफवा आहेत : अर्जुन खोतकर
राज्य मंत्रीमंडळ विस्तारानंतर शिवसेनेला धक्का, अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्रीपदाचा राजीनामा, कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने सत्तार नाराज
आमदार विनय कोरेंना सरकारचा मोठा दणका, 25 कोटींच्या थकबाकीप्रकरणी साखर जप्त करण्याचे साखर आयुक्तालयाचे आदेश, 2019-20 मधली एफआरपी न दिल्याने बजावले आदेश
बुलडाणा : चालत्या बसचे स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस शेताच्या बांधावर चढली, 23 विद्यार्थी जखमी, बुलडाण्याच्या कोथळी जवळची घटना, बसमध्ये एकूण 40 विद्यार्थी होते
औरंगाबाद शहरातील घनदाट धुक्यामुळे रेल्वेची गती मंदावली. सिग्नल दिसत नसल्यानं रेल्वे पाच ते दहा किलोमीटर प्रति वेगाने धावत आहे. तर काही काळ रेल्वे थांबवण्यात आली होती. 57562 मनमाड काचीगुडा पैसेंजर धुक्यात ताशी 5-10 स्पीड ने धावत आहे.
छपाक सिनेमाच्या कथेवरून नवा वाद, लक्ष्मी अगरवालच्या कथेचे हक्क आपल्याकडे असल्याचा राकेश भारती नामक गृहस्थांचा दावा, आज पत्रकार परिषद घेऊन करणार खुलासा
मुंबई : उद्या (5 जानेवारी) मुंबईत CAA, NRC, NPR विरोधी छात्र परिषद, उमर खालिद, आदित्य ठाकरे, जावेद अख्तर यांच्यासह देशभरातील विद्यार्थी नेते, मान्यवर उपस्थित राहणार, रविवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दुपारी 1 ते 5 दरम्यान ही छात्र परिषद होणार
প্রেক্ষাপট
आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
1. ठाकरे सरकारचं खातेवाटपाचा गुंता सुटला, आज खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता, परिवहन आणि कृषी खातं शिवसेनेकडेच राहणार
2. जळगाव जिल्हा परिषदेवर पुन्हा भाजपचा झेंडा, खडसे-महाजनांचा जल्लोष, औरंगाबादेत कायदेशीर पेच, तर बीड जिल्हा परिषदेसाठी धनंजय मुंडेंकडून मोर्चेबांधणी सुरु
3. काँग्रेसच्या सेवादलाच्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह लिखाण, सावरकरांचे नातू आक्रमक, फडणवीस आणि पाटलांचा काँग्रेस, शिवसेनेवर हल्लाबोल
4. आमदारांच्या पगार आणि पेन्शनसाठी 5 वर्षात 500 कोटी रुपये खर्ची, एसटीच्या कर्मचाऱ्यांवर मात्र उपासमारीची वेळ, कोट्यधीश आमदारांना पेन्शन कशाला, सामान्यांना सवाल
5. कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपचा सेनेला धक्का, काँग्रेस-मनसेच्या मदतीनं स्थायी समितीचं सभापतीपद काबीज, शिवसेनेच्या एका नगरसेवकाची ऐनवेळी दांडी
6. प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती बिगुल वाजलं, आमदार महेश लांडगेंच्या हस्ते स्पर्धेचं उद्धघाटन, पुण्यातल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात पैलवानांचा शड्डू