LIVE UPDATE : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in.

ওয়েব ডেস্ক, এবিপি আনন্দ Last Updated: 09 Nov 2019 07:48 PM
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण,
11 नोव्हेंबर रोजी सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपाल यांच्याकडून भाजपला आमंत्रण देण्यात आले आहे.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची सोमवारी (11 नोव्हेंबर) रोजी बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्यातील सत्ता संघर्षावर चर्चा होणार आहे.

पोलादपूर :

पंढरपूरहून परतणाऱ्या मिनीबसची आंबेनळी घाटात झाडाला धडक, खेड तालुक्यातील खवटी येथील 19 वारकरी जखमी, जखमींवर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू, चुकीच्या दिशेने गाडी चालवित आंब्याच्या झाडावर धडकून चालकाने केला अपघात
पंढरपूर : भगर खाल्ल्याने 50 ते 60 वारकऱ्यांना विषबाधा .. पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु, सर्व भाविक रत्नागिरी जिल्ह्यातील

প্রেক্ষাপট

१. अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज अंतिम निकाल , सरन्यायाधीश रंजन गोगोईंचं खंडपीठ सकाळी १०.३० वाजता सुनावणार फैसला, संपूर्ण देशाचं निकालाकडे लक्ष

२.अयोध्या प्रकरणी निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था, अयोध्यानगरीला छावणीचं स्वरुप, शांतता आणि सौहार्द राखण्याचं पंतप्रधान मोदींचं आवाहन

३. अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिलाच नव्हता, फडणवीसांचा सेनेला मोठा धक्का, तर फडणवीस, शाहांसह संपूर्ण भाजप खोटारडा, उद्धव ठाकरेंचा पलटवार

४. भाजपचंच सरकार स्थापन करणार, फडणवीसांचा निर्धार, तर बहुमताशिवाय सरकार कसं बनवणार? उद्धव ठाकरेंचा सवाल, तूर्तास फडणवीस काळजीवाहू मुख्यमंत्री

५. युतीतल्या संघर्षानंतर पवारांच्या घरी काँग्रेस नेत्यांची खलबतं, राज्यपालांच्या भूमिकेनंतर आघाडीची भूमिका ठरणार, सेनेचे राऊतही पवारांच्या संपर्कात

६. शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईतल्या 'द रिट्रीट' हॉटेलमध्ये, घोडेबाजाराच्या भीतीनं सेनेचं पाऊल, तर आमदार फोडण्यासाठी भाजपची 50 कोटींची ऑफर, काँग्रेसचा आरोप

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.