LIVE BLOG | भारत वि बांगलादेश पहिला टी-20 सामना, बांगलादेशची भारतावर 7 विकेट्सने मात
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ
Last Updated:
03 Nov 2019 10:32 PM
शिवसेना खासदार संजय राऊत उद्या राज्यपालांना भेटणार, शिवसेनेचा भाजपवर दबाव वाढवण्य़ाचा प्रयत्न
भारत वि. बांगलादेश पहिला टीृ-20 सामना, बांगलादेशचा भारतावर सनसनाटी विजय, बांगलादेशची भारतावर 7 विकेट्सने मात, मुशफिकुर रहिमची 60 धावांची निर्णायक खेळी
राज्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीतजास्त मदतीच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्लीला जाणार, सूत्रांची माहिती, तातडीची मदत मिळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार
राज्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीतजास्त मदतीच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्लीला जाणार, सूत्रांची माहिती, तातडीची मदत मिळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार
उत्तर कोकणासह उत्तर-मध्य महाराष्ट्रमध्ये 6 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान चक्रीवादळाचा इशारा
नाशिक पाठोपाठ आता मुंबईत देखील भाज्यांचे दर कडाडल्याचं चित्र आहे. मुंबईत कोथिंबीरची एक जोडी तब्बल 80 रूपये आहे. तसेच पालक एक पेंडी 70 रूपये आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सतत पाऊस पडल्यामुळे मुंबईत भाज्यांचे दर वाढल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे. मागील आठवड्यात 40 रुपये जोडी असणारी कोथिंबीर आता 80 रुपयांना मिळत आहे. मेथीची 20 रुपयांना मिळणारी पेंडी 40 रुपयांना आहे तसेच 15 रुपये किलो मिळणारी चवळी आज 30 रुपये किलो आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी शेतातच भाज्या कुजल्या आहेत. त्यामुळे मुंबईत मार्केटमध्ये नवीन माल पोहचू शकला नाही. त्याचा परिणामामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत.
कसारा घाटात ब्रेक फेल झालेल्या एका ट्रेलरने दिली 4-5 गाड्यांना धडक दिली आहे. या अपघातात पाच जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना जिल्हा रुग्णालयात हलवण्याचे प्रयत्न सुरू
कसारा घाटात ब्रेक फेल झालेल्या एका ट्रेलरने दिली 4-5 गाड्यांना धडक दिली आहे. या अपघातात पाच जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना जिल्हा रुग्णालयात हलवण्याचे प्रयत्न सुरू
कसारा घाट : ब्रेक फेल झालेल्या ट्रेलरची चार गाड्यांना धडक, पाच जखमी
बेळगाव - बंगलोर नॅशनल ट्रॅव्हल्सच्या बसला टूमकूर येथे अपघात, अपघातात अनेक जण जखमी तर दोन ते तीन जण जागेवरच मृत झाल्याची प्राथमिक माहिती
कसारा घाट : ब्रेक फेल झालेल्या ट्रेलरची चार गाड्यांना धडक, पाच जखमी
कसारा घाट : ब्रेक फेल झालेल्या ट्रेलरची चार गाड्यांना धडक, पाच जखमी
बुलडाणा: पहाटे 5:30 वाजता पेनटाकळी धरणाचे नऊ दरवाजे उघडले, पैनगंगा नदीपात्रात 15050 क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात आलं, नदीपात्रात सोडलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान
প্রেক্ষাপট
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
१. सहकाऱ्यांची साथ नसल्यानं देवेंद्र फडणवीस एकाकी, संजय राऊतांचं विधान, तर सर्वजण साथीला असल्याचा गिरीश महाजनांचा दावा
२. सरकार स्थापन करण्यास भाजप अपयशी ठरल्यास सेना सत्तास्थापनेसाठी पाऊल उचलेल, माझा कट्ट्यावर राऊतांचं मोठं विधान, परतीचे दोर कापल्याचं म्हणत भाजपला इशारा
३. राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट, बंद दाराआड झालेल्या चर्चेचा तपशील गुलदस्त्यात, तर आज दिल्लीत होणाऱ्या पवार आणि सोनियांच्या भेटीकडेही लक्ष
४. 10 हजार कोटी नव्हे तर 25 हजार कोटींची नुकसान भरपाई द्या, सरकारनं जाहीर केलेली मदत तोडकी असल्याचा विरोधकांचा आरोप, आज उद्धव आणि फडणवीस पाहणी दौऱ्यावर
५. दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाबाहेर पोलीस आणि वकीलांमध्ये धुमश्चक्री, पार्किंगच्या वादातून कोर्ट परिसरातच पोलीसांचा गोळीबार, संतापलेल्या वकिलांकडून तोडफोड
६. नाशिकमध्ये कोथिंबिरच्या जुडीला 280 रुपयांचा भाव, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 100 जुड्यांना तब्बल 28 हजारांचा दर, अवकाळीमुळे दर गगनाला